वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/९८ पृ. १
  • नेहमी उपस्थित राहणे किती बरे!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नेहमी उपस्थित राहणे किती बरे!
  • आमची राज्य सेवा—१९९८
  • मिळती जुळती माहिती
  • उपासनेकरता एकत्र जमणं महत्त्वाचं का आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांना गेल्यामुळे तुम्हाला कोणते फायदे होतील?
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • ख्रिस्ती सभांबद्दल कदर बाळगणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • तुमची वहिवाट काय आहे?
    आमची राज्य सेवा—१९९०
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९८
km ७/९८ पृ. १

नेहमी उपस्थित राहणे किती बरे!

१ दशकानुदशके पूर्व युरोपमध्ये आपल्या अनेक प्रिय बांधवांना जाहीररीत्या एकत्र येण्याची बंदी होती. ही बंदी उठवली गेली व ते मुक्‍तपणे एकत्र येऊ शकले तेव्हा त्यांना किती आनंद झाला असेल याची कल्पना करा!

२ अशाच एका मंडळीला दिलेल्या आपल्या भेटीबद्दल एका विभागीय पर्यवेक्षकाने लिहिले: “मंगळवारी संध्याकाळी, म्हणजे माझ्या भेटीच्या अगदी पहिल्याच दिवशी, खोली गरम ठेवण्याची यंत्रणा बिघडली. बाहेर गोठवणारी थंडी होती, तर आतले तापमान केवळ पाच अंश सेल्सिअसच्या जवळपास होते. कोट, स्कार्फ, हातमोजे, टोप्या व बूट हे सर्व घालून बांधव बसले होते. बायबलची पानं उलटणं देखील शक्य नसल्यामुळे एकही जण सांगितलेले शास्त्रवचन उघडू शकत नव्हता. सूट घालून व्यासपीठावर उभा असलेला मी जाम गारठलो होतो; आणि मी जेव्हा जेव्हा बोलत होतो तेव्हा तेव्हा माझ्या तोंडून वाफ बाहेर पडताना मला दिसत होती. एका गोष्टीमुळे मात्र मी अतिशय प्रभावित झालो; आणि ती म्हणजे एकानेसुद्धा तक्रार केली नाही. उलट, उपस्थित राहणे किती सुखावह व चांगले होते याविषयी बांधव भरभरून बोलले.” सभा चुकवण्याचा विचारही या बांधवांच्या मनाला शिवला नव्हता!

३ आपलीही हीच वृत्ती आहे का? आपल्या साप्ताहिक सभांमध्ये एकत्र येण्याच्या स्वातंत्र्याची आपण कदर करतो का? किंवा मग परिस्थिती अनुकूल असताना देखील आपण सभांना क्षुल्लक लेखतो का? नियमितपणे सभांना उपस्थित राहणे कदाचित नेहमीच सोपे नसेल; शिवाय असेही काही प्रसंग असतील जेव्हा उपस्थित न राहण्याचे काही सबळ कारण आपल्यापाशी असेल. तथापि, याचा कदापि विसर पडू देऊ नका की, आपल्यामध्ये असेही लोक आहेत जे वयोवृद्ध, गंभीर आरोग्य समस्या, शारीरिक अपंगत्व, ओढगस्तीचे आराखडे व इतर गंभीर जबाबदाऱ्‍या असतानासुद्धा सभांचे महत्त्व जाणतात व जवळजवळ नेहमीच उपस्थित असतात. अनुकरण करण्यास किती उत्तम उदाहरणे!—पडताळा लूक २:३७.

४ सर्व ख्रिस्ती सभांना उपस्थित राहण्याद्वारे खऱ्‍या उपासनेस पाठिंबा देण्याचा दृढनिश्‍चय आपण करू या; मग तो एखादा लहान पुस्तक अभ्यास गट असो अथवा एखादे मोठे अधिवेशन असो. या मेळाव्यांत उपस्थित राहण्याच्या बाबीकडे आपण गांभीर्याने का पाहिले पाहिजे बरे? कारण आपण एकत्र यावे हा एक ईश्‍वरी हुकूम आहे. पण, याची इतरही काही महत्त्वपूर्ण कारणे आहेत. आपल्या सर्वांनाच सभांमध्ये मिळणाऱ्‍या ईश्‍वरी शिक्षणाच्या लाभांची व पवित्र आत्म्याच्या साह्‍याची गरज आहे. (मत्त. १८:२०) आपण आपल्या बांधवांशी साहचर्य करतो तेव्हा उत्तेजनाचे आदानप्रदान होऊन आपली उभारणी होते.—इब्री. १०:२४, २५.

५ येशूच्या रूपांतराच्या वेळी पेत्राने म्हटले, “हे गुरू, येथे असणे हे आम्हास बरे आहे.” (लूक ९:३३; पं.र.भा.) सर्व ख्रिस्ती सभांविषयी आपलीही भावना अशीच असली पाहिजे. खरेच, नेहमी उपस्थित राहणे किती बरे!

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा