वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/९८ पृ. १
  • आपण त्यापेक्षा मोठी कार्ये करू शकतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपण त्यापेक्षा मोठी कार्ये करू शकतो
  • आमची राज्य सेवा—१९९८
  • मिळती जुळती माहिती
  • “जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • यहोवासोबत निष्ठावंतपणे काम करणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
आमची राज्य सेवा—१९९८
km ९/९८ पृ. १

आपण त्यापेक्षा मोठी कार्ये करू शकतो

१ उल्लेखनीय कार्ये ही येशू ख्रिस्ताच्या सेवेचे एक वैशिष्ट्य होते. त्याने चमत्कारिकरित्या हजारोंना जेवू घातले, अनेकांना बरे केले आणि काहींना तर मृत्यूतून देखील उठवले. (मत्त. ८:१-१७; १४:१४-२१; योहा. ११:३८-४४) त्याच्या या कार्यहालचालीने एका सबंध राष्ट्राचे लक्ष वेधून घेतले होते. तरीही, त्याच्या मृत्यूच्या आदल्या रात्री त्याने आपल्या विश्‍वासू अनुयायांना म्हटले: “मी जी कृत्ये करितो, ती माझ्यावर विश्‍वास ठेवणाराहि करील, आणि त्यापेक्षा मोठी करील.” (योहा. १४:१२) आपण ‘त्यापेक्षा मोठी कार्ये’ कशी करू शकतो?

२ अधिक क्षेत्र उरकल्याने: येशूच्या कार्याचा परीघ पॅलेस्टाईनपर्यंत मर्यादित होता; पण त्याच्या सुरवातीच्या शिष्यांना “पृथ्वीच्या शेवटापर्यंत,” म्हणजे येशूने स्वतः प्रचार कार्य केले त्याच्या कितीतरी पलीकडे जाऊन साक्ष देण्यास सांगितले होते. (प्रे. कृत्ये १:८) येशूने सुरू केलेले प्रचार कार्य आज सबंध जगभरात, अर्थात २३२ राष्ट्रांमध्ये चालू आहे. (मत्त. २४:१४) तुमच्या मंडळीला नेमून दिलेले क्षेत्र उरकण्यासाठी होता होईल तितका सहभाग तुम्ही घेत आहात का?

३ अधिकाधिक लोकांना साक्ष दिल्याने: येशूनंतर, प्रचाराचे हे कार्य चालू ठेवणाऱ्‍या शिष्यांची संख्या अत्यल्प होती. तथापि, त्यांच्या आवेशयुक्‍त साक्षीकार्यामुळे सा.यु. पेन्टेकॉस्ट ३३ च्या दिवशी सुमारे तीन हजार लोकांनी सत्य स्वीकारून त्याच दिवशी बाप्तिस्मा घेतला. (प्रे. कृत्ये २:१-११, ३७-४१) आज दररोज सरासरी १,००० हून अधिक लोकांचा बाप्तिस्मा होत असल्यामुळे ‘सार्वकालिक जीवनाकडे योग्य कल असलेल्यांना’ एकत्र करण्याचे काम आजपर्यंत चालू आहे असे म्हणता येईल. (प्रे. कृत्ये १३:४८; NW) जेथे कोठे प्रामाणिक अंतःकरणाचे लोक भेटू शकतील अशांना साक्ष देण्यासाठी तसेच ज्यांनी आस्था दाखवली आहे अशांना शक्य तितक्या तत्परतेने पुनः भेट देण्यासाठी तुमच्या परीने होता होईल तितके तुम्ही करत आहात का?

४ येशूपेक्षा अधिक काळ प्रचार केल्याने: येशूची पृथ्वीवरील सेवा केवळ साडेतीन वर्षांची होती. आपल्यापैकी अनेकजण यापेक्षा अधिक काळापासून प्रचार कार्य करत आहेत. प्रचाराचे हे कार्य आपल्याला कितीही काळापर्यंत करावे लागले तरीही, हरएक नवीन शिष्याला जीवनाच्या मार्गावर आणण्यासाठी त्याची मदत करण्यास आपण कृतज्ञ आहोत. (मत्त. ७:१४) दर महिना प्रभूच्या कामात तुम्ही अधिकाधिक करत आहात का?—१ करिंथ. १५:५८.

५ येशूचा पाठिंबा असल्यामुळे आपण याविषयी विश्‍वास बाळगू शकतो की त्याचे खरे शिष्य या नात्याने आपण याहीपेक्षा मोठी कार्ये करू शकतो.—मत्त. २८:१९, २०.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा