वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १०/९८ पृ. २
  • ऑक्टोबरसाठी सेवा सभा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ऑक्टोबरसाठी सेवा सभा
  • आमची राज्य सेवा—१९९८
  • उपशिर्षक
  • ऑक्टोबर ५ ने सुरू होणारा सप्ताह
  • ऑक्टोबर १२ ने सुरू होणारा सप्ताह
  • ऑक्टोबर १९ ने सुरू होणारा सप्ताह
  • ऑक्टोबर २६ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—१९९८
km १०/९८ पृ. २

ऑक्टोबरसाठी सेवा सभा

सूचना: येणाऱ्‍या महिन्यांत आमची राज्य सेवा यात दर आठवड्याच्या सेवा सभेचा कार्यक्रम नेहमीप्रमाणेच दिलेला असेल. पण, “ईश्‍वरी जीवनाचा मार्ग” अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी आणि मग पुढच्या आठवड्याच्या सेवा सभेत कार्यक्रमातील मुख्य मुद्द्‌यांच्या ३० मिनिटांच्या उजळणीसाठी या सभांमध्ये आवश्‍यक ते बदल करता येतील. अधिवेशनच्या प्रत्येक दिवसाच्या मुख्य मुद्द्‌यांचा पुनर्विचार करण्यासाठी तीन सुयोग्य बांधवांना आधीपासूनच सांगण्यात यावे जेणेकरून ते चांगली तयारी करून अधिवेशनातले लक्षवेधक मुद्दे मंडळीपुढे मांडू शकतील. यामुळे दररोजच्या जीवनात आणि क्षेत्र सेवेत उपयोगी पडतील असे मुद्दे सर्वांना आठवणीत ठेवता येतील. श्रोत्यांपैकी कोणाला एखादा मुद्दा किंवा अनुभव सांगायचा असेल तर तो थोडक्यात आणि विषयाला धरून असावा.

ऑक्टोबर ५ ने सुरू होणारा सप्ताह

गीत १९९ (११)

१० मि: मंडळीच्या घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा.

१५ मि: “पुनर्भेटी करण्यातील अडचणींवर मात करणे.” सर्व्हिस ओव्हरसियरचे भाषण आणि श्रोत्यांबरोबर चर्चा. ५ वा परिच्छेद विचारात घेतल्यानंतर तुमच्या मंडळीच्या बांधवांना पुनर्भेटी करताना कोणत्या अडचणी येतात, त्यांच्यावर कशी मात करता येईल हे स्पष्ट करा.

२० मि: “मॅगझीन रूटच्या माध्यमाने ‘राज्याचे बी पेरणे.’” श्रोत्यांसोबत चर्चा. मॅगझीन रूट कसा सुरू केला आणि तो कसा चालू ठेवला याविषयी काहींना विचारा. प्रचारक घरमालकाला मासिक देऊन त्याला पुढचे अंक आणून देण्याचे सांगतो असे प्रात्यक्षिक दाखवा.

गीत १३३ (३) व समाप्तीची प्रार्थना.

ऑक्टोबर १२ ने सुरू होणारा सप्ताह

गीत ४२ (२१)

५ मि: मंडळीच्या घोषणा. अकाउंट्‌स रिपोर्ट.

१० मि: “पुढाकार घेणारे ओव्हरसियर—सेक्रेटरी.” मंडळीच्या सेक्रेटरीचे भाषण. आपल्या जबाबदाऱ्‍यांविषयी तो चर्चा करतो. सर्वांनी आपापला रिपोर्ट वेळच्या वेळी दिला तर किती मदत होते हे तो जोर देऊन सांगतो.

१० मि: त्यांचा पायनियरींगचा उत्साह. १९९८ वार्षिकपुस्तक (इंग्रजी) पृष्ठे १०४-७ यांवर आधारित उत्तेजनपर भाषण. जपानमध्ये पायनियरांची संख्या अधिक का आहे; तिथल्या बहिणींना घरचे काम करूनही आध्यात्मिक गोष्टींना महत्त्व देणे कसे शक्य होते; कोणत्या गोष्टीमुळे त्यांना पायनियरिंग करायला प्रेरणा मिळते आणि तिथल्या पायनियर्समध्ये कोणाचा जास्त सहभाग आहे, या सर्व गोष्टींचे स्पष्टीकरण द्या. जे आईवडील पायनियरिंग करतात त्यांच्या मुलांवर याचा कसा चांगला परिणाम होतो हे उदाहरण देऊन स्पष्ट करा. पायनियरिंग करण्याचे ठरवल्यानंतर आवश्‍यक तडजोडी करण्यासाठी कोणता विश्‍वास असावा लागतो यावर जोर द्या. आपल्यालाही पायनियरिंग करता येईल का याविषयी पुन्हा एकदा गांभीर्याने आणि प्रार्थनापूर्वक विचार करण्याचे सर्वांना प्रोत्साहन द्या.

२० मि: “टेहळणी बुरूज आणि सावध राहा! तुम्ही वाचता का?” प्रश्‍नोत्तरे. मासिके वाचण्यासाठी वेळ कसा काढावा याविषयी प्रशाला मार्गदर्शन पुस्तक (इंग्रजी), अभ्यास ४, परिच्छेद ५-६ यात दिलेल्या व्यावहारिक सूचनांची उजळणी करा.

गीत १०७ (४) व समाप्तीची प्रार्थना.

ऑक्टोबर १९ ने सुरू होणारा सप्ताह

गीत १६ (२२)

१० मि: मंडळीच्या घोषणा. अलीकडील मासिकांतून, संभाषण सुरू करण्याकरता उपयोगी पडतील अशा मुद्द्‌यांची उजळणी करा. १९९७ वार्षिक पुस्तक (इंग्रजी), पृष्ठ ४५ आणि ऑक्टोबर २२, १९९६ च्या सावध राहा! (इंग्रजी) मासिकातील पृष्ठ ३२ वरील अनुभव सांगा. या शनिवारी आणि रविवारी सर्वांना मासिक वितरणात सहभाग घेण्याचे उत्तेजन द्या.

१५ मि: मंडळीच्या घोषणा.

२० मि: टेहळणी बुरूज अभ्यासाची तयारी कशी करावी. जून १, १९८७ टेहळणी बुरूज, पृष्ठे १४-१५, परिच्छेद १६-१८ तसेच प्रशाला मार्गदर्शक पुस्तक (इंग्रजी), अभ्यास ७, परिच्छेद ११ व अभ्यास १८, परिच्छेद ४-६ यांवर आधारित टेहळणी बुरूज अभ्यास चालवणारे बांधव श्रोत्यांसोबत चर्चा करतात; पुढील प्रश्‍न विचारा: (१) टेहळणी बुरूज मासिकातील प्रत्येक अभ्यास लेखाचा पुरेपूर लाभ घेणे अत्यावश्‍यक का आहे? (२) मासिकाचा नवीन अंक मिळताच आपण काय करावे? (३) टेहळणी बुरूज अभ्यासाची तयारी करण्याचा एक उत्तम मार्ग कोणता? (४) शास्त्रवचनांवर तसेच मुख्य विषयाकडे कशा प्रकारे लक्ष वेधले जाऊ शकते? (५) शिकलेल्या गोष्टींची आपण उजळणी कशी करू शकतो? (६) व्यक्‍तिगतपणे अभ्यास केल्यानंतर कोणत्या मुख्य मुद्द्‌यांवर आपण मनन करण्यास हवे? (७) उत्तरे कशी तयार करावीत? (८) एकाच प्रश्‍नावर विविध मुद्दे कसे मांडले जाऊ शकतात? काहींना विचारा की ते टेहळणी बुरूज अभ्यासाचा पूर्ण फायदा कसा घेतात.—आपली सेवा पूर्ण करण्यासाठी संघटित, पृष्ठे ६५-७ पाहा.

गीत ९५ (२८) व समाप्तीची प्रार्थना.

ऑक्टोबर २६ ने सुरू होणारा सप्ताह

गीत ९८ (१६)

१० मि: मंडळीच्या घोषणा. आवश्‍यकतेनुसार प्रचारकार्यात वापरण्याजोगी कोणकोणती जुनी पुस्तके मंडळीत उपलब्ध आहेत ते सांगा. डिसेंबर महिन्यात सुट्टी असल्यामुळे बाप्तिस्माप्राप्त युवकांना व इतरांना सहायक पायनियरिंग करण्याची ही चांगली संधी आहे.

२० मि: धार्मिक विभाजित कुटुंबामध्ये ईश्‍वरी आज्ञाधारकता. जून १ १९९५, टेहळणी बुरूज, पृष्ठे २६-९ यावर आधारित भाषण. ज्यांचे विवाहसोबती सत्यात नाहीत अशांना प्रेमळपणे उत्तेजन व मार्गदर्शन द्या जेणेकरून एक सकारात्मक मनोवृत्तीने मंडळीच्या वेगवेगळ्या कार्यांत सक्रिय सहभाग घेण्यास त्यांना मदत होईल.

१५ मि: सभांना वेळेवर उपस्थित राहणे. सभांना उशिरा येण्याच्या समस्येविषयी बुक स्टडी चालवणाऱ्‍या दोन किंवा तीन बांधवांची अथवा सेवा सेवकांची चर्चा. चर्चा करताना ते मान्य करतात, की निरनिराळ्या परिस्थितींमुळे उदाहरणार्थ एखाद्या एमर्जेन्सीमुळे, पावसापाण्यामुळे, वाहतुकीमुळे व इतर कारणांमुळे उशीर होऊ शकतो. पण काही जण नेहमीच उशिरा येतात. वेळेवर उपस्थित राहण्याकरता आवश्‍यक असणाऱ्‍या पुढील गोष्टींविषयी हे बांधव सर्वांना उत्तेजन मिळेल अशा रितीने आपल्या चर्चेतून स्पष्ट करतात: (१) सभांना उपस्थित राहण्याचा विशेषाधिकार, तेथे मिळणारे आध्यात्मिक अन्‍न आणि सहवास या गोष्टींची आपण मनापासून कदर करावी, (२) आपल्या इतर कामांची आगाऊ व्यवस्था करावी, (३) कुटुंबातील सर्वांनी एकमेकांना आनंदाने सहकार्य करावे, (४) अनपेक्षित समस्या येऊ शकतात हे लक्षात ठेवून लवकरच निघावे, (५) आपण सभेला उशिरा येतो तेव्हा इतरांचेही लक्ष विचलित होते याची आपल्याला नेहमी जाणीव असावी. चर्चेच्या शेवटी सर्वजण मान्य करतात की सर्वांनी निरंतर प्रयत्न केल्यास उशिरा येण्याची ही समस्या सोडवता येईल.

गीत ८६ (२३) व समाप्तीची प्रार्थना.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा