न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशनची ऑफर
१ “न्यू वर्ल्ड [ट्रान्सलेशन] हा खरंच एक संग्राह्य ग्रंथ आहे. प्रेरणादायक आणि जिवंत भाषेत लिहिलेला हा ग्रंथ वाचकाला विचार करायला आणि बारकाईने अभ्यास करायला लावतो. पण हे केवळ बायबलच्या इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यांचे लिखाण नसून देवाबद्दल आणि त्याच्या वचनाबद्दल आदर असणाऱ्या विद्वानांचे लिखाण आहे.” या शब्दांत एका नामवंत हिब्रू आणि ग्रीक भाष्यकाराने न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशनची प्रशंसा केली. त्यांच्या म्हणण्याशी आम्ही देखील सहमत आहोत. डिसेंबर महिन्यात आपण ज्ञान पुस्तकाच्या जोडीने न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफर करणार आहोत. तेव्हा, लोकांनाही या भाषांतराचे खरे मोल कळावे म्हणून आपल्याला काय करता येईल?
२ काही लोक आपल्याला म्हणतील, “आमच्याजवळ बायबल आहे, आणखी एक कशाला.” या लोकांना आपल्याला हे दाखवून द्यायचे आहे की न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन काही सर्वसामान्य बायबल भाषांतर नाही. हे आजच्या प्रचलित भाषेत केलेले शब्दशः भाषांतर असून मूळ हिब्रू मजकुराचा अगदी अचूक अर्थ यात आपल्याला मिळतो. इतर भाषांतरांपेक्षा हे कसे समजायला सोपे आहे हे दाखवण्यासाठी १ करिंथकर १०:२५ या वचनाचे उदाहरण देता येईल; “शॅम्बल्स” (किंग जेम्स व्हर्शन) या शब्दाऐवजी न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशनमध्ये या वचनात “मीट मार्केट” हा सोपा आणि अचूक शब्द वापरलेला आहे.
३ पण, फार कमी लोक बायबल वाचतात; त्यामुळे दररोजच्या जीवनात बायबलची तत्त्वे कशी उपयोगी पडतात हे त्यांना माहीतच नसते. आपल्याला त्यांना ही जाणीव करून द्यावी लागेल की देवाच्या वचनाचा त्यांच्या जीवनावर किती चांगला परिणाम होऊ शकतो; शिवाय, प्रामाणिकपणा, चांगले चालचलन आणि कौटुंबिक जीवन यांसारख्या विषयांवर बायबलचा सल्ला पाळल्यामुळे आजच्या समस्यांनाही तोंड देणे कसे सोपे जाते हे देखील त्यांना दाखवावे लागेल. पण हे त्यांना सांगायचे कसे?
४ असे म्हणून पाहा: “आजकाल लोकांच्या चांगल्यावाईटाच्या कल्पना दिवसेंदिवस बदलत चालल्या आहेत; भविष्यात काय होईल हेही कोणाला सांगता येत नाही. तेव्हा तुम्हाला नाही वाटत, आपल्याला जीवनात काहीतरी खात्रीलायक मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे? [उत्तरासाठी थांबा.] बायबल हे सर्वात जुने पुस्तक असले तरीसुद्धा, आजच्या काळात उपयोगी पडणारे तसेच कौटुंबिक जीवनातही आनंद मिळवण्यासाठी अगदी उपयुक्त मार्गदर्शन यात सापडते.” ज्ञान पुस्तकातला २ रा अध्याय काढून १० वा परिच्छेद आणि ११ व्या परिच्छेदाचे पहिले वाक्य, सोबतच २ तीमथ्य ३:१६, १७ वाचा. त्या व्यक्तीला आणखी जाणून घेण्याची उत्सुकता आहे असे दिसले, तर ज्ञान पुस्तक दाखवा. त्यानंतर, आपण घरी येऊन मोफत बायबल अभ्यास कसा घेतो ते समजावून सांगा आणि न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन दाखवा. किंवा सुरवातीला अपेक्षा ब्रोशरमधून अभ्यास करणे बरे पडेल असे तुम्हाला वाटत असेल, तर तसे करा. पवित्र शास्त्रीय चर्चा कशा सुरू कराव्या या बुकलेटच्या ९-१५ पानांवर आणखी काही प्रस्तावना सुचवलेल्या आहेत.
५ डिसेंबर महिन्यात, प्रत्येक संधीला न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफर करून आपल्याला या सरस भाषांतराबद्दल किती कदर आहे, हे दाखवता येईल.