घोषणा
◼ मार्च: महिन्याकरता साहित्य सादरता: सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान. या महिन्यात गृह बायबल अभ्यास सुरू करण्याचा खास प्रयत्न केला जावा. एप्रिल आणि मे: टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिकांच्या वर्गण्या. आस्था दाखवणाऱ्यांसाठी अपेक्षा माहितीपत्रकही सोबत न्यावे आणि बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करावा. जून: सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान.
◼ एप्रिल आणि मे महिन्यात सहायक पायनियरिंग करू इच्छिणाऱ्या प्रचारकांनी त्यासाठी आताच योजना आखून आपले अर्ज लवकर द्यावेत. त्यामुळे क्षेत्र कार्यासाठी वडिलांना आवश्यक योजना आखता येतील शिवाय नियतकालिकांचा आणि साहित्यांचा पुरेसा साठा देखील तयार ठेवता येईल. सहायक पायनियरिंगसाठी ज्यांचे अर्ज मान्य झाले आहेत अशांची नावे मंडळीत घोषित केली जावी.
◼ मंडळीच्या अध्यक्षीय पर्यवेक्षकाने किंवा त्याने नेमलेल्या एखाद्या बांधवाने मार्च १ तारखेला किंवा त्यानंतर लवकरात लवकर मंडळीचा जमाखर्च अहवाल तपासून पाहावा. असे केल्यानंतर पुढचा जमाखर्च अहवाल वाचल्यानंतर मंडळीत त्याची घोषणा करावी.
◼ या वर्षीचा स्मारकविधी गुरुवार, एप्रिल १, १९९९ रोजी पार पाडण्यात येईल. तुमच्या मंडळीच्या सभा सहसा गुरुवारच्या दिवशी होत असल्यास आणि सभागृह उपलब्ध असल्यास या सभा आठवड्याच्या दुसऱ्या कोणत्याही दिवशी घ्याव्यात. पण सभागृह उपलब्ध नसेल आणि सेवा सभा घेणे शक्य नसल्यास जे भाग खासकरून तुमच्या मंडळीला लागू होतात ते दुसऱ्या एखाद्या सेवा सभेत हाताळले जावेत.
◼ मंडळीतल्या सर्वांनी टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिकांच्या सर्व नवीन व नुतनीकरण वर्गण्या तसेच त्यांच्या व्यक्तिगत वर्गण्याही मंडळीमार्फतच पाठवाव्यात.
◼ प्रचारकांच्या वैयक्तिक साहित्य मागण्यांची पूर्ती संस्था करत नाही. मंडळीची दर महिन्याची साहित्य मागणी संस्थेला पाठवण्यापूर्वी, अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी दर महिन्यात एक घोषणा करावी; यामुळे, ज्यांना ज्यांना स्वतःसाठी साहित्य हवे आहे ते संबंधित बांधवाला कळवू शकतील. कोणती प्रकाशने, खास मागणीची (स्पेशल रिक्वेस्टची) आहेत ते कृपया लक्षात ठेवा.
◼ फेब्रुवारी १९९९ च्या अंकपासून टेहळणी बुरूज आणि सावध राहा! रंगीत छापले जाईल.
◼ एप्रिल १, १९९९ च्या अंकापासून पंजाबी भाषेतील टेहळणी बुरूज नियतकालिक पंधरवडा आवृत्ती म्हणून छापले जाईल.
◼ मंडळ्यांना आधी सूचित केल्यानुसार जानेवारी १, १९९९ पासून पुढील नवीन किंमती लागू होतील: