ईश्वरशासित सेवा प्रशालेची चाचणी
ईश्वरशासित सेवा प्रशालेत सप्टेंबर ७ ते डिसेंबर २१, १९९८ पर्यंतच्या आठवड्यांच्या दरम्यान हाताळल्या गेलेल्या साहित्यावर आधारित पुस्तकांचा वापर न करता घेण्यात येणारी चाचणी. नेमून दिलेल्या वेळेत तुम्हाला जितक्या प्रश्नांची उत्तरे देता येतील ती लिहिण्यासाठी वेगळ्या कागदाचा वापर करावा.
[सूचना: चाचणी परीक्षेच्या वेळी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी केवळ बायबल वापरावे. प्रश्नानंतर जो संदर्भ लिखित आहे तो केवळ तुमच्या व्यक्तिगत संशोधनासाठी आहे. टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या संदर्भात प्रत्येक ठिकाणी पृष्ठ व परिच्छेद क्रमांक देण्यात येतीलच असे नाही.]
पुढील विधानांची उत्तरे, बरोबर किंवा चूक यात द्या:
१. “कृपादान” हा २ तीमथ्य १:६ मधील शब्द, देवाच्या पवित्र आत्म्याच्या कार्याद्वारे विविध भाषांमध्ये बोलण्याचे तीमथ्याला जे सामर्थ्य दिले होते त्याला सूचित करतो. [साप्ताहिक बायबल वाचन; w८५ ५/१ पृ. १६ परि. १५ पाहा.]
२. एक प्रौढ ख्रिस्ती, देवाच्या वचनाविषयी त्याच्याजवळ जितके ज्ञान आहे त्याचा उपयोग करण्याच्या सवयीद्वारे ‘चांगले आणि वाईट समजण्याकरता आपल्या ज्ञानेंद्रियांना तालीम देतो.’ (इब्री ५:१४) [साप्ताहिक बायबल वाचन; w८५ ६/१५ पृ. ९ परि. ७ पाहा.]
३. यहोवा “वाइटांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगवितो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडितो” ही वस्तुस्थिती सूचित करते की मानवी कुटुंबाबरोबरच्या त्याच्या सर्व व्यवहारांमध्ये यहोवाने सातत्याने निःपक्षपातीपणा दाखवला आहे. (मत्त. ५:४५) [w-MR९६ ११/१५ पृ. २५ परि. ७]
४. बायबल लेखक याकोब हाच सुंतेविषयी निर्णय घ्यावयास जमलेल्या “प्रेषित व वडीलवर्ग” यांचा प्रवक्ता आहे. (प्रे. कृत्ये. १५:६, १३; याको. १:१) [si पृ. २४८ परि. २-३]
५. पेत्राने त्याचे पहिले पत्र लिहिले तेव्हा तो बॅबिलोनमध्ये होता असे १ पेत्र ५:१३ मध्ये म्हटले असले तरी, बॅबिलोन हे नाव रोमसाठी गूढार्थाने वापरण्यात आले आहे असे पुरावा शाबीत करतो. [si पृ. २५१ परि. ४]
६. “ख्रिस्तविरोधक येणार” ही १ योहान २:१८ मधील अभिव्यक्ती एका व्यक्तीला उल्लेखून आहे. [साप्ताहिक बायबल वाचन; rs पृ. ३२ परि. ३ पाहा.]
७. त्याला घरात घेऊ नका व त्याचे क्षेमकुशल विचारू नका, ही २ योहान १० मधील आज्ञा, खोट्या शिकवणुकी देणाऱ्यांसाठीच आहे. [साप्ताहिक बायबल वाचन; w-MR८६ ६/१ पृ. ३० परि. १-३ पाहा.]
८. प्रकटीकरणाचे पुस्तक बायबलचे शेवटले पुस्तक म्हणून मांडण्यात आले आहे कारण प्रेषित योहानाने ते सर्वात शेवटी लिहिले. [si पृ. २६३ परि. १]
९. प्रकटीकरण १३:११-१५ अचूकपणे चित्रित करते, की अँग्लो-अमेरिकन जागतिक सत्ता, राष्ट्र संघ आणि तिच्यामागून आलेली तिची वारस संयुक्त राष्ट्रसंघाची प्रधान पुरस्कर्ती व जीवन देणारी कशी ठरली. [साप्ताहिक बायबल वाचन; w-MR८८ १२/१ पृ. २५ परि. ३ पाहा.]
१०. बायबल मद्य पिण्यास अनुमती देत असल्यामुळे स्थानीय रीतीरिवाज आणि परंपरा यांच्यानुसार त्यांचे सेवन करणे उचित ठरेल. (स्तोत्र. १०४:१५) [w-MR९६ १२/१५ पृ. २७ परि. ५]
पुढील प्रश्नांची उत्तरे द्या:
११. पर्यवेक्षकाने “मारका” असू नये म्हणजे काय? (तीत १:७) [साप्ताहिक बायबल वाचन; w-MR९१ ५/१ पृ. १९ परि. २१ पाहा.]
१२. देणे हा खऱ्या उपासनेचा भाग आहे असे यहोवा का अपेक्षितो याची दोन कारणे सांगा. [w-MR९६ ११/१ पृ. २९ परि. ३-६; पृ. ३० परि. ३]
१३. “यज्ञ व अन्नार्पण ह्यांची तुला इच्छा नव्हती,” असे जेव्हा येशूने म्हटले तेव्हा त्याचा बोलण्याचा काय अर्थ होता? (इब्री १०:५) [साप्ताहिक बायबल वाचन; w-MR९६ ७/१ पृ. १४ परि. ३ पाहा.]
१४. ख्रिस्ती लोक “जगावर जय” कसे मिळवू शकतात? (१ योहान ५:३, ४) [si पृ. २५८ परि. १२]
१५. ‘देवाचा दिवस येण्याची वाट पाहणे’ या पेत्राने उल्लेखलेल्या अभिव्यक्तीत काय समाविष्ट आहे? (२ पेत्र ३:११) [साप्ताहिक बायबल वाचन; w-MR९७ ९/१ पृ. १९ परि. २ पाहा.]
१६. पहिले योहान २:२ मधील कोणते मुख्य शब्द आपल्याला, येशूच्या बलिदानरूपी मृत्यूपासून फायदा मिळवणारे दोन गट ओळखण्यास मदत करतात? [साप्ताहिक बायबल वाचन; w-MR९० ८/१ पृ. १६ परि. ११ पाहा.]
१७. प्रकटीकरण १:७ च्या सुसंगतेत, येशूला ज्यांनी भोसकले ते त्याला “मेघांसहित” येताना कसे पाहतील? [साप्ताहिक बायबल वाचन; ssb ४/१ पृ. ६१ परि. ७ पाहा.]
१८. येशू ख्रिस्ताने इस्राएल लोकांमध्ये साडेतीन वर्षे प्रचार केला तरी बहुतांश लोकांनी त्याचा मशीहा म्हणून स्वीकार का केला नाही? [w-MR९६ ११/१५ पृ. २९ परि. १, ६; पृ. ३० परि. ३]
१९. प्रकटीकरण १३:१, २ मध्ये जागतिक सरकारांना “श्वापद” असे संबोधणे उचित का आहे? [साप्ताहिक बायबल वाचन; w-MR८९ ४/१ पृ. २० परि. १७ पाहा.]
२०. प्रकटीकरण ४:४ मधील “चोवीस वडील” कोणाला चित्रित करतात आणि त्यांचे “मुगूट” व “आसने” यावरून आपल्याला काय आठवते? [साप्ताहिक बायबल वाचन; w९५ ७/१ पृ. १३ परि. १७ पाहा.]
पुढे दिलेली विधाने पूर्ण करण्यास शब्द किंवा वाक्यांश पुरवा:
२१. पौलाने तीमथ्याला लिहिलेले दुसरे पत्र _________________________सा.यु. _____________________ या वर्षी लिहिले, व तीमथ्य कदाचित अजूनही _____________________ येथेच होता. [si पृ. २३७ परि. ३]
२२. आपल्यापुढे असलेल्या शर्यतीत पळण्याकरता आपण सर्व भार तसेच आपल्याला सहजासहजी फंदात पाडणारे _________________________ अर्थात _________________________ बाजूला सारणे आवश्यक आहे. [साप्ताहिक बायबल वाचन; w-MR९८ १/१ पृ. १० परि. १५ पाहा.]
२३. प्रेषित पेत्र २ पेत्र १:५-८, मध्ये, _________________________ किंवा _________________________ होण्यापासून रोखणारे ईश्वरी गुण वाढवण्याकरता _________________________ करण्याची शिफारस करतो. [si पृ. २५५ परि. ९]
२४. प्रकटीकरण ६:१-८ मधील अग्निवर्ण घोड्याचा स्वार _________________________ चित्रित करतो; काळ्या घोड्याचा स्वार _________________________ चित्रित करतो; मृत्यू फिकट घोड्याचा स्वार होता, मरी आणि इतर कारणांमुळे येणारे _________________________ याला सूचित करतो. [साप्ताहिक बायबल वाचन; w-MR८७ २/१ पृ. ३ वरील चौकोन पाहा.]
२५. ख्रिस्तापूर्वी, _________________________ यहुद्यांनी ग्रीकांकडून _________________________ शिकवण आत्मसात करण्यास सुरवात केली हे स्पष्ट आहे. [w-MR९६ ८/१ पृ. ६ परि. २-३]
पुढील विधानांतून अचूक उत्तर निवडा:
२६. पौलाच्या रोममधील पहिल्या कारावासादरम्यान (फिलीप; फेस्त; फिलेमोन) याच्या घराण्यातून पळून आलेला (अनेसिफर; अनेसिम; ओनान) हा दास, पौलाचा प्रचार ऐकणाऱ्यांपैकी होता. [si पृ. २४१ परि. २]
२७. पौलानेच इब्री लोकांस पत्र लिहिले याला (बाहेरून; अंतर्गत; लौकिक) पुरावा मिळतो, जसे की (तीमथ्य; तीत; याकोब) यांच्यासमवेत पौलाचे (स्पेन; क्रीट; इटली) येथील वास्तव्य. [si पृ. २४३ परि. ३]
२८. इब्री लोकांस ११:१० मधील ‘पाये असलेले नगर’ (पुनः बांधलेले जेरुसलेम; यहेज्केल ४८:३५ मध्ये उल्लेखलेले नगर; मशीही राज्य) सूचित करते. [si पृ. २४७ परि. २६]
२९. यहुदा ८ मध्ये उल्लेखण्यात आलेले “प्रभुत्व” (येशूच्या पदाला; यहोवाच्या सार्वभौमत्वाला; ख्रिस्ती मंडळीतील देव-प्रदत्त अधिकाराला) सूचित करते. [si पृ. २६३ परि. ९]
३०. प्रकटीकरण ११:११ मध्ये, अभिषिक्त शेषांच्या शत्रूंना ते ‘साडेतीन दिवसांपर्यंत’ प्रेतांप्रमाणे जे वाटले ते (साडेतीन वर्षांना; अल्प समयाला; साडेतीन महिन्यांना) सूचित करतात. [साप्ताहिक बायबल वाचन; re पृ. १६७ परि. २१ पाहा.]
पुढील शास्त्रवचने खालील विधानांशी जुळवा:
१ करिंथ. ६:९-११; इब्री २:१; इब्री १०:३२; याको. ४:१५; १ पेत्र ३:४
३१. या जगाच्या मतप्रसाराचा आपल्यावर होणारा सतत भडिमार याचा विरोध करण्याकरता आपण अभ्यासाच्या चांगल्या सवयींद्वारे व बायबल वाचनाच्या चांगल्या वेळापत्रकाद्वारे देवाच्या वचनाकडे “विशेष लक्ष लाविले पाहिजे.” [साप्ताहिक बायबल वाचन; w-MR९८ १/१ पृ. ७ परि. ९ पाहा.]
३२. भवितव्यासाठी आपण योजना करतो तेव्हा त्या योजना देवाच्या उद्देशांनुरूप कशा आहेत यावर आपण प्रार्थनापूर्वक विचार केला पाहिजे. [साप्ताहिक बायबल वाचन; w-MR९७ ११/१५ पृ. २१ परि. १०-११ पाहा.]
३३. ख्रिस्ती पत्नीच्या व मातेच्या ‘सौम्य व शांत आत्म्यामुळे’ केवळ तिचा पतीच नव्हे तर मुख्य म्हणजे देव संतुष्ट होतो. [साप्ताहिक बायबल वाचन; w-MR९० ४/१ पृ. २४ परि. १२ पाहा.]
३४. आध्यात्मिक युद्धातील एकनिष्ठेच्या गत काळातील आपल्या कृत्यांची आठवण केल्याने आपल्याला जीवनाची शर्यत संपविण्यास लागणारे धैर्य मिळू शकते. [w-MR९६ १२/१ पृ. २९ परि. ३]
३५. यहोवाचे साक्षीदार, अपश्चात्तापी मद्यप्यास ख्रिस्ती मंडळीत राहू देत नाहीत. [w-MR९६ १२/१५ पृ. २५ परि. ३]