घोषणा
◼ ऑगस्टसाठी: साहित्य सादरता: पुढीलपैकी कोणतीही ३२ पृष्ठांची माहितीपत्रके सादर केली जाऊ शकतात: जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल?, तुम्ही त्रैक्य मानावे का?, तुमची प्रिय व्यक्ती मरते तेव्हा (इंग्रजी), देव खरोखरी आपली काळजी करतो का?, नंदनवन आणविणारे सरकार आणि भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा! उचित असेल तेथे पुढील माहितीपत्रके सादर केली जाऊ शकतात: आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील?, देव आपल्याकडून काय अपेक्षितो, मृतांचे आत्मे—ते तुमची मदत करू शकतात का किंवा तुम्हाला हानी पोहंचवू शकतात का? ते खरोखर अस्तित्वात आहेत का? (इंग्रजी), युद्ध नसलेले जग कधी असेल का? (इंग्रजी), आणि सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक. सप्टेंबर: सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान. पर्याय म्हणून निर्मिती (इंग्रजी) अनंतकाल जगू शकाल ही पुस्तके सादर केली जाऊ शकतात. ऑक्टोबर: टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिकांच्या वर्गण्या. वर्गणी नाकारल्यास टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिकांच्या किरकोळ प्रती सादर केल्या जाऊ शकतात. नोव्हेंबर: सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान.
◼ रविवार, ऑगस्ट ३० रोजी किंवा जास्तीत जास्त सोमवारी, ऑगस्ट ३१ रोजी सर्व प्रचारकांनी आपापला क्षेत्र सेवा अहवाल मंडळीला द्यावा असे प्रोत्साहन आम्ही देत आहोत. त्यानंतर गुरुवारी, सप्टेंबर ३ पर्यंत मंडळीच्या सचिवांनी मंडळीचा अहवाल (S-1) संस्थेला पाठवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करावा; जेणेकरून सेवा वर्षाचा वार्षिक अहवाल संकलित करण्यासाठी वेळेवर आमच्याकडे पोहंचेल.
◼ प्रत्येक मंडळीला तीन लिटरेचर इंव्हेंटरी फॉर्म्स (S-AB-18) मिळतील. मंडळीच्या सचिवांनी ऑगस्टच्या सुरवातीलाच साहित्य हाताळणाऱ्या बांधवाशी बोलून महिना अखेरीस मंडळीच्या साहित्य साठ्याची यादी तयार करण्यासाठी तारीख ठरवावी. साठ्यातील सर्व साहित्यांची अचूक मोजणी करून एकूण संख्या लिटरेचर इंव्हेंटरी फॉर्मवर नोंदवावी. नियतकालिक हाताळणाऱ्या सेवकाकडून शिल्लक राहिलेल्या नियतकालिकांची संख्या मिळवली जाऊ शकते. सप्टेंबर ६ ही संस्थेला मूळ प्रत पाठवण्याची अखेरची तारीख आहे. याची कार्बन कॉपी तुमच्या फाईलमध्ये ठेवावी. तिसरी प्रत, कच्ची प्रत (वर्क-शीट) म्हणून वापरली जाऊ शकते. यादी तयार करण्याच्या कामावर सचिवांनी देखरेख करावी आणि पूर्ण केलेल्या फॉर्मची, अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी तपासणी करावी. सदर फॉर्मवर, सचिव आणि अध्यक्षीय पर्यवेक्षक सही करतील.
◼ काँग्रीगेशन अनॅलिसिस रिपोर्टवर (S-10) नोंद करण्यासाठी मंडळीचे सचिव आकडे देखील संकलित करतील. काँग्रीगेशन पब्लिशर रेकॉर्ड काड्र्समधील (S-21) आवश्यक माहितीची कोष्टकांत अचूकपणे नोंद केली आहे की नाही याची खात्री करण्यासाठी अहवाल संकलित करण्यास मदत करणाऱ्या वडिलांना किंवा सेवा सेवकांना ते काळजीपूर्वक सूचना देतील. कृपया, फॉर्म भरण्याआधी त्यावर दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा. काँग्रीगेशन अनॅलिसिस रिपोर्ट फॉर्म अचूक व नीटनेटका भरलेला असावा; तसेच सही करण्याआधी सेवा समितीने तो काळजीपूर्वक तपासावा. कृपया, सप्टेंबर १० च्या आत, मूळ S-10 फॉर्म संस्थेला पाठवावा. याची कार्बन कॉपी तुमच्या फाईलमध्ये ठेवावी.
◼ मंडळीच्या सेवा समितीने, नियमित पायनियर सेवेसाठी आलेल्या सर्व अर्जाची त्वरित दखल घ्यावी. एखादा अर्जदार आवश्यक तास भरू शकतो की नाही हे निश्चित करण्यासाठी सेवा समितीने त्याचा अर्ज मागे ठेवू नये. ज्या तारखेपासून प्रचारक नियमित पायनियरींग सुरू करू इच्छितो त्या तारखेनंतर जर संस्थेला त्याचा अर्ज मिळाला तर नियमित पायनियर म्हणून नेमणूक होण्याची त्याची तारीख देखील संस्थेमार्फत आपोआप बदलली जाऊ शकते. तथापि, अपवादात्मक परिस्थीतींत संस्था आहे तीच तारीख ठेवते. अशा परिस्थितींत, अर्जासोबत एक पत्र देखील पाठवले जावे.—ऑक्टोबर १९८६ ची आमची राज्य सेवा पुरवणी, परिच्छेद २४-६ पाहा.
◼ जुलै १९९८ च्या आमची राज्य सेवा अंकातील घोषणा सदरात असे सांगितले होते, की सप्टेंबर २१ ने सुरू होणाऱ्या सप्ताहापासून मंडळीच्या पुस्तक अभ्यासात अपेक्षा माहितीपत्रक अभ्यासले जाईल. यानंतर मग जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल? आणि देव खरोखरी आपली काळजी करतो का? ही माहितीपत्रके अभ्यासली जातील.
◼ पुन्हा उपलब्ध असलेली नवीन प्रकाशने:
आपली सेवा पूर्ण करण्यास संघटित (सुधारित आवृत्ती)—इंग्रजी
एम्फॅटिक डायग्लॉट—इंग्रजी
किंग्डम इंटरलिनियर—इंग्रजी
पवित्र शास्त्रवचनांचे नवीन जग भाषांतर, (मोठ्या छपाईचे) [चार खंडांचा संच]—इंग्रजी
द बायबल इन लिव्हिंग इंग्लिश