जुन्या पुस्तकांचा चांगला उपयोग करा
१ जगाच्या कानाकोपऱ्यांत असंख्य ग्रंथालयांमध्ये लाखो जुनी पुस्तके जपून ठेवलेली आहेत. पण या पुस्तकांमुळे मानवजातीला काही खरा कायमस्वरूपी फायदा झाला आहे का? (उप. १२:१२) त्यांच्या तुलनेत देवाचे राज्य आणि या राज्यात मानवजातीला कोणकोणते आशीर्वाद मिळतील याविषयी सांगणारी प्रकाशने कितीतरी पटीने अधिक मोलाची आहेत. जवळजवळ सगळ्याच मंडळ्यांकडे अशा निरनिराळ्या जुन्या पुस्तकांचा साठा आहे. जानेवारी महिन्यात हीच जुनी पुस्तके आपण लोकांना देणार आहोत.
२ खरोखर मोलाची: काहीजणांना कदाचित आपल्या नव्या पुस्तकांच्या तुलनेत ही पुस्तके जुनाट वाटतील पण यांतही बायबलमधील सत्य आहे हे आपण आठवणीत ठेवले पाहिजे. यांत स्पष्ट करण्यात आलेला राज्याचा संदेश आजही तितकाच मोलाचा असून त्याकडे लक्ष दिल्याने लोकांचे जीवन बचावू शकते. (योहा. १७:३) त्यामुळे, या जुन्या पुस्तकांचा चांगल्यात चांगला उपयोग करण्यासाठी आपण खास प्रयत्न केला पाहिजे.
३ ही पुस्तके किती मोलाची आहेत हे एका अनुभवावरून स्पष्ट होते; एका बाईला तिच्या आजीच्या मृत्यूनंतर वॉचटावर संस्थेने प्रकाशित केलेली तिच्या आजीची बरीच पुस्तके मिळाली. यहोवाच्या साक्षीदारांपैकी एकीने तिला विचारले की ही पुस्तके किती मोलवान आहेत याची तुम्हाला कल्पना आहे का? त्या बाईने उत्तर दिले, नाही, पण मला जाणून घ्यायला आवडेल, मी काय करावं? ती बायबलचा अभ्यास करायला तयार झाली आणि कालांतराने ती सत्यात आली; त्यानंतर तिने आपल्या आजीची ती सर्व पुस्तके अगदी जपून ठेवली. त्या जुन्या पुस्तकांमुळे तिला झालेला फायदा पैशात मोजता येणार नाही!
४ ही पुस्तके देण्याकरता संधी शोधा: घरोघरच्या कार्यातच नव्हे, तर आपली पुस्तके वाचण्याची ज्यांना आवड आहे अशा लोकांकडे पुनर्भेट करतानाही तुम्ही ही जुनी पुस्तके नेऊ शकता; शिवाय टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिकांची वर्गणी करणाऱ्यांना आणि तुमच्या नियतकालिक मार्गात सामील असणाऱ्यांनाही ही पुस्तके देता येतील. तुम्ही ज्यांचा बायबल अभ्यास घेता अशांनाही या जुन्या पुस्तकांतील काही निवडक पुस्तके द्यावीत कारण त्यामुळे त्यांना बायबलचे मूलभूत ज्ञान मिळते आणि यामुळे त्यांना सत्य आणखी स्पष्टपणे समजू लागते. तुमच्या जवळही या पुस्तकांपैकी काही पुस्तके नसतील तर आपल्या वैयक्तिक संग्रहासाठी ती पुस्तके घ्यायला विसरू नका. अशाप्रकारे, तुमचा एक चांगला ईश्वरशासित ग्रंथसंग्रह तयार होईल आणि यामुळे तुम्हाला वैयक्तिक अभ्यास करणेही आणखी सोयीस्कर होईल.
५ आपली ही जुनी पुस्तके नुसतीच साठवून ठेवण्याऐवजी आपल्याला भेटणाऱ्या लोकांना ‘देवाचे भय मानून त्याच्या आज्ञा पाळण्याचे’ प्रोत्साहन देण्याकरता आपण त्यांचा पुरेपूर उपयोग करू.—उप. १२:१३.