ईश्वरशासित सेवा प्रशालेची चाचणी
ईश्वरशासित सेवा प्रशालेत मे ४ ते ऑगस्ट २४, १९९८ पर्यंतच्या आठवड्यांच्या दरम्यान हाताळल्या गेलेल्या साहित्यावर आधारित पुस्तकांचा वापर न करता घेण्यात येणारी चाचणी. नेमून दिलेल्या वेळेत तुम्हाला जितक्या प्रश्नांची उत्तरे देता येतील ती लिहिण्यासाठी वेगळ्या कागदाचा वापर करावा.
[सूचना: चाचणी परीक्षेच्या वेळी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी केवळ बायबल वापरावे. प्रश्नानंतर जो संदर्भ लिखित आहे तो केवळ तुमच्या व्यक्तिगत संशोधनासाठी आहे. टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या संदर्भात प्रत्येक ठिकाणी पृष्ठ व परिच्छेद क्रमांक देण्यात येतीलच असे नाही.]
पुढील विधानांची उत्तरे, खरे किंवा खोटे यात द्या:
१. बायबल अहवालानुसार पौलाने तीन वेळा करिंथला भेट दिली. [si पृ. २१४ परि. ३]
२. दहनसंस्कार केलेल्या शरीराची राख विखरणे शास्त्रवचनांच्या विरोधात आहे. [w-MR९६ ९/१५ पृ. ३० परि. ६-पृ. ३१ परि. १]
३. राज्य आस्थेसाठी अत्याधिक आवेश असणे म्हणजे इतरांसोबत व्यवहार करण्यास आवश्यक असलेली युक्ती, समभावना आणि कोमलता या गुणांचा अभाव असला तरी चालेल. (१ करिंथ. १३:२, ३) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR९५ १०/१५ पृ. ३१ परि. ५.]
४. स्वर्गीय जीवनाच्या पुनरुत्थानास ‘पहिले पुनरुत्थान’ असे संबोधले आहे कारण वेळ आणि श्रेणी यांमध्ये ते पहिले आहे. (प्रकटी. २०:६) [w-MR९६ १०/१५ पृ. ६ परि. ५]
५. गलतीकर ५:२६ या वचनानुसार, सर्व स्पर्धात्मक क्रीडा आणि खेळ ही खऱ्या ख्रिश्चनांसाठी अनुचित आहे. [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा g-MR९६ १/८ पृ. २७ परि. ८.]
६. पौलाने २ करिंथकर १०:४ येथे, “आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत” असे म्हटले तेव्हा तो यावर जोर देत होता, की खोट्या शिक्षणापासून मंडळीचे संरक्षण करण्यासाठी ख्रिश्चनांनी फसवणूक, अरेरावीची भाषा किंवा जगीक शस्त्रे यांसारख्या दैहिक शस्त्रांचा आश्रय घेऊ नये. [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा rs पृ. २७१ परि. ३.]
७. पौलाने फिलिप्पै येथे मंडळी स्थापन केल्याच्या केवळ काही महिन्यांनंतरच त्याने फिलिप्पैकरांस पत्र लिहिले कारण त्यांच्यामध्ये गंभीर अशा समस्या उद्भवल्या होत्या. [si पृ. २२४ परि. ३]
८. पहिले तीमथ्य ३:१६ येथे उल्लेखिल्याप्रमाणे, येशूच्या पुनरुत्थानाच्या वेळी त्याला आत्मिक-जीवनाचे बक्षीस मिळाल्यामुळे तो “आत्म्याने नीतिमान ठरला,” होता; यामुळे देवाने हे घोषित केले की येशू हा सर्वतोपरी नीतिमान आहे व आता तो आणखी उच्च नेमणुका मिळवण्याच्या पात्रतेचा आहे. [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR९० ८/१ पृ. १७ परि. १२.]
९. फिलिप्पैकर १:२३ येथे उल्लेखिलेली ‘सुटका,’ मरणानंतर लगेच खिस्ताला जाऊन मिळण्याची पौलाची आशा असल्याचे सुस्पष्टपणे दिसून येते. [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR९५ ३/१ पृ. ३० परि. ४.]
१०. रोमच्या तुरुंगवासातील पौलाच्या पहिल्या सुटकेच्या आणि तेथील अखेरचा तुरुंगवास होण्याच्या काळादरम्यान त्याने १ तीमथ्य हे पुस्तक लिहिले. [si पृ. २३४ परि. २]
पुढील प्रश्नांची उत्तरे द्या:
११. ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारकविधी साजरा करण्यासाठी एकत्र आले असता करिंथमधील काहीजण कोणत्या “अयोग्य प्रकारे” बोधचिन्हांची सहभागिता घेत होते? (१ करिंथ. ११:२७) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR९१ २/१ पृ. २९ परि १७.]
१२. कोणामुळे करिंथ मंडळीचे हित धोक्यात आले होते ज्यामुळे करिंथकरांस आपले दुसरे पत्र लिहिण्यास पौल प्रवृत्त झाला होता? [si पृ. २१४ परि. २]
१३. आपण काही चूक केली आहे असे एखाद्या ख्रिश्चनाला वाटत नसले तरीही त्याने दिलगिरी का व्यक्त करावी? [w-MR९६ ९/१५ पृ. २२ परि. ४, ७]
१४. पौलाने इफिसकरांना लिहिलेल्या पत्रात ‘पवित्र रहस्याचा’ कोणता महत्त्वपूर्ण पैलू स्पष्ट केला गेला आहे? (इफिस. ३:४-६) [si पृ. २२३ परि. १८]
१५. देवाच्या वचनाचा उपयोग करण्यात पौल आजच्या ख्रिस्ती सेवकांसाठी कशाप्रकारे एक उत्कृष्ट उदाहरण मांडतो? [si पृ. २१७ परि. १९]
१६. “नियमशास्त्र हे उल्लंघनांमुळे लावून देण्यात आले” असे प्रेषित पौलाने म्हटले तेव्हा त्याच्या म्हणण्याचा काय अर्थ होता? (गलती. ३:१९) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा uw-MR पृ. १४७ परि. ३-४.]
१७. फिलिप्पैकर १:३-७ मध्ये पौल कोणत्या कारणांसाठी बांधवांची वाखाणणी करतो आणि त्यांच्या उदाहरणावरून आपल्याला कसा लाभ होऊ शकतो? [si पृ. २२५ परि. १२]
१८. सर्व ख्रिस्ती सेवकांनी कलस्सैकर ४:६ येथे दिलेल्या सल्ल्याचे अनुकरण का करावे? [si पृ. २२८ परि. १३]
१९. स्त्रियांनी ‘स्वतःस भिडस्तपणाने शोभवावे’ असे म्हणण्याचा पौलाचा काय अर्थ होता? (१ तीम. २:९) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा g९० ६/२२ पृ. १९ परि. २.]
२०. “शब्दयुद्ध” यासंबंधी पौलाने १ तीमथ्य ६:४ येथे दिलेल्या इशाऱ्याकडे ख्रिश्चनांनी लक्ष का द्यावे? [si पृ. २३६ परि. १५]
पुढे दिलेली विधाने पूर्ण करण्यास शब्द किंवा वाक्यांश पुरवा:
२१. दुसरे करिंथकर _________________________ लिहिले गेले होते आणि _________________________ याने ते पोहंचते केल्याचे दिसते. [si पृ. २१४ परि. २]
२२. पौलाने करिंथकरांना लिहिलेले पहिले पत्र, _________________________ आपली समज रुंदावण्यास सगळ्यात लाभदायक आहे ज्यातून या पत्रात अनेक अवतरणे घेतली गेली आहेत. [si पृ. २१३ परि. २३]
२३. गलतीकरांना लिहिलेल्या आपल्या पत्रात पौल हे सिद्ध करतो, की येशू ख्रिस्तावरील _________________________ दोषमुक्ती होते; _________________________ कार्यांमुळे नाही. त्यामुळे ख्रिश्चनांसाठी _________________________ अनावश्यक आहे. [si पृ. २१८ परि. ६]
२४. थेस्सलनीकाकरांस लिहिलेल्या आपल्या पहिल्या पत्रात पौल चार वेळा येशू ख्रिस्ताच्या _________________________ उल्लेख करतो; स्पष्टतः, या शिकवणुकीविषयी मंडळीला आस्था होती म्हणून. [si पृ. २३१ परि. १५]
२५. थेस्सलनीकाकरांस लिहिलेले दुसरे पत्र, _________________________ या वर्षी _________________________ असताना _________________________ लिहिले होते. [si पृ. २३२ परि. ४]
पुढील विधानांतून अचूक उत्तर निवडा:
२६. सेवेमार्फत जीवनावश्यक गोष्टी प्राप्त करण्याच्या हक्काची चर्चा करताना पौल (तालमूद; मिशना; मोशेचे नियमशास्त्र) यांचा उल्लेख करतो जे म्हणते, की मळणी करीत असलेल्या बैलाला मुसके घालू नये तसेच मंदिरात सेवा करणारे (लेवी; नथीनीम; अहरोनाचे राजकीय घराणे) यांना/याला वेदीवर अर्पण केलेल्यातला आपापला वाटा मिळत असे. [si पृ. २१३ परि. २४]
२७. पौलाने गलतीकरांना लिहिलेले पत्र, यशया ५४:१-६ चे स्पष्टीकरण देऊन (पार्थिव यरुशलेम; वरील यरुशलेम; नवे यरुशलेम) यहोवाची स्त्री असल्याची ओळख देते. (गलती. ४:२१-२६) [si पृ. २१९ परि. १६]
२८. इफिसकर १:१० येथील “व्यवस्था” (मशीही राज्य; नियमन मंडळ; आपल्या घरादाराचा कारभार सांभाळण्याचा देवाचा मार्ग) यांना सूचित करते. [si पृ. २२१ परि. ८]
२९. दुसरे थेस्सलनीकाकर २:३ येथे उल्लेखिलेला “अनीतिमान पुरुष” (यहुदीय; ख्रिस्ती धर्मजगताचा धर्मपुढारी; मोठी बाबेल) असल्याचे ओळखले जाऊ शकते. [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR९० ८/१ पृ. २२ परि. ११.]
३०. पहिले करिंथकर १२:३१ येथील “सर्वोत्कृष्ट मार्ग” (सत्याच्या; प्रीतीच्या; आध्यात्मिक वरदानांनी युक्त असलेल्या जीवनाच्या) मार्गाला सूचित करतो. [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w९२ ७/१५ पृ. २७ परि. ३.]
पुढील शास्त्रवचने त्याखालील विधानांशी जुळवा:
१ करिंथ. १०:११, १२; २ करिंथ. ४:७; २ करिंथ. ८:१४; फिलिप्पै. ४:६, ७; २ थेस्सलनी. १:८, ९, १२
३१. एखादी व्यक्ती ख्रिस्ती सेवेस आपल्या जीवनात प्रथम स्थान देते तेव्हा ती देवप्रदत्त सामर्थ्य अनुभवते. [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w९० ३/१ पृ. २९ परि. ५.]
३२. मोशेच्या नेतृत्वाखाली असलेल्या इस्राएलांचे इशारेवजा उदाहरण डोळ्यांपुढे ठेवून आत्मनिर्भर होण्याचे आपण टाळावे. [si पृ. २१३ परि. २३]
३३. भौतिकरित्या समृद्ध असलेल्या ख्रिश्चनांच्या उदार देणग्यांमुळे गरीब परिस्थितींत राहणाऱ्यांच्या गरजा भागू शकतात; तर पीडित जणांचा आवेश आणि सहनशीलता, देणगी देणाऱ्यांसाठी आनंद व उत्तेजनाचा स्रोत ठरू शकते. [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR९३ १२/१ पृ. २७ परि. २०.]
३४. सुवार्तेचा प्रचार करण्यात आपण कमी पडू नये कारण बायबलनुसार आज जिवंत असलेले आणि या दुष्ट व्यवस्थीकरणाच्या अंतापर्यंत जिवंत राहिलेले, शिवाय खऱ्या उपासनेचे शत्रू म्हणून ज्यांचा न्याय होतो असे सर्वजण सार्वकालिक नाशास सामोरे जातील. [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w८९ ५/१ पृ. १९ परि. ४.]
३५. सर्वात खडतर संकटप्रसंगामध्ये देखील यहोवा विसावा आणि शांती देतो. [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w८८ ११/१ पृ. ३० परि. १९-२०.]