वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/९८ पृ. २
  • डिसेंबरसाठी सेवा सभा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • डिसेंबरसाठी सेवा सभा
  • आमची राज्य सेवा—१९९८
  • उपशिर्षक
  • डिसेंबर ७ ने सुरू होणारा सप्ताह
  • डिसेंबर १४ ने सुरू होणारा सप्ताह
  • डिसेंबर २१ ने सुरू होणारा सप्ताह
  • डिसेंबर २८ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—१९९८
km १२/९८ पृ. २

डिसेंबरसाठी सेवा सभा

डिसेंबर ७ ने सुरू होणारा सप्ताह

गीत १८६ (२२)

१० मि: मंडळीच्या घोषणा. आमची राज्य सेवा यातून निवडलेल्या घोषणा.

१५ मि: “वारंवार जाणे आवश्‍यक.” प्रश्‍नोत्तरे. यहेज्केल ३:१७-१९ या वचनांबद्दल थोडक्यात सांगून, येणाऱ्‍या संकटाचा इशारा देत राहण्याची आपली जबाबदारी किती महत्त्वाची आहे यावर जोर द्या.

२० मि: “न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशनची ऑफर.” एखाद्या बांधवाने या लेखाची दोन किंवा तीन अनुभवी पब्लिशर्ससोबत चर्चा करावी. “प्रत्येक शास्त्रवचन” (इंग्रजी) पुस्तकातल्या ३२७-३१ पानांवरून या विषयाशी संबंधित असणारे मुद्दे घ्यावेत. डिसेंबरची ही खास ऑफर कशी करावी याचे प्रात्यक्षिक करून दाखवावे.

गीत १७६ (८) आणि समाप्तीची प्रार्थना

डिसेंबर १४ ने सुरू होणारा सप्ताह

गीत २०६ (६)

१० मि: मंडळीच्या घोषणा. अकाउंट्‌स रिपोर्ट. सणावारांना लोक शुभेच्छा देतात तेव्हा समंजसपणे कसे उत्तर देता येईल यावर काही सूचना द्या. मंडळीकडे सर्वश्रेष्ठ मनुष्य किंवा थोर शिक्षक या पुस्तकांचा स्टॉक असल्यास ख्रिसमसच्या दिवसांत प्रचार करताना या पुस्तकांचा कसा चांगला उपयोग करता येईल हे दाखवा. २५ डिसेंबर आणि १ जानेवारी रोजी प्रचार कार्यासाठी कोणत्या खास व्यवस्था करण्यात आल्या आहेत ते सांगा.

१५ मि: “पुढाकार घेणारे ओव्हरसियर—टेहळणी बुरूज अभ्यास घेणारा.” हे भाषण टेहळणी बुरूजचा अभ्यास घेणाऱ्‍याने द्यावे. आपल्या जबाबदाऱ्‍यांबद्दल खुलासा केल्यावर, तो अभ्यासाला उपस्थित राहणाऱ्‍या सगळ्यांना हा अभ्यास आणखी उत्साहपूर्ण, माहितीपूर्ण आणि आध्यात्मिक दृष्टीनेही उभारणीकारक बनवण्यासाठी कसा हातभार लावता येईल हे सांगतो.—आपली सेवा, ६७ व्या पानावर पाहा.

२० मि: “आपला वेगळेपणा दिसून येतो.” प्रश्‍नोत्तरे. चर्चेदरम्यान, आपला वेगळेपणा दाखवून देणाऱ्‍या प्रत्येक वैशिष्ट्याचा थोडक्यात समावेश करावा. सत्य शिकण्याची उत्सुकता बाळगणाऱ्‍यांना संस्थेच्या जवळ आणण्यासाठी, तसेच, सत्य शिकून त्याप्रमाणे चालणाऱ्‍यांमध्ये किती उत्तम ख्रिस्ती गुण निर्माण होतात हे त्यांना दाखवण्यासाठी या लेखाचा उपयोग करता येईल याचा उल्लेख करा.

गीत १४६ (११) आणि समाप्तीची प्रार्थना.

डिसेंबर २१ ने सुरू होणारा सप्ताह

गीत १६३ (२३)

८ मि: मंडळीच्या घोषणा. नव्या वर्षाच्या सुरवातीपासून मंडळीच्या सभांच्या वेळा बदलणार असाल, तर सर्वांना पूर्वीसारखेच नियमित सभांना येत राहण्याचे प्रोत्साहन द्या. बायबल अभ्यास करणाऱ्‍या आणि सुवार्तेविषयी आवड बाळगणाऱ्‍या इतरांना या बदललेल्या वेळांची सूचना देण्याची सर्व पब्लिशर्सना आठवण करून द्या. तसेच सर्वांना आमची राज्य सेवा याचा प्रत्येक अंक, विशेषतः अंकासोबत येणाऱ्‍या पुरवण्या जपून ठेवायला सांगा कारण पुढे पुन्हा ते विषय कदाचित अधूनमधून विचारात घेतले जातील. पुढच्या आठवडी सेवा सभेसाठी आमची राज्य सेवा मे १९९८ चा अंक घेऊन येण्याची आठवण करून द्या.

१२ मि: मंडळीच्या गरजा.

२५ मि:“यहोवाची सेवा जीवनात केंद्रस्थानी ठेवा.” प्रश्‍नोत्तरे. बऱ्‍याच काळापासून दर आठवडी प्रचार कार्यात नियमित भाग घेणाऱ्‍या एखाद्या अविवाहित व्यक्‍तीची आणि कुटुंब प्रमुखाची मुलाखत घ्या. आध्यात्मिक गोष्टींना इतर गोष्टींपेक्षा जास्त महत्त्व देण्यासाठी स्वतःच्या कामांत कोणकोणते फेरबदल आणि तडजोडी कराव्या लागतात या संदर्भात त्यांना बोलायला सांगा.

गीत ११९ (१७) आणि समाप्तीची प्रार्थना.

डिसेंबर २८ ने सुरू होणारा सप्ताह

गीत १७८ (२०)

१० मि: मंडळीच्या घोषणा. डिसेंबरचे प्रचार कार्याचे रिपोर्ट टाकण्याची सर्वांना आठवण करून द्या. जानेवारीच्या लिटरेचर ऑफरसाठी मंडळीत उपलब्ध असणारी जुनी पुस्तके दाखवा आणि येत्या शनिवार-रविवारच्या प्रचारासाठी पुस्तके घेण्याचे सर्वांना प्रोत्साहन द्या.

१० मि: “१९९९ च्या थियोक्रॅटिक मिनिस्ट्री स्कूल कार्यक्रमाचा पुरेपूर फायदा करून घ्या.” थियोक्रॅटिक मिनिस्ट्री स्कूल ओव्हरसियरचे भाषण. दर आठवड्याचा “अतिरिक्‍त बायबल-वाचन आराखडा” पाळल्यामुळे कोणते फायदे मिळाले हे काही पब्लिशर्सना विचारा. सर्वांना देवाचे वचन दररोज वाचण्याचे प्रोत्साहन द्या.

२५ मि: आमची राज्य सेवा मे १९९८ अंकातील “पाहिजेत—आणखीन बायबल अभ्यास” असे शीर्षक असलेल्या पुरवणीची उजळणी घ्या. मे १९९८ पासून बायबल अभ्यास किती वाढले ते सांगा. ज्यांच्याकडे बायबल अभ्यास नाही अशांना हा लेख वेळोवेळी प्रार्थनापूर्वक विचारात घेण्याचे प्रोत्साहन द्या. ज्यांच्याकडे आधीपासूनच बायबल अभ्यास आहे त्यांचाही आणखीन बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी उत्साह वाढवा.

गीत १९५ (८) आणि समाप्तीची प्रार्थना.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा