वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/९८ पृ. ८
  • ‘सर्व माणसांना’ साक्ष देणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ‘सर्व माणसांना’ साक्ष देणे
  • आमची राज्य सेवा—१९९८
  • मिळती जुळती माहिती
  • या महिन्याच्या सादरतेस प्रस्तुत करणे
    आमची राज्य सेवा—१९९२
  • देवाकडील ज्ञान अनेक प्रश्‍नांची उत्तरे देते
    आमची राज्य सेवा—१९९७
  • क्षेत्र सेवेकरता सुचवलेल्या काही सादरता
    आमची राज्य सेवा—२००५
  • “सार्वकालिक जीवन हेच आहे”
    आमची राज्य सेवा—१९९६
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९८
km ६/९८ पृ. ८

‘सर्व माणसांना’ साक्ष देणे

१ आपण विविध सांस्कृतिक व धार्मिक पार्श्‍वभूमींच्या लोकांना भेटतो तेव्हा, “सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहंचावे” अशी खुद्द यहोवाचीच इच्छा आहे याचा विसर पडू देत नाही. (१ तीम. २:४) विशेष तयार केलेल्या असंख्य पत्रिका व माहितीपत्रके यांसोबतच दोन सर्वोत्कृष्ट प्रकारची साहित्ये देखील आपल्यापाशी आहेत; ज्या लोकांच्या धर्माने त्यांना देव आणि ख्रिस्त यांच्याबद्दलचे सत्य शिकवले नाही अशांची मदत करण्याकरता कोणत्याही प्रसंगी या पुस्तकांचा उपयोग केला जाऊ शकतो.

२ येशू ख्रिस्ताच्या जीवनक्रमावर प्रकाश पाडून सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य हे पुस्तक, पहिल्या शतकांतील अनेक लोकांप्रमाणे देवाच्या पुत्राशी चांगले परिचित होण्यास व त्याच्या समीप जाण्यास एखाद्याला साह्‍य करू शकते. (योहान १२:३२) सार्वकालिक जीवनाची आशा, हा सर्वांचाच अपार जिव्हाळ्याचा विषय आहे. प्रत्येकाला या विस्मयकारक आशेशी परिचित होता यावे या हेतूनेच, तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे. सर्वश्रेष्ठ मनुष्य आणि अनंतकाल जगू शकाल ही दोन्ही पुस्तके अल्प दरांत सादर केली जाऊ शकतात. कोणत्याही उचित प्रसंगी, ही पुस्तके प्रस्तुत करण्यासाठी तुम्ही पुढे सुचवलेल्या प्रस्तुतींचा प्रयोग करून पाहू शकता.

३ एखाद्याला “सर्वश्रेष्ठ मनुष्य” पुस्तक सादर करणे तुम्हाला उचित वाटत असल्यास तुम्ही असे विचारू शकता:

◼ “तुम्ही येशू ख्रिस्ताचा विचार करता तेव्हा तुमच्या मनात प्रथम काय येते? [प्रतिसादास वाव द्या.] अनेक इतिहासकार हे मान्य करतात, की येशू हा सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य होऊन गेला. [सर्वश्रेष्ठ मनुष्य पुस्तकाच्या प्रस्तावनेतील एखाद्या उदाहरणाचा उल्लेख करा.] बायबल दाखवून देते, की आपल्यासाठी येशूचे जीवन एक आदर्श होते.” पहिले पेत्र २:२१ तसेच, सर्वश्रेष्ठ मनुष्य पुस्तकातील प्रस्तावनेच्या शेवटल्या पृष्ठावरील पहिला परिच्छेद वाचा. येशूबद्दल जाणून घेण्यात घरमालकाला आस्था असल्यास हे पुस्तक सादर करा. निघण्यापूर्वी योहान १७:३ वाचा आणि असा एक प्रश्‍न विचारा की, “सार्वकालिक जीवन देणारं हे ज्ञान आपल्याला कसं मिळवता येईल बरं?” याचे उत्तर देण्यासाठी पुन्हा भेट घेण्याच्या निश्‍चित योजना आखा.

४ जीवन देणारे ज्ञान कसे मिळवावे याचे उत्तर देण्यासाठी तुम्ही पुन्हा भेट देता तेव्हा असे म्हणू शकता:

◼ “सार्वकालिक जीवन देणारं ज्ञान आपल्याला कसं मिळवता येईल याचं उत्तर देण्यासाठी पुन्हा येईल म्हणून मी सांगितलं होतं.” ज्ञान पुस्तक दाखवा आणि पहिल्या अध्यायातून अभ्यास कसा चालवला जातो त्याचे प्रात्यक्षिकही करून दाखवा.

५ “तुम्ही पृथ्वीवर अनंतकाल जगू शकता” हे पुस्तक सादर करू इच्छिता तर तुम्ही असे विचारू शकता:

◼ “सार्वकालिक जीवन जगणं निव्वळ एक स्वप्न आहे असं तुम्हाला वाटतं का?” याचे उत्तर मिळाल्यानंतर, अनंतकाल जगू शकाल पुस्तकातील पृष्ठ ७ काढा. परिच्छेद ४ मधील मुद्दे ठळक करा आणि मग, एका शुद्ध केलेल्या पृथ्वीवर सर्वकाळ जगणे इष्ट असेल याच्याशी घरमालक सहमत आहे की नाही याविषयी त्याला विचारा. पृष्ठे ८ आणि ९ वरील चित्रांची, पृष्ठे ११-१३ वरील चित्रांशी तुलना करा. परिच्छेद १३ मध्ये उद्‌धृत केलेल्या शास्त्रवचनांपैकी एखादे शास्त्रवचन वाचा. घरमालकाला खरोखरच आस्था असल्यास पुस्तक सादर करा. निघण्यापूर्वी तुम्ही असा प्रश्‍न विचारू शकता: “तुमच्याबाबतीत सार्वकालिक जीवनाची आशा एक वास्तविकता ठरायची असल्यास काय करावं लागेल असं तुम्हाला वाटतं?” या प्रश्‍नाचं उत्तर देण्यासाठी पुनर्भेटीची व्यवस्था करा.

६ सार्वकालिक जीवन वास्तवात कसे उतरेल याचे स्पष्टीकरण देण्यासाठी तुम्ही पुन्हा घरमालकाची भेट घेता तेव्हा असे विचारू शकता:

◼ “तुम्हाला आठवत असेल, मागच्या वेळी निघण्याआधी मी एक प्रश्‍न विचारला होता की, ‘तुमच्याबाबतीत सार्वकालिक जीवनाची आशा एक वास्तविकता ठरायची असल्यास काय करावं लागेल असं तुम्हाला वाटतं?’” प्रतिसादासाठी वाव द्या. अनंतकाल जगू शकाल पुस्तकातील पृष्ठ १५ काढा आणि परिच्छेद १९ मध्ये उद्‌धृत केलेले योहान १७:३ हे शास्त्रवचन वाचा. हे खास प्रतीचे ज्ञान घरमालकाला आणि त्याच्या कुटुंबियांनाही मिळवता येईल व त्याला सोयीस्कर असेल अशा वेळी नियमितपणे त्याची भेट घेण्यास तुम्हाला आवडेल असे त्याला सांगा. तुम्ही नियमितपणे घरमालकाची भेट घेऊ लागता त्याच्या काही समयानंतर अपेक्षा माहितीपत्रक किंवा ज्ञान पुस्तक प्रस्तुत करू शकता.

७ संभाषण सुरू करणारे सहायक: अनंतकाल जगू शकाल पुस्तकात, शिक्षण देण्यास मदत करू शकणारे अनेक सहायक असून पहिल्या भेटीत अथवा पुनर्भेटीत संभाषण सुरू करण्यासाठी त्यांचा उपयोग केला जाऊ शकतो. केवळ एखादा उचित प्रश्‍न विचारून तुम्ही संभाषण सुरू करू शकता. उदाहरणार्थ, पुढील प्रश्‍नांची आणि ज्या अध्यायांत त्यांची उत्तरे दिली आहेत त्यांची नोंद घ्या:

देव—तो कोण आहे? (४)

पवित्र शास्त्र खरेच देवापासून आहे का? (५)

मृत्यूच्या वेळी काय होते? (८)

देवाने दुष्टपणाला परवानगी का दिली? (११)

स्वर्गास कोण जातात व का? (१४)

आपण दहा आज्ञांच्या अधीन आहोत का? (२४)

८ अनंतकाल जगू शकाल पुस्तकातील ते विशिष्ट पृष्ठ (पृष्ठे) उघडून चर्चा केल्या जात असलेल्या मुद्द्‌याचे स्पष्टीकरण तुम्ही देऊ शकता. मग अपेक्षा माहितीपत्रकातून अथवा ज्ञान पुस्तकातून ज्याचे उत्तर देता येईल व जो विषयाला धरून असेल असा एखादा प्रश्‍न विचारा. घरमालकाला एक हस्तपत्रिका देऊन जाहीर सभेचे आमंत्रण द्या. पुस्तके ज्या अनुदानात सादर केली जात आहेत ते अनुदान, पुस्तकांच्या निर्मितीमागे खर्च झालेल्या पैशापेक्षा कमी आहे आणि आपले कार्य स्वेच्छेने दिलेल्या अनुदानांवर चालते हे सांगा.

९ प्रामाणिक अंतःकरणाचे सर्व प्रकारचे लोक देवाच्या व ख्रिस्ताच्या सत्याचा शोध घेत आहेत. अनेकांना, पृथ्वीवरील परादीसमध्ये अनंतकाल जगण्याच्या विचाराचे कुतूहल वाटते. आपल्या साक्षीकार्याद्वारे अशा सर्व लोकांना आपण साह्‍य करू शकतो. तर मग आपण, ‘श्रम व खटपट करत राहू कारण जो सर्व माणसांचा व विशेषकरून विश्‍वास ठेवणाऱ्‍यांचा तारणारा, त्या जिवंत देवावर आपण आपली आशा ठेवली आहे.’—१ तीम. ४:१०.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा