वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/९८ पृ. ७
  • प्रश्‍न पेटी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रश्‍न पेटी
  • आमची राज्य सेवा—१९९८
  • मिळती जुळती माहिती
  • अक्रियाशील झालेल्यांना विसरू नका
    आमची राज्य सेवा—२००७
  • प्रश्‍न पेटी
    आमची राज्य सेवा—२०००
  • “माझ्याकडे परत या”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२०
  • लवकरात लवकर परतण्यास त्यांना साहाय्य करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९८
km ११/९८ पृ. ७

प्रश्‍न पेटी

◼ काँग्रीगेशन सर्व्हिस कमिटीतल्या एखाद्या सदस्याच्या सांगण्यावर, आध्यात्मिकदृष्ट्या निष्क्रिय झालेल्या बंधू किंवा बहिणीसोबत गृह बायबल अभ्यास करणे अजूनही आवश्‍यक आहे का?

मेंढपाळ या नात्याने मंडळीत असलेल्या सगळ्यांचे पालन करणे ही वडिलांची जबाबदारी आहे; मग यांत आध्यात्मिकदृष्ट्या निष्क्रिय झालेले देखील आलेच. मंडळीतले वडील अशांना भेटी देऊन त्यांना कोणत्या प्रकारची मदत हवी आहे ते पाहतात. आणि गरज असल्यास अशा निष्क्रिय व्यक्‍तीसाठी व्यक्‍तिगत बायबल अभ्यासाची व्यवस्था करतात. आपली सेवा पूर्ण करण्यासाठी संघटित या पुस्तकात १०३ पानावर असे म्हटले आहे, की ही तरतूद कोणासाठी करण्यात यावी हे काँग्रीगेशन सर्व्हिस कमिटी ठरवते.

आध्यात्मिकदृष्ट्या निष्क्रिय झालेल्या व्यक्‍तीला कोण सगळ्यात चांगल्या प्रकारे मदत करू शकेल, कोणकोणत्या विषयांचा अभ्यास केला जावा आणि कोणते प्रकाशन त्या व्यक्‍तीसाठी सगळ्यात लाभदायक ठरेल हे सर्व्हिस ओव्हरसियर ठरवतो. सुरवातीला ज्या प्रचारकाने या व्यक्‍तीसोबत अभ्यास केला होता त्यानेच पुन्हा अभ्यास घेतला तर बरे राहील. किंवा मग ज्या प्रचारकाशी या व्यक्‍तीची चांगली ओळख आहे, ज्याच्याबद्दल तिला आदर वाटतो असा एखादा प्रचारक देखील अभ्यास घेऊ शकतो. एखादी कार्यक्षम, अनुभवी बहीण एका निष्क्रिय बहिणीला मदत करू शकते. सहसा, अभ्यास घेण्यास नेमून दिलेल्या व्यक्‍तीसोबत दुसऱ्‍या प्रचारकाने जाण्याची आवश्‍यकता नसते. अभ्यास घेणाऱ्‍या व्यक्‍तीला आपल्या क्षेत्र सेवेच्या रिपोर्टमध्ये हा खर्च झालेला वेळ, घेतलेली पुनर्भेट आणि बायबल अभ्यास दाखवता येईल.—नोव्हेंबर १९८७ ची आमची राज्य सेवा (इंग्रजी), पृष्ठे १-२ पाहा.

अशा विद्यार्थ्याचा आधीच बाप्तिस्मा झालेला असतो; म्हणून अधिक काळापर्यंत त्याच्यासोबत अभ्यास करत राहण्याची सहसा गरज नसते. कारण निष्क्रिय झालेल्या व्यक्‍तीला मंडळीच्या सर्व सभांना उपस्थित राहण्यास तसेच सुवार्तेचा नियमित प्रचारक बनण्यास मदत करणे हा आपला मुख्य उद्देश आहे. या अभ्यासांची प्रगती कशी चालली आहे यावर सर्व्हिंस ओव्हरसियर लक्ष ठेवील. त्याच्या या प्रेमळ साहाय्यामुळे निष्क्रिय झालेले बंधुभगिनी यहोवाप्रती असलेली आपापली जबाबदारी ओळखून सत्यात ‘रुजतील आणि स्थिरावतील.’—इफिस. ३:१७ कॉमन लँग्वेज बायबल; गलती. ६:५.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा