वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/९८ पृ. २
  • ऑगस्टसाठी सेवा सभा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ऑगस्टसाठी सेवा सभा
  • आमची राज्य सेवा—१९९८
  • उपशिर्षक
  • ऑगस्ट ३ ने सुरू होणारा सप्ताह
  • ऑगस्ट १० ने सुरू होणारा सप्ताह
  • ऑगस्ट १७ ने सुरू होणारा सप्ताह
  • ऑगस्ट २४ ने सुरू होणारा सप्ताह
  • ऑगस्ट ३१ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—१९९८
km ८/९८ पृ. २

ऑगस्टसाठी सेवा सभा

ऑगस्ट ३ ने सुरू होणारा सप्ताह

गीत २१६ (९)

१० मि:स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा. देशाच्या व स्थानीय मंडळीच्या एप्रिल महिन्याच्या क्षेत्र सेवा अहवालावर विवेचन मांडा.

१५ मि:“ऑगस्ट महिना एक खास महिना ठरेल का?” प्रश्‍नोत्तरे. ऑगस्ट महिन्यात तसेच नवीन सेवा वर्षातील प्रत्येक महिन्यात सेवेत सहभाग घेण्याचे प्रोत्साहन सर्वांना द्या.

२० मि:“मन आणि अंतःकरण आकर्षिण्यासाठी माहितीपत्रकांचा उपयोग करा.” श्रोत्यांसोबत चर्चा. महत्त्वपूर्ण आध्यात्मिक बाबींची माहिती लोकांना देण्यासाठी आजवर प्रकाशित झालेल्या माहितीपत्रकांची संक्षिप्त उजळणी करा. (पाहा टेहळणी बुरूज प्रकाशनांची सूची १९८६-१९९५ (इंग्रजी), पृष्ठे ६५२-३.) अलीकडील माहितीपत्रकांचे विशिष्ट मुद्दे सांगून कोणत्या व्यक्‍तींना ही माहितीपत्रके स्वीकारण्यास आवडतील याची चर्चा करा. एक-दोन प्रात्यक्षिके दाखवा.

गीत १९१ (२१) व समाप्तीची प्रार्थना.

ऑगस्ट १० ने सुरू होणारा सप्ताह

गीत १२७ (१५)

१० मि:स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल. ऑगस्ट महिन्यात क्षेत्र सेवेत सहभाग घेणाऱ्‍या सर्व प्रचारकांचे ध्येय काय ते सांगा.

१५ मि:स्थानिक गरजा.

२० मि:“युवकांनो—आपल्या शालेय शिक्षणाचा फायदा घ्या.” प्रश्‍नोत्तरे. एप्रिल ८, १९९२, सावध राहा! (इंग्रजी), पृष्ठे १७-१९, आणि जून १, १९९२, टेहळणी बुरूज, पृष्ठे २५-८.

गीत ३७ (९) व समाप्तीची प्रार्थना.

ऑगस्ट १७ ने सुरू होणारा सप्ताह

गीत १६३ (२३)

१० मि:स्थानिक घोषणा. आस्थेचा मागोवा घेण्याच्या उद्देशाने रस्त्यावर, उद्यानात किंवा इतर ठिकाणी साक्ष दिलेल्या व्यक्‍तीकडून त्याचा नावपत्ता कसा मिळवावा यावर संक्षिप्त विवेचने मांडण्याचे श्रोत्यांना आमंत्रण द्या.

३५ मि:“शिष्य बनविण्याच्या निकडीच्या कार्यावर एक प्रगत दृष्टिकोन.” प्रश्‍नोत्तरे. परिच्छेद ५, १० आणि ११ चे वाचन करा. मंडळीतील बायबल अभ्यास कार्याच्या प्रगतीची उजळणी करा. शिक्षण देण्याची आपली कौशल्ये सुधारण्यासाठी, अभ्यास संचालित करणाऱ्‍या सर्वांना जून १९९६ ची आमची राज्य सेवा पुरवणी वाचून काढण्याचे प्रोत्साहन द्या. त्या पुरवणीतील परिच्छेद ५ आणि २५ विचारात घ्या.

गीत १०८ (५) व समाप्तीची प्रार्थना.

ऑगस्ट २४ ने सुरू होणारा सप्ताह

गीत २१३ (२३)

१२ मि:स्थानिक घोषणा. जुलै १९९८ ची आमची राज्य सेवा यातील “वीस हजार!” असे शीर्षक असलेली पेटी विचारात घ्या. ऑगस्ट महिन्याचा केवळ एक सप्ताहांत बाकी असल्यामुळे सर्वांना महिना संपण्यापूर्वी सेवेत सहभाग घेण्याचे प्रोत्साहन द्या. ऑगस्ट ३० पर्यंत किंवा मग जास्तीत जास्त ऑगस्ट ३१ पर्यंत आपला ऑगस्टचा क्षेत्र सेवा अहवाल देण्याची आठवण सर्वांना करून द्या. आपल्या गटातील प्रत्येकाने अहवाल दिला आहे की नाही याची पुस्तक अभ्यास संचालकांनी खात्री करावी, जेणेकरून सप्टेंबर ३ पर्यंत सचिवांना सर्व अहवालांचे संकलन करता येईल. “खास संमेलन दिवसाचा नवीन कार्यक्रम” याची उजळणी करा.

१८ मि:पायनियर सेवेत कसे टिकून राहावे. सप्टेंबर १५, १९९३, टेहळणी बुरूज (इंग्रजी), पृष्ठे २८-३१ यावर आधारित भाषण. गंभीर समस्यांना तोंड देण्यास शिकलेल्या व पायनियर सेवेत टिकून राहिलेल्या एखाद्या पायनियरची मुलाखत घ्या.

१५ मि:आमची राज्य सेवा याचा चांगला उपयोग करा. श्रोत्यांसोबत चर्चा. अलीकडील उदाहरणांचा उपयोग करून, आमची राज्य सेवा यात आढळणाऱ्‍या समयोचित माहितीचे व त्यापासून मिळणाऱ्‍या लाभांचे स्पष्टीकरण द्या: (१) नियमितपणे सेवेत सहभाग घेण्यास आपल्याला प्रोत्साहित करणारे लेख; (२) पवित्र सेवेत आपल्याला प्रोत्साहन देणारे अनुभव; (३) प्रभावीपणे सुवार्ता सादर करण्यास मदत करणाऱ्‍या सूचना; (४) स्थानिक क्षेत्रात लाभदायक ठरणाऱ्‍या नवीन उपलब्ध असलेल्या प्रकाशनांची घोषणा; (५) राज्य कार्याची प्रगती दाखवणारे सेवा अहवाल; (६) जगभरातील कार्याची प्रगती दाखवणारे ईश्‍वरशासित वृत्त; (७) भावी कार्यक्रमांची पूर्ण माहिती देणाऱ्‍या घोषणा व आराखडे; (८) गंभीर बाबींची उत्तरे देणाऱ्‍या प्रश्‍न पेट्या; आणि (९) अधिवेशने, खास मोहिमा व इतर कार्यक्रमांची माहिती देणाऱ्‍या आणि आपल्या आध्यात्मिक गरजांवर लक्ष देण्यास मदत करणाऱ्‍या पुरवण्या. याचा प्रत्येक अंक वाचण्याचे, त्यातील सूचना लागू करण्याचे, सेवा सभांना व क्षेत्र सेवा सभांना ती घेऊन येण्याचे आणि भविष्यात उपयोग करता येईल यासाठी ती आपल्या वैयक्‍तिक फाईलमध्ये जपून ठेवण्याचे सर्वांना प्रोत्साहन द्या.

गीत २१० (१५) व समाप्तीची प्रार्थना.

ऑगस्ट ३१ ने सुरू होणारा सप्ताह

गीत ६५ (२८)

१२ मि:स्थानिक घोषणा. सप्टेंबरची साहित्य सादरता विचारात घ्या. “आपण देवाच्या नावाचा उपयोग का करावा?” हा प्रश्‍न उपस्थित करणारे एक संक्षिप्त प्रात्यक्षिक दाखवा. ज्ञान पुस्तकातील, अध्याय ३, परिच्छेद ६ चा उपयोग करून या प्रश्‍नाचे उत्तर द्या.

१५ मि:“पर्यवेक्षक पुढाकार घेतात—अध्यक्षीय पर्यवेक्षक.” अध्यक्षीय पर्यवेक्षकांचे भाषण. आपल्या कर्तव्यांची उजळणी केल्यानंतर कळपाचे राखण करण्यात मंडळी वडिलांशी जे सहकार्य करते त्याबद्दल ते कृतज्ञता व्यक्‍त करतात.

१८ मि:शाळेतील समस्यांना तोंड देण्यास आपल्या पाल्यांना मदत करा. ज्यांची मुले शाळेत जातात अशा दोन किंवा तीन पालकांसोबत वडील चर्चा करतात. ऑगस्ट ८, १९९४, सावध राहा! (इंग्रजी) पृष्ठे ५-७ वर सांगितल्याप्रमाणे मुले ज्या अधिक सर्वसामान्य समस्यांना तोंड देतात अशा काही समस्यांवर संक्षिप्त विवेचन मांडा. मग, पालक आपल्या मुलांचे संरक्षण कसे करू शकतात आणि चांगला पालक-शिक्षक नातेसंबंध कसा जोपासू शकतात याची पृष्ठे ८-१० चा संदर्भ घेऊन चर्चा करतात.

गीत २४ (१३) व समाप्तीची प्रार्थना.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा