मार्चसाठी सेवा सभा
मार्च १ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ३३ (४)
८ मि: स्थानिक घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा.
१७ मि: “जगभर ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मरणोत्सव.” प्रश्नोत्तरे. फेब्रुवारी १, १९९७, टेहळणी बुरूज, पृष्ठे ११-१२, परिच्छेद १०-१४ वरील विवेचनेही यात समाविष्ट करा. कशाप्रकारे यहोवाच्या महान प्रीतीने आपल्याकरता खंडणीची तरतूद करण्यास यहोवाला प्रवृत्त केले यावर भर द्या.
२० मि: एप्रिल आणि मे महिन्यात सहायक पायनियरींग करण्याची उत्तेजनात्मक कारणे. सेवा पर्यवेक्षकांचे भाषण आणि श्रोत्यांसोबत चर्चा; सगळ्यांना सहायक पायनियरिंग करण्याचा गांभीर्याने विचार करण्याचा आग्रह करा. जानेवारी १९९९ ची आमची राज्य सेवा, पृष्ठ ३ वर नियमित आणि सहायक पायनियरांसाठी आवश्यक असणाऱ्या तासांत जो बदल दाखवला आहे त्याची उजळणी करा. हा बदल केल्यामुळे अधिक लोकांना पूर्ण-वेळेच्या सेवेचा विशेषाधिकार अनुभवण्यास शक्य होईल. ख्रिस्ताच्या बलिदानासाठी असणारी आपली कदर प्रचाराच्या कामात परिश्रम करण्यास आपल्याला कशी भाग पाडते याचे स्पष्टीकरण द्या. (२ करिंथ. ५:१४, १५) या वर्षीचा स्मारकविधी एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवशी येतो. त्यामुळे हा संपूर्ण महिना सेवेत अधिक कार्य करण्यासाठी सर्व राज्य प्रचारकांना किती चांगले उत्तेजन मिळेल! फेब्रुवारी १९९७ आणि मार्च १९९८ ची आमची राज्य सेवा यात सहायक पायनियर सेवेसंबंधी दिलेल्या ठळक मुद्द्यांची उजळणी करा. त्यात नमुन्यादाखल दिलेल्या आराखड्यांत आवश्यक बदल कसे करता येतील याची चर्चा करा. सेवेत इतरांसोबत सहभाग घेण्याच्या भरपूर संधी मिळतील अशा स्थानिक सेवा योजनांची उजळणी करा. सभेनंतर सहायक पायनियरिंगचे अर्ज प्राप्त करण्यास प्रचारकांना सांगा.
गीत ४४ (६) आणि समाप्तीची प्रार्थना.
मार्च ८ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ५२ (६)
१० मि: स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल.
२० मि: “त्यांना येण्याचे आमंत्रण द्या.” प्रश्नोत्तरे. आस्था दाखवणाऱ्या नवीन लोकांना मंडळीच्या सभांशी परिचित करण्याची गरज आहे यावर जोर द्या. एका आस्थेवाईक व्यक्तीसोबत चर्चा करत असल्याचे एक प्रात्यक्षिक दाखवा; हे प्रात्यक्षिक ज्ञान पुस्तकातील पृष्ठ १५९, परिच्छेद २० आणि पृष्ठे १६१-३ वरील परिच्छेद ५-८ मध्ये दिलेल्या माहितीवर आधारित असावे. एप्रिल १ रोजी होणाऱ्या स्मारकविधीस उपस्थित राहण्यास आपल्या बायबल विद्यार्थ्यांना आणि इतर आस्थेवाईकांना मदत करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे सर्वांना उत्तेजन द्या. छापील आमंत्रणाची एक प्रत दाखवा आणि तिचा प्रभावीपणे उपयोग कसा केला जाऊ शकतो याचे स्पष्टीकरण द्या. सर्वांनी याच आठवड्यात स्मारकविधीचे आमंत्रण देण्यास सुरवात करावी.
१५ मि: “मंडळीच्या सभांमध्ये—पूर्णार्थाने सहभाग घेण्यासाठी कौटुंबिक सदस्यांचे सहकार्य.” एका कुटुंबामधील चर्चा. लेखातील मुख्य मुद्द्यांवर विवेचन मांडताना सबंध कुटुंब मिळून सभांची तयारी कशी करता येईल याची ते चर्चा करतात. सहभाग घेण्यासाठी एकमेकांना मदत कशी करता येईल तसेच वेळेवर सभांना उपस्थित राहण्यासाठी काय करता येईल याचीही ते चर्चा करतात.
गीत ६२ (२३) आणि समाप्तीची प्रार्थना.
मार्च १५ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ५६ (४)
१० मि: स्थानिक घोषणा.
१५ मि: “सेवा सेवक मोलवान कामे पार पाडतात.” एका कार्यक्षम सेवा सेवकाचे भाषण. आपली सेवा पुस्तकातील पृष्ठे ५७-९ वर दिलेल्या मुख्य मुद्द्यांची उजळणी करा. मंडळीला मदत करण्यासाठी तुमच्या मंडळीत सेवा सेवकांना कोण-कोणती कामे नेमली आहेत ते श्रोत्यांना सांगा.
२० मि: १९९९ वार्षिकपुस्तक वाचण्याचा आनंद घेणे. पतिपत्नीमधील चर्चा. पहिल्यांदा वार्षिकपुस्तक प्रकाशित केले होते ते १९२७ मध्ये, एका पुस्तकाच्या स्वरूपात आणि आज ७० हून अधिक वर्षांपासून किंबहुना त्याहीपेक्षा जास्त काळापासून त्यात यहोवाच्या साक्षीदारांचा जगव्याप्त अहवाल दिला जातो हे स्पष्टीकरण पती देतो. पृष्ठ ३१ वर दिलेल्या ‘१९९८ ग्रँड टोटल्सच्या’ ठळक वैशिष्ट्यांची ते उजळणी करतात. मग पृष्ठे ३-५ वरील “ए लेटर फ्रॉम द गव्हर्निंग बॉडी,” याची ते चर्चा करतात आणि त्यात दिलेल्या उत्तेजनाच्या अनुषंगाने कार्य कसे करावे यावर ते आपली मते मांडतात.
गीत ६८ (२३) आणि समाप्तीची प्रार्थना.
मार्च २२ ने सुरू होणारा सप्ताह
गीत १६२ (१८)
१० मि: स्थानिक घोषणा. एप्रिल महिन्यात सहायक पायनियरिंग करणाऱ्या प्रचारकांची नावे सांगा. आणि पायनियरिंगचे अर्ज देण्यास अजूनही उशीर झालेला नाही हे श्रोत्यांना सांगा. एप्रिल महिन्यासाठी आयोजित केलेल्या क्षेत्र सेवा सभांच्या वेळापत्रकाविषयी थोडक्यात सांगा. शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करणे—१९९९ यात आणि १९९९ दिनदर्शिकेत मार्च २७ ते एप्रिल १ साठी दिलेल्या स्मारकविधी बायबल वाचन आराखड्याचे पालन करण्यास सर्वांना उत्तेजन द्या.
१५ मि: स्मारकविधीची तयारी. भाषण. बायबल विद्यार्थ्यांना आणि इतर आस्थेवाईक व्यक्तींना स्मारकविधीस उपस्थित राहण्याची मदत करण्यासाठी सर्वांनी योजना कराव्यात. बोधचिन्हे कोण सेवन करू शकतो किंवा या विधीचे महत्त्व काय याची नवोदितांना कदाचित माहिती नसेल. त्यासाठी, एप्रिल १, १९९६, टेहळणी बुरूज, पृष्ठे ६-८ वर दिलेल्या माहितीची उजळणी करा आणि या समारंभाचा अर्थ काय, त्याचा उद्देश काय हे समजून घेण्यास नवोदितांना कशी मदत करता येईल ते सांगा. शेवटी, “स्मारकविधीकरता सूचना” याची उजळणी करा आणि स्मारकविधीसाठी मंडळीने काय व्यवस्था केल्या आहेत ते सांगा.
२० मि: मृत्यूच्या वेळी आपले काय होते? (इंग्रजी) दोन किंवा तीन प्रचारकांसोबत वडील या माहितीपत्रकाच्या मोलाची आणि उपयोगाची चर्चा करतात. क्षेत्र सेवेत आपण त्याचा चांगला उपयोग करत आहोत का? वडील आणि प्रचारक पुढील प्रश्नांची चर्चा करतात: अनेक लोकांना या विषयात इतकी उत्सुकता का? खोट्या धर्मांच्या शिकवणुकींच्या विपरित या माहितीपत्रकात कोणती आशा दिलेली आहे? लोकांची आस्था जागविण्यासाठी त्याच्या मागील पृष्ठावर दिलेल्या प्रश्नांचा आपण कसा उपयोग करू शकतो? कोणत्या प्रसंगी हे माहितीपत्रक लोकांना दिले जाऊ शकते? पृष्ठ २७ वरील परिच्छेद १४ मध्ये दिलेल्या शास्त्रवचनांचा उपयोग करून एक प्रात्यक्षिक दाखवा. संधी मिळताच या माहितीपत्रकाचा चांगला उपयोग करण्याचे सर्वांना उत्तेजन द्या.
गीत ९२ (२२) आणि समाप्तीची प्रार्थना.
मार्च २९ ने सुरू होणारा सप्ताह
गीत १११ (८)
१२ मि: स्थानिक घोषणा. सर्वांना आपला मार्चचा क्षेत्र सेवा अहवाल देण्याची आठवण करून द्या. एप्रिल महिन्यादरम्यान आपण क्षेत्रात टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिके देणार आहोत. या नियतकालिकांचे अलीकडील अंकांतून क्षेत्रात दाखवता येतील असे लेख दाखवा आणि संभाषण सुरू करण्यासाठी उपयोग करता येईल अशा काही खास मुद्द्यांचा उल्लेख करा. सर्वांनी अपेक्षा माहितीपत्रक सोबत ठेवावे आणि आस्थेवाईक व्यक्तींसोबत बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी त्याचा उपयोग करावा.
१५ मि: स्थानिक गरजा.
१८ मि: सल्ला दिला जातो तेव्हा आपण काय करतो? वडिलांचे भाषण. आपली मनोवृत्ती, आपले वागणेबोलणे, आपली संगती किंवा मंडळीतील कार्यहालचालींमधील आपला सहभाग यांबाबतीत आपणा सर्वांनाच वेळोवेळी सल्ला मिळण्याची शक्यता आहे. कधीकधी आपण सल्ला स्वीकारत नाही किंवा आपला अपमान झाला असे मानून बसतो. पण सल्ला स्वीकारण्याची तयारी ठेवून तो उपयोगात आणणे आपल्या आध्यात्मिक प्रगतीकरता अनिवार्य आहे. सल्ला स्वीकारण्याचे आणि त्याबद्दल कृतज्ञता दाखवण्याची कारणे यावर भर देणाऱ्या आवश्यक बाबींची उजळणी करा.—पाहा एप्रिल १, १९८७, टेहळणी बुरूज, (इंग्रजी) पृष्ठे २७-३०.
गीत ११८ (२०) आणि समाप्तीची प्रार्थना.