वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w91 ७/१ पृ. २१-२६
  • यहोवासोबत निष्ठावंतपणे काम करणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवासोबत निष्ठावंतपणे काम करणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आम्ही कोणासाठी काम करीत आहोत?
  • विरोधकांचे काम सुरु आहे
  • प्रतिफळ न देणारी कामे
  • आज “सत्कर्मे” करीत राहाणे
  • सर्वात महत्त्वपूर्ण काम
  • मंडळीसोबत काम करणे
  • देवासोबत काम करणं—आनंदी असण्याचं एक कारण
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • श्रम करून आपल्या जिवास सुख द्या
    देवाच्या प्रेमात टिकून राहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
w91 ७/१ पृ. २१-२६

यहोवासोबत निष्ठावंतपणे काम करणे

“हे देवा, माझ्या तरुणपणापासून तू मला शिकवीत आला आहेस; आणि मी आजपर्यंत तुझी अद्‌भुतकृत्ये वर्णिली आहेत.”—स्तोत्रसंहिता ७१:१७.

१. काम ही यहोवाकडील देणगी आहे असे आपल्याला का म्हणता येते?

देवाने माणसाला दिलेल्या देणग्यापैकी एक देणगी काम होय. आमचे मूळ पालक आदाम व हव्वा यांना यहोवाने म्हटलेः “पृथ्वी भरून टाका व ती सत्तेत आणा.” ही कामाची मोठी आव्हानात्मक नेमणूक होती, पण ती त्यांना पेलणारी होती. यासाठी जी शारीरिक व मानसिक मेहनत करावी लागणार होती त्यामुळे त्यांना जीवन जगण्याचा आनंद अधिकपणे देणार होता. त्यांच्यासोबत पृथ्वीघरात राहणाऱ्‍या जनावरांना मिळणाऱ्‍या आनंदापेक्षा हा आनंद आगळा होता.—उत्पत्ती १:२८.

२, ३. (अ) आज कामाविषयी पुष्कळांचा ग्रह कसा आहे व का? (ब) एक खास काम करण्याच्या कोणत्या संधीविषयी आपण विचार करावयास हवा?

२ आम्ही अपूर्ण दशेत असलो तरी आपल्या “कष्टाने” जे “सुख” आम्हाला लाभते ती “देवाची देणगी” आहे असे सूज्ञ माणूस शलमोन याने लिहिले. (उपदेशक ३:१३) माणसाने आपले मन व शरीर यांचा उपयोग करण्याची अद्याप गरज आहे. काम नसले की, बरेच त्रासल्यासारखे वाटते. पण, सर्व प्रकारचे काम हितकारक वा योग्य असतेच असे नाही. कित्येकांना तर कामाचा कंटाळा वाटत असतो, आपली उपजिविका करावी यासाठी ते त्यांना करावेच लागते.

३ तथापि, खरे प्रतिफळ देणारे एक काम खरेच आहे, जे करण्याचे सर्वांना आमंत्रण आहे. पण, ज्यांना या कामात सहभाग घ्यायचा आहे अशांना बराच विरोध व समस्या यांजवर मात करायची असते. मग, या कामास आपण पात्र ठरावे हे का महत्त्वाचे आहे बरे? त्यासाठी कसे पात्र होता येईल? या प्रश्‍नांची उत्तरे मिळविण्याआधी आपण प्रथम याचा विचार करू याः

आम्ही कोणासाठी काम करीत आहोत?

४. येशूला कोणत्या प्रकारच्या कामामुळे आनंद व समाधान मिळाले?

४ येशू ख्रिस्ताने म्हटले: “ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे हेच माझे अन्‍न आहे.” (योहान ४:३४) यहोवासाठी निष्ठावंतपणे काम केल्यामुळे येशूला पुष्कळ आनंद व समाधान मिळाले. त्या कामाने त्याच्या जीवनात उद्दिष्ट दिले व यामुळेच आपल्या सेवकपणाच्या साडेतीन वर्षाच्या शेवटाला तो अगदी खरेपणाने आपल्या स्वर्गीय पित्याला हे म्हणू शकलाः “जे काम तू मला करावयास दिले ते समाप्त करून मी पृथ्वीवर तुझे गौरव केले आहे.” (योहान १७:४) जसा शारीरिक आहार पोषण करतो, त्याचप्रमाणे आध्यात्मिक पैलू असणारे कामही पोषण करते. याविषयी येशूने दुसऱ्‍या एका प्रसंगी भर दिला, जेव्हा त्याने असे म्हटले: “नाशवंत अन्‍नासाठी काम करू नका, तर सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे जे अन्‍न . . . त्यासाठी श्रम करा.” (योहान ६:२७) याच्याच उलट पाहिल्यास, जे काम आध्यात्मिक दृष्ट्या निष्फळ आहे ते त्रस्तता व मृत्यु याकडे निरविते.

५. येशूने केलेल्या चांगल्या कामास कोणी विरोध केला व का?

५ एका शब्बाथवारी येशूने ३८ वर्षे आजारी असणाऱ्‍या माणसाला बरे केल्यामुळे यहुद्यांनी त्याच्याविषयी जी टिका केली त्याविषयीचे उत्तर देताना येशूने असे म्हटलेः “माझा पिता आजपर्यंत काम करीत आहे आणि मीही काम करीत आहे.” (योहान ५:५-१७) येशू तर यहोवाचे काम करीत होता, पण या गोष्टीस धार्मिक पुढाऱ्‍यांनी मान्यता देण्याचे नाकारले व ते काम त्याने करू नये यासाठी हरप्रकारे प्रयत्न केला. ते का? कारण ते आपला बाप दियाबल सैतान याच्या बाजूचे होते; आणि खरे पाहता हा सैतान तर यहोवाच्या कामाला नेहमीच विरोध करीत आला आहे. (योहान ८:४४) खरे म्हणजे, सैतान ‘तेजोमय देवदूताचे रुप’ घेऊ शकतो व “सर्व प्रकारचे अनीतीजनक कपट” याचा वापर करू शकत असल्यामुळे आम्ही त्याची कामे कोणती आहेत व ती कशाप्रकाराने होतात याची आध्यात्मिक समज व स्पष्ट विचारसरणी बाळगण्याची गरज आहे. नाहीतर, आम्ही देखील यहोवाच्या विरोधात काम करीत आहोत असे कदाचित दिसून येऊ शकेल.—२ करिंथकर ११:१४; २ थेस्सलनीकाकर २:९, १०.

विरोधकांचे काम सुरु आहे

६. धर्मत्यागी हे “कपटी कामदार” का आहेत? विवेचीत करा.

६ आजच्या धर्मत्यागी लोकांसारखे काही लोक सैतानाचे हस्तक म्हणून काम करून ख्रिस्ती मंडळीत नव्यानेच सहवास मिळविलेल्या सदस्यांच्या विश्‍वासाचा नाश करण्यात परिश्रमी आहेत. (२ करिंथकर ११:१३) पवित्र शास्त्राचा खऱ्‍या शिक्षणाचा आधार या नात्याने वापर करण्याऐवजी, ते न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स याचाच यहोवाचे साक्षीदार केवळ आधार घेत असतात असे प्रतिपादित करून त्याचे मोल कमी करण्याच्या प्रयत्नात आहेत. पण वस्तुतः तसे नाही. या शतकाच्या बहुतेक भागात तर साक्षीदारांनी प्रामुख्यत्वे किंग जेम्स व्हर्शन, रोमन कॅथोलिक डुए व्हर्शन, किंवा त्यांच्या भाषेत ज्या ज्या आवृत्त्या उपलब्ध होत्या त्यांचा यहोवाविषयी व त्याच्या उद्देशांविषयीचे सत्य शिकून घेण्यासाठी उपयोग केला आहे. याखेरीज, त्यांनी मृतांची स्थिती, देव व त्याचा पुत्र यातील नातेसंबंध दर्शविण्यासाठी आणि स्वर्गात केवळ एक लहान कळपच का जाणार याची सत्यता घोषित करण्यासाठी त्या जुन्या आवृत्त्यांचा वापर केला होता. माहीतगार लोकांना याची कल्पना आहे की यहोवाचे साक्षीदार पवित्र शास्त्राच्या कित्येक भाषांतराना आपल्या सुवार्तेच्या कामी जगभर वापरीत आहेत. तथापि, १९६१ पासून त्यांना न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन यामधील अद्ययावत तसेच अचूक भाषांतराचा आणि सुवाच्यतेचा लाभ मिळत राहिला आहे.

७. (अ) येशूवर आपला विश्‍वास आहे असे म्हणणाऱ्‍या पुष्कळांना येशू का नाकारणार आहे? (ब) पहिले योहान ४:१ मधील सल्ल्याकडे लक्ष देणे का जरुरीचे आहे?

७ येशूने म्हटले की, आपणावर विश्‍वास आहे असा दावा करणाऱ्‍या कित्येक लोकांना तो नाकारणार आहे. तो म्हणाला की, हे लोक त्याच्या नामात संदेश सांगितल्याचे, भूते घालविल्याचे व शिवाय “बहुत अद्‌भुत कृत्ये” केल्याचे समर्थन करतील. तरी तो अशांना “अधर्म करणाऱ्‍यांनो,” असे म्हणून घालवून देईल. (मत्तय ७:२१-२३) असे का? कारण ते त्याच्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे करीत नाही व यामुळेच ते यहोवाच्या दृष्टीने नालायक आहेत. आज असाधारण तसेच अद्‌भुत वाटणारी कामे तो आद्य ठक सैतान याच्याकरवी होऊ शकतात. येशूचा मृत्यु व पुनरुत्थानाच्या ६० वर्षानंतर प्रेषित योहानाने आपले पहिले सर्वसाधारण पत्र ख्रिश्‍चनांना लिहिताना त्यामध्ये त्यांनी “प्रत्येक प्रेरित संदेशाचा विश्‍वास धरू नका, तर हे संदेश देवापासून आहेत किंवा नाहीत याविषयी त्यांची परिक्षा करा,” असा सल्ला दिला. आम्हीही आज हेच करावयास हवे.—१ योहान ४:१.

प्रतिफळ न देणारी कामे

८. शरीराच्या कर्मांविषयी आपल्याला कसे वाटायला हवे?

८ आम्ही आध्यात्मिकरित्या उत्पादकहीन कामात सहभागी होत नसलो तरी जर पतित शरीराच्या इच्छेप्रमाणे करीत राहण्यात मग्न असलो तर मग आमचे श्रम व्यर्थ असणार. प्रेषित पेत्राने म्हटले की, आम्ही “विदेशी लोकांना आवडणारी कर्मे करण्यात म्हणजे कामासक्‍ती, विषयवासना, मद्यासक्‍ती, रंगेलपणा, बदफैली व अमंगळ मूर्तिपूजा” यामध्ये जो बराच काळ घालविला तो पुरे. (१ पेत्र ४:३, ४) याचा अर्थ, आज समर्पित असणारे सर्व ख्रिस्ती या कामात गढले होते असे नाही. पण त्याचा हा अर्थ आहे की, जे अशी कामे करीत त्यांनी आपली आध्यात्मिक दृष्टी जसजशी झपाट्याने सुधारली गेली तसतसा आपल्यात वेगाने बदल करून घेणे जरुरीचे होते, असा होता. त्यांनी केलेल्या बदलामुळे जग त्यांना नावे ठेवील, व हे अपेक्षिता येईल. पण यांना जर यहोवाच्या सेवेत निष्ठावंत कार्यकर्ते असे व्हावयाचे आहे तर मग त्यांनी बदल केलाच पाहिजे.—१ करिंथकर ६:९-११.

९. संगीतिकेचे शिक्षण घेणाऱ्‍या एका साक्षीदाराच्या अनुभवावरुन आपल्याला काय शिकायला मिळते?

९ यहोवाने आमच्या मनोरंजनासाठी पुष्कळ दाने दिली आहेत व संगीत हे त्यापैकीचे एक आहे. परंतु, “सबंध जग त्या दुष्टाच्या [दियाबल सैतान] अधीन” असल्यामुळे त्यामध्ये संगीताचे क्षेत्रही येत नाही का? (१ योहान ५:१९) होय, संगीत एक चतुर पाश टाकू शकते, हे सिल्वानियाला आढळले. तिला फ्रान्समध्ये संगीतिकामध्ये गायक होण्यासाठी तालीम घेण्याची संधी आली. “तरीपण मला यहोवाची सेवा करण्याची प्रबळ इच्छा होती,” असे ती म्हणते. “मी माझ्या साहाय्यक पायनियरींगचा अनुभव घेत होते व या दोन गोष्टींचा मेळ साधण्याच्या प्रयत्नात होते. पण संगीतिकेचे शिक्षण घेताना अनैतिकतेची पहिली समस्या सामोरी आली. आरंभाला मी माझ्या मित्रांच्या अनैतिक भाषा व वर्तन याला दाद दिली नाही तेव्हा त्यांनी मला बावळटच म्हटले. पण काही काळाने मी त्या भ्रष्ट वातावरणाला संवेदनाशील होऊ लागले आणि यहोवाला जे द्वेष्य वाटते त्याच्याबाबतीत मी इतका कडक दृष्टीकोण धरला नाही. माझ्या एका शिक्षकाने म्हटले की, मी संगीतालाच आपला धर्म बनवावा. तसेच मला अधिक कसे आक्रमक व्हावे व इतरांपेक्षा स्वतःला कसे श्रेष्ठ समजावे हे शिकवण्यात आले. या सर्वामुळे मला अगदी विचलीत वाटले. सरतेशेवटी, मला खास कार्यक्रमात येण्याचा योग आला. मी यहोवाला प्रार्थना केली की कोणत्या मार्गाने मी जावे हे त्याने मला स्पष्ट करावे. मी माझा कार्यक्रम चांगला सादर केला व मला आत्मविश्‍वासही वाटत होता. पण ज्यांची निवड झाली त्यामध्ये मी नव्हते. कारण मला नंतर कळले की, ज्यांची निवड करावयाची होती ते आधीच गुप्तपणे ठरवण्यात आले होते. अशाप्रकारे मला माझ्या प्रार्थनेचे येथे स्पष्ट उत्तर मिळाले व त्यामुळे मी हा संगीतिकेचा प्रयोग करण्याचे सोडून दिले.” या भगिनीने नंतर मंडळीतील एका वडीलाशी विवाह संपादिला व आता ते दोघेही राज्याची आस्था वाढविण्याच्या कामी निष्ठावंतपणे सहभाग देत आहेत.

१०. येशूच्या योहान ३:१९-२१ मधील उद्‌गारांवरून तुम्ही काय निष्कर्ष काढाल?

१० येशूने म्हटलेः “जो कोणी वाईट कर्मे करतो तो प्रकाशाचा द्वेष करतो, आणि आपली कर्मे सदोष ठरू नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही.” उलटपक्षी, “जो सत्य आचरतो तो प्रकाशाकडे येतो; यासाठी की आपली कर्मे देवाच्या ठायी केलेली आहेत अशी ती उघड व्हावी.” (योहान ३:१९-२१) यहोवाची इच्छा तसेच त्याचे उद्देश यांच्या अनुषंगाने काम करणे हे किती आशीर्वादाचे आहे बरे! पण हे यशस्वीरित्या होण्यासाठी आम्ही आपली सर्व कामे देववचनाच्या प्रकाशात तपासून पाहिली पाहिजेत. यहोवाची हितकारी सेवा पत्करण्यात अद्याप आम्ही अशक्‍त झालेलो नाही; तसेच अद्याप उशीर झालेला नाही.

आज “सत्कर्मे” करीत राहाणे

११. “सत्कर्मे” म्हणून कोणी कोणती कामे हाती घेतात, पण ती वैफल्याकडे कशी नेऊ शकतात?

११ आजच्या हितकारी कामात आमच्या काळाची निकड प्रवर्तित करण्यास हवी. मानवजातीचे सर्वसाधारण हित साधावे किंवा एका विशिष्ट उद्देशास्तव कित्येक प्रांजळ लोक स्वतःला अशा कामात गुंतवून घेतात; त्यांना ती “सत्कर्मे” वाटतात. पण अशी कामे कधीकधी किती वैफल्याची ठरतात! ब्रिटनमध्ये सी.एफ.एफ.ओ.डी (कॅथोलिक फंड फॉर ओवरसी डेव्हलपमेंट) या संघटनेने आपल्या दुष्काळ-निवारण मोहीमेविषयी सांगताना, कळवलेः “चार वर्षांआधी . . . या कामासाठी लाखो पौंड गोळा करण्यात आले. हजारो लोकांचा बचाव केला गेला. आता हेच लोक पुन्हा त्रासात आहेत. . . . पण का? काय चुकले होते?” आपली माहिती सांगताना सी.एफ.एफ.ओ.डी जर्नल पुढे म्हणते की दीर्घ पल्ल्याच्या समस्यांना हात घातला गेला नव्हता आणि “मानवी प्रगतिसाठी अत्यंत आवश्‍यक असणारी सर्व मिळकत झगड्यांना [मुलकी युद्ध] वापरली गेली.” अशा प्रकारची वक्‍तव्ये सदाचारी कामात गढलेल्या धर्मार्थ संस्थांनी काढल्याचे तुम्हाला परिचित असतील.

१२. आज जगाला ज्या समस्या भेडसावत आहेत त्या दूर करण्याचे एकमेव उत्तर कोठे आहे?

१२ दुष्काळ ही तातडीची समस्या आहे. पण आजचे दुष्काळ व युद्ध यांची विपत्ती ही येशूने दिलेल्या भविष्यवादांची पूर्णता असून ते सद्य व्यवस्थीकरणाच्या समाप्तीला सूचक असल्याचे कोणी दर्शविले आहे बरे? (मत्तय २४:३, ७) या घटनांची जोड पवित्र शास्त्रातील प्रकटीकरणाच्या पुस्तकातील ६ व्या अध्यायाच्या चार विविध घोडेस्वारांच्या वर्णनासोबत मिळणारी आहे हे कोणी पुराव्यानिशी स्पष्ट करून दाखवले आहे बरे? यहोवाच्या साक्षीदारांनी याच मासिकाकरवी ते स्पष्ट केले आहे. ते का बरे? कारण दीर्घकालीन मुक्‍तता घडवून आणणे हे मानवाच्या हाताबाहेरचे आहे हे दाखविण्यासाठी. याचा अर्थ हा नव्हे की, ख्रिश्‍चन हे जागतिक समस्यांविषयी बेपर्वा आहेत. तसे नाही. त्यांना याविषयी सहानुभुति आहे व करता येईल तेवढे करण्याची त्यांची इच्छा आहे. तथापि, त्यांना हे खात्रीने पटले आहे की, ईश्‍वरी हस्तक्षेपाविना जगाच्या समस्या कधीच सुटणार नाहीत. जोपर्यंत सैतानाला या जगाचा अधिकारी म्हणून राहू देण्यात येईल तोपर्यंत या समस्या, गरीब लोक दारिद्र्‌यात आहेत तशा राहतील.—मार्क १४:७; योहान १२:३१.

सर्वात महत्त्वपूर्ण काम

१३. आज कोणते काम अत्यंत निकडीचे आहे, व कोण ते करीत आहेत?

१३ आज यहोवा देवाच्या राज्याची सुवार्ता प्रचार करण्याची अत्यंत निकडीची गोष्ट आहे. हे राज्य लवकरच सर्व जागतिक राज्यांचा ताबा घेईल आणि देव-भिरु लोक ज्याची दीर्घकाळापासून वाट पाहात आहेत ती मुक्‍तता त्यांना प्रदान करील. (दानीएल २:४४; मत्तय २४:१४) या स्वर्गीय राज्याचा प्रचार करणे या कार्याला येशू ख्रिस्ताने आपल्या जीवनात प्रमुख उद्देश बनविला होता; त्याचे हे कार्य केवळ पॅलेस्टाईन देशापर्यंतच मर्यादित होते. आज या प्रचाराचे क्षेत्र, येशूने भाकित केल्याप्रमाणे जगव्याप्त बनले आहे. (योहान १४:१२; प्रे. कृत्ये १:८) देवाच्या या कामात लहानसा का होईना पण सहभाग घेणे हा एक आशीर्वादच आहे. आपण देवराज्याचे घोषक बनू अशी कधी कल्पना केली नव्हती अशा पुरुष, स्त्रिया, वृद्ध व तरुण या सर्वांनी, यहोवाचे साक्षीदार करीत असलेल्या या सुवार्तिक कामात मोठी आघाडी घेतलेली आहे. नोहा व त्याच्या कुटुंबाप्रमाणे हे देखील देवाकडून अनुज्ञा मिळवून त्याचे हे काम निष्ठावंतपणे पार पाडीत आहेत आणि त्याच्या शक्‍तीनेच या व्यवस्थीकरणाच्या अंतापर्यंत ते करीत राहतील.—फिलिप्पैकर ४:१३; इब्रीयांस ११:७.

१४. प्रचारकार्य हे जीवनप्रदायक व त्याचवेळी सुरक्षा देणारे कसे आहे?

१४ जे ही सुवार्ता ऐकत आहेत व त्यानुरुप हालचाल करीत आहेत अशांना यहोवाच्या साक्षीदारांमार्फत करण्यात येणारे हे साक्षीकार्य जीवनप्रदायक आहे. (रोमकर १०:११-१५) जे त्याचा प्रचार करतात अशांसाठीही ते सुरक्षा देणारे आहे. आम्हापेक्षा अधिक स्वरुपाच्या समस्या असणाऱ्‍या लोकांना मदत देण्याची प्रामाणिक आस्था राखल्यामुळे आम्हाला आमच्या समस्यांविषयी अधिक चिंतातुर बनण्यापासून मुक्‍त ठेवले जाते. या जगाचे अधःपतित दर्जे आम्हाला त्याच्या मार्गाचा अवलंब करण्यास उद्युक्‍त करील हे आम्हास ठाऊक आहे. यासाठीच प्रचारामध्ये आमची मने आम्ही देवाच्या विचारांनी भरून ठेवणे हे केवळ विश्‍वासास उभारक नव्हे तर आमच्या भल्याचे आहे. एका साक्षीदाराने असे म्हटलेः “मला भेटणाऱ्‍या लोकांना बदलविण्याचा प्रयत्न मी केला नाही तर ते मला बदलून टाकतील.”—पडताळा २ पेत्र २:७-९.

मंडळीसोबत काम करणे

१५. आज सहमेंढपाळांच्या जबाबदाऱ्‍या कोणकोणत्या आहेत, आणि १ तीमथ्य ३:१ च्या अनुषंगाने मंडळीतील पुरुष सदस्यांना कसे वाटले पाहिजे?

१५ नव्यानेच आस्था घेणारे लोक मंडळीत येऊ लागतात तेव्हा ते सर्वथोर मेंढपाळ यहोवा देव व त्याचा उत्तम मेंढपाळ येशू ख्रिस्त यांच्या देखरेखीखाली येतात. (स्तोत्रसंहिता २३:१; योहान १०:११) या स्वर्गातील मेंढपाळांचे आज येथे पृथ्वीवर कळपाचे निष्ठावंत सहमेंढपाळ, मंडळीत नियुक्‍त करण्यात आलेला पुरुषवर्ग याद्वारे प्रतिनिधित्व केले जात आहे. (१ पेत्र ५:२, ३) अशाप्रकारचे पद ग्रहण करणे हा या शेवटल्या काळात मोठा बहुमान आहे. मेंढपाळाचे काम मोठ्या जोखीमीचे आहे, यात मंडळीला शिक्षण देण्यात तसेच सुवार्तिक कार्यात पुढाकार घेण्याचे केवळ समाविष्ट नसून कळपाचे आध्यात्मिक घुसखोरांपासून रक्षण करणे आणि आम्ही राहात आहोत त्या या जगाच्या वादळी वातावरणाशी झगडण्याचेही समाविष्ठ आहे. वाढत असलेल्या ख्रिस्ती मंडळीच्या सदस्यांच्या आध्यात्मिक कल्याणाची काळजी वाहण्यासाठी मंडळीतील पुरुषमंडळीने पुढाकार घेण्यासाठी पुढे येणे यासारखे अधिक हितकारी कार्य दुसरे नाही.—१ तीमथ्य ३:१; पडताळा यशया ३२:१, २.

१६. ख्रिश्‍चन मेंढपाळ कोणत्या अर्थी एकमेकांना पूरक ठरतात?

१६ हे मानवी मेंढपाळ आहेत व यांनाही कळपातील इतरांप्रमाणे वेगवेगळे व्यक्‍तीमत्व आहे आणि अशक्‍तपणा आहे हे आम्ही लक्षात ठेवण्यास हवे. एखादा मेंढपाळ एखाद्या गुणाविषयी वरचढ असेल पण तेच दुसऱ्‍यामधील देणगी मंडळीची दुसऱ्‍याच क्षेत्रात उन्‍नति घडवून आणू शकेल. ख्रिस्ती वडील या नात्याचे त्यांचे काम एकमेकांना पूरक व मंडळीची दृढता करणारे आहे. (१ करिंथकर १२:४, ५) यामुळेच त्यांच्यामध्ये स्पर्धेचा आत्मा कधीच दिसता कामा नये. त्यांनी एकत्रपणे मिळून राज्य आस्थेची वाढ करावी व तिचे रक्षण करावे, यहोवाला “निष्ठावंतपणे हात उच्च करून प्रार्थना करावी,” आपली सर्व कामे व निर्णय यामध्ये त्याच्याकडील आशीर्वाद व मार्गदर्शन पत्करावे.— १ तीमथ्य २:८.

१७. (अ) आम्हावर कोणती जबाबदारी आहे? (ब) आमची जबाबदारी पूर्णतेने पार पाडावयाची आहे तर मग, आम्ही कोणकोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत?

१७ सैतानाच्या साम्राज्याचा शेवट जवळ येत असता प्रचाराचे हे काम आता अधिकाधिक निकड घेत आहे. यहोवा देवाच्या वचनात सत्य असल्यामुळे आम्हाला त्याचे साक्षीदार या नात्याने मिळणाऱ्‍या प्रत्येक संधीला सुवार्ता प्रसारीत करण्याची जबाबदारी आहे. आमच्या हातात असणारे हे काम आम्हाला शेवटपर्यंत मग्न ठेवण्याइतके पुरेसे आहे. सुखविलास, अनैतिक सुखोपभोग आणि जडवाद याकरवी आम्ही कधीही स्वतःला विचलीत होऊ देऊ नये. तसेच तर्कावर अधिष्ठित अशी विचारसरणी, शब्दाशब्दांवर विवाद करणे, यामध्ये जडून राहू नये; कारण यात कोणताही फायदा नाही व ते निष्कारण वेळ वाया घालविण्यात जाईल. (२ तीमथ्य २:१४; तीत १:१०; ३:९) “प्रभो, या वेळेस आपण इस्राएलाचे राज्य पुन्हा स्थापित करणार का?” असा शिष्यांनी येशूला प्रश्‍न केला तेव्हा हाताशी असलेल्या महत्त्वपूर्ण कामाकडे निर्देश करून येशूने म्हटलेः “यरुशलेमात, सर्व यहूदीयात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल.”—प्रे. कृत्ये १:६-८.

१८. यहोवासोबत मिळून काम करणे हे इतके प्रतिफळदायक का आहे?

१८ यहोवासोबत मिळून काम करणे, त्याच्या जगव्याप्त मंडळीसोबत प्रचार करणे या गोष्टी आमच्या जीवनास आनंद, समाधान व खरा उद्देश देतात. यास्तव यहोवावर प्रीती करणाऱ्‍या प्रत्येकास त्याच्यासंबंधाने निष्ठा व भक्‍ती दाखविण्याची ही संधी आहे. विविध पैलू असणाऱ्‍या या कामाची पुनरावृत्ती होणार नाही. समोर सार्वकालिक जीवनाचे भवितव्य स्पष्टपणे उभे असता, आपण “देवाला प्रिय होईल अशी त्याची सेवा सद्‌भक्‍तीने व सद्‌भयाने” निष्ठेने करू या; ज्याद्वारे त्याचे गौरव होऊ शकेल व आमचे तारण साध्य होईल.—इब्रीयांस १२:२८.

तुमचे उत्तर काय असेल?

◻ येशूला कोणत्या कामामुळे आनंद व समाधान मिळाले?

◻ यहोवाच्या कामाला कोण विरोध करतात व का?

◻ जगातील “सत्कर्मे” आणि देवाच्या राज्याची सुवार्ता सांगण्याचे काम यांची कशी तुलना करता येते?

[२४ पानांवरील चित्रं]

येशूने आपल्या शिष्यांना जाऊन प्रचार करण्याची नेमणूक दिली

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा