वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/९८ पृ. ७
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—१९९८
आमची राज्य सेवा—१९९८
km ११/९८ पृ. ७

घोषणा

◼ नोव्हेंबरसाठी साहित्य सादरता: सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान. डिसेंबर: नवे जग भाषांतर यासोबतच सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान. जानेवारी: हाफ-रेट व स्पेशल-रेट पुस्तकांच्या यादीतली कोणतीही १९२ पृष्ठांची जुनी पुस्तके.

◼ हल्ली परदेशी जाणे-येणे अगदी सहजसोपे झाले आहे. त्यामुळे आपल्या अनेक बांधवांनी इतर देशांना भेटी देण्याच्या योजना आखल्या आहेत. आणि याविषयी अधिक माहितीसाठी ते वारंवार संस्थेच्या शाखा दफ्तरांशी संपर्क साधतात. बांधवांना तिथल्या मंडळ्यांशी संपर्क साधता यावा म्हणून किंग्डम हॉल्सचे पत्ते आणि सभांच्या वेळा अशी माहिती संस्था पुरवू शकते. तसेच शाखा दफ्तराला भेट देता यावी म्हणून त्याविषयीची माहिती देखील संस्था देऊ शकते. परंतु, मिळालेल्या रिपोट्‌र्सवरून असे दिसून आले आहे, की प्रवासाची व्यवस्था, राहण्याची सोयी, प्रेक्षणीय स्थळे आणि अशा इतर गोष्टींची देखील काहीजण शाखा दफ्तराकडे विचारपूस करतात. शाखा दफ्तरे ही माहिती पुरवू शकत नाहीत आणि अशा प्रकारची माहिती पुरवण्यासाठी वेळही नसतो. म्हणून परदेशी भेट देणाऱ्‍यांनी ट्रॅव्हेल एजंट्‌सशी किंवा टुरिस्ट विभागांशी संपर्क साधावा जे सहसा अशी माहिती पुरवतात.

◼ आम्हाला हे सांगण्यास आनंद होतो, की सप्टेंबर १, १९९८ पासून भारतात तीन नवीन सर्किट्‌सची स्थापना झाली आहे; केरळमध्ये नव्वे सर्किट; तमीळ नाडूमध्ये सहावे सर्किट आणि आंध्र प्रदेशमध्ये तिसरे सर्किट. याचा अर्थ, आता देशभरात एकूण २७ सर्किट्‌स आहेत.

◼ पूर्वी, बांगला देश आणि नेपाळमध्ये चाललेल्या कार्यावर भारतीय शाखेची देखरेख होती; पण, सप्टेंबर १, १९९८ पासून जपानची शाखा ही देखरेख करत आहे.

◼ उपलब्ध असलेली नवीन प्रकाशने:

यहोवाच्या साक्षीदारांचा काय विश्‍वास आहे? (ट्रॅक्ट क्र. १४)

शांतीदायक नवीन जगातील जीवन (ट्रॅक्ट क्र. १५)

मृत प्रिय जनांसाठी कोणती आशा? (ट्रॅक्ट क्र. १६)

[वरील नवीन प्रकाशने आसामी आणि कोकणी (रोमन लिपी) भाषांत उपलब्ध आहेत]

◼ पुन्हा उपलब्ध असलेली प्रकाशने:

खिन्‍न झालेल्यांना सांत्वन (ट्रॅक्ट क्र. २०)—उर्दू तुम्ही त्रैक्यावर विश्‍वास ठेवावा का? —तमीळ

◼ उपलब्ध असलेल्या नवीन व्हीडिओकॅसेट्‌स:

नोआ—ही वॉक्ड विथ द ट्रू गॉड —इंग्रजी

[२५ मिनिटांचा हा व्हीडिओ खास मुलांसाठी तयार केलेला आहे. यामध्ये बायबलमधल्या विश्‍वासू नोहाचे आणि त्याच्या कुटुंबाचे चित्र उभे केलेले आहे; या व्हीडिओमध्ये आर्टवर्क आणि स्पेशल इफेक्टचा सुंदर मिलाफ आहे. ऑर्केस्ट्रा संगीत आणि साउंड इफेक्टमुळे बायबलमधली ही गोष्ट अतिशय चांगल्याप्रकारे प्रदर्शित करण्यात आली आहे. मुलांना शिकवण्यासाठी आईवडील व्हीडिओच्या कव्हरवर दिलेल्या प्रश्‍नांचा उपयोग करू शकतात.]

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा