वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १/९९ पृ. २
  • जानेवारीसाठी सेवा सभा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जानेवारीसाठी सेवा सभा
  • आमची राज्य सेवा—१९९९
  • उपशिर्षक
  • जानेवारी ४ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—१९९९
km १/९९ पृ. २

जानेवारीसाठी सेवा सभा

जानेवारी ४ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ३६ (२३)

१० मि:मंडळीच्या घोषणा. आमची राज्य सेवा यातून निवडक घोषणा. जानेवारी १ पासून सभांच्या वेळा बदलल्या असतील, तर सर्वांना या नवीन वेळा दाखवणाऱ्‍या हस्तपत्रिका वापरण्याची आठवण करून द्या.

१५ मि:“जुन्या पुस्तकांचा चांगला उपयोग करा.” प्रश्‍नोत्तरे. तुमच्या मंडळीत कोणकोणती जुनी पुस्तके आहेत ते सांगा. या पुस्तकांच्या काही वैशिष्ट्यांचा उल्लेख करून ही कशी सादर करता येतील हे समजावून सांगा. जानेवारी महिन्यात क्षेत्र सेवा करताना आणि अनौपचारिक साक्षकार्य करतानाही जुनी पुस्तके देण्याचे सर्वांना प्रोत्साहन द्या. एखादे जुने पुस्तक कसे द्यायचे हे दाखवणारे लहानसे आणि सोपे प्रात्यक्षिक दाखवा.

२० मि:विनारक्‍त उपचार आणि आरोग्य सेवा कायदेशीरपणे निवडा (प्रे. कृत्ये १५:२८, २९). आगाऊ वैद्यकीय अधिकृत सूचना/जबाबदारीतून मुक्‍तता कार्ड किती महत्त्वाचे आहे हे एखाद्या सुयोग्य वडिलाने या भाषणातून स्पष्ट करावे. बाप्तिस्मा झालेल्या सर्व साक्षीदारांना या सभेनंतर एक नवे कार्ड दिले जाईल आणि ज्यांना बाप्तिस्मा न झालेली लहान मुले आहेत अशांना प्रत्येक मुलासाठी एक ओळख पत्र देण्यात येईल. कार्ड आजच भरू नयेत. घरी जाऊन ती काळजीपूर्वक भरावीत पण त्यांवर सह्‍या करू नयेत. पुढच्या आठवडी पुस्तक अभ्यासानंतर, पुस्तक अभ्यास संचालकाच्या देखरेखीखाली साक्षीदारांसमोर या कार्डांवर सही आणि तारीख टाकावी. सह्‍या करण्याआधी, कार्डांवर सर्व आवश्‍यक माहिती भरण्यात आली आहे याची खात्री करावी. साक्षीदार म्हणून सही करणाऱ्‍यांनी कार्ड धारकाला प्रत्यक्ष सही करताना पाहिल्यावरच स्वतः सही करावी. बाप्तिस्मा न झालेल्या प्रचारकांनी आपल्यासाठी आणि आपल्या मुलांसाठी या कार्डातल्या मजकुरावरून आपल्या परिस्थितीनुसार आणि विश्‍वासानुसार स्वतःच्या शब्दांत कार्ड तयार करावे. आगाऊ वैद्यकीय अधिकृत सूचना/जबाबदारीतून मुक्‍तता कार्ड भरण्यासाठी सर्वांना आवश्‍यक मदत मिळाली आहे याची खात्री करण्यासाठी पुस्तक अभ्यास चालवणाऱ्‍यांनी सर्वांच्या नावाची यादी तयार करावी.

गीत क्र. ६१ (१६) आणि समाप्तीची प्रार्थना.

जानेवारी ११ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ८८ (९)

१० मि:मंडळीच्या घोषणा. जमाखर्च अहवाल.

२० मि:“यहोवाने दाखवलेल्या जीवनाच्या मार्गावर चालत राहण्याचा—आपला संकल्प.” भाषण. मंडळीच्या पाचही सभांना नियमित येण्याचे सर्वांना प्रोत्साहन द्या.

१५ मि:“धीर धरा.” एका कुटुंबाच्या सदस्यांमध्ये चर्चा. सेवेत आणखी धीर दाखवण्यासाठी काय करता येईल याविषयी ते बोलतात. टेहळणी बुरूज, जून १५, १९९५ अंकातील पृष्ठ १२ वरून समर्पक मुद्दे सांगा.

गीत क्र. १३५ (६) आणि समाप्तीची प्रार्थना.

जानेवारी १८ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. १६९ (१७)

५ मि:मंडळीच्या घोषणा.

१० मि:मंडळीच्या गरजा.

१५ मि:“पुढाकार घेणारे पर्यवेक्षक—मंडळीचे पुस्तक अभ्यास संचालक.” एखाद्या आदर्श पुस्तक अभ्यास संचालकाने हे भाषण द्यावे आणि त्यात आपल्या जबाबदाऱ्‍यांविषयी स्पष्टीकरण द्यावे. त्याच्या कार्यामुळे सबंध मंडळीची प्रगती आणि आध्यात्मिक उभारणी कशी होते हे त्याने समजावून सांगावे. आपली सेवा पूर्ण करण्यासाठी संगठित, या पुस्तकातील ४३-५, ७४-६ या पृष्ठांवरून मुख्य मुद्दे सांगावेत.

१५ मि:प्रथम गोष्टींना प्रथम स्थान देण्याची खात्री करा! वडिलांनी हे भाषण द्यावे आणि श्रोत्यांसोबत चर्चा करावी. टेहळणी बुरूज सप्टेंबर १, १९९८ अंकातल्या १९-२१ पृष्ठांवरील लेखावर हे भाषण आधारित आहे.

गीत क्र. १९७ (६) आणि समाप्तीची प्रार्थना.

जानेवारी २५ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २०१ (८)

१० मि:मंडळीच्या घोषणा.

१५ मि:“पायनियरांसाठी आवश्‍यक असणाऱ्‍या तासांत बदल.” वडिलांचे भाषण. मंडळीतल्या पायनियरांच्या कार्याबद्दल प्रशंसा व्यक्‍त करा आणि जास्तीतजास्त प्रचारकांना सहायक आणि नियमित पायनियर सेवा सुरू करण्याचे प्रोत्साहन द्या; मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात आपण जादा कार्य करणार आहोत याची आठवण करून द्या. आमची राज्य सेवा याच्या फेब्रुवारी १९९७ आणि जुलै १९९८ अंकांतील पुरवण्यांमधून माहिती सांगा.

२० मि:तुम्ही शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करताहात का? भाषण आणि श्रोत्यांसोबत चर्चा. दरवर्षी संस्थेकडून आपल्याला शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करणे ही पुस्तिका मिळते. तुम्ही स्वतः किंवा तुमचे कुटुंब मिळून ती दररोज वाचता का? दररोजचे वचन वाचल्यामुळे कोणकोणते फायदे होतात हे स्पष्ट करा. शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करणे—१९९९, यातील ३-४ पानांवर दिलेल्या प्रस्तावनेतील मुद्द्‌यांची चर्चा करा. व्यक्‍तिगतपणे आणि कुटुंबासोबत अगदी न चुकता दररोजचे वचन आणि त्यावरील स्पष्टीकरण विचारात घेण्यासाठी कोणते खास प्रयत्न करावे लागतात हे सर्वांना सांगण्याचे प्रचारकांना निमंत्रण द्या.

गीत क्र. २२५ (९) आणि समाप्तीची प्रार्थना.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा