वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/९८ पृ. ६
  • प्रश्‍न पेटी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रश्‍न पेटी
  • आमची राज्य सेवा—१९९८
  • मिळती जुळती माहिती
  • ईश्‍वरशासित वृत्त
    आमची राज्य सेवा—१९९१
  • ईश्‍वरशासित वृत
    आमची राज्य सेवा—१९९०
  • ईश्‍वरशासित वृत्त
    आमची राज्य सेवा—१९९२
  • ईश्‍वरशासित वृत्त
    आमची राज्य सेवा—१९९१
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९८
km ५/९८ पृ. ६

प्रश्‍न पेटी

◼ यहोवाच्या साक्षीदारांनी पुन्हा आपल्या घरी येता कामा नये असे घरमालकाने निक्षून सांगितल्यास परिस्थिती कशी हाताळली जावी?

धार्मिक स्वरूपाच्या भेटी प्रतिबंधित करणारी सूचना दारावर अथवा फाटकावर लावलेली असल्यास व सदर सूचनेत विशेषतः यहोवाच्या साक्षीदारांचा उल्लेख केला असल्यास घरमालकाच्या इच्छेचा आदर करून दार ठोठावण्याचे टाळणे सर्वात उत्तम ठरेल.

कधीकधी केवळ विक्रेत्यांना अथवा देणगी गोळा करणाऱ्‍यांना प्रतिबंध करणारी सूचना आपल्या नजरेस येते. पण, आपण लोकांसाठी धर्मार्थ कार्य करत असल्यामुळे खरे तर ती सूचना आपल्याला लागू होत नाही. अशावेळी दार ठोठावणे उचित ठरेल. घरमालकाने आक्षेप घेतल्यास, अशा सूचना आपल्याला का लागू होत नाहीत हे आपण व्यवहारकुशलतेने त्यांना सांगू शकतो. सदर प्रतिबंध सूचना यहोवाच्या साक्षीदारांना देखील लागू होते असे घरमालकाने स्पष्ट केल्यास आपण त्याच्या इच्छेचा आदर करू.

क्षेत्रात कार्य करत असताना एखादा घरमालक आपल्यावर चिडला असल्याचे दिसून येईल आणि आपण पुन्हा त्याच्या घरी येता कामा नये असेही तो कदाचित ठासून सांगेल. यावर काहीएक बोलण्यास तो तयार नसला तर त्याची ती विनंती आपण मान्य करावी. क्षेत्र नकाशाच्या मागच्या बाजूला पेन्सिलने तारखेसहित तशी नोंद करावी जेणेकरून पुढे कधी त्या क्षेत्रात कार्य करताना प्रचारक ते दार ठोठावणार नाहीत.

तथापि, अशा घरांकडे कायमचे दुर्लक्ष केले जाता कामा नये. त्या घरात राहणारे लोक कदाचित घर सोडून जातील. किंवा आपण कुटुंबातील दुसऱ्‍या एखाद्या सदस्याशी बोलू शकतो जो चांगला प्रतिसाद देईल. आपण ज्या घरमालकाशी बोललो होतो त्याची मनोवृत्ती कदाचित बदलली असेल आणि मोठ्या मनाने तो आपले स्वागत करील. यास्तव, त्या घरात राहणाऱ्‍यांची सद्य मनोवृत्ती काय आहे हे जाणून घेण्यासाठी काही समयानंतर व्यवहारकुशलतेने विचारपूस केली जावी.

वर्षातून एकदा क्षेत्राच्या फाईलची उजळणी करून ज्या लोकांच्या भेटी न घेण्याचे सांगितले गेले आहे त्यांची एक यादी तयार करावी. सेवा पर्यवेक्षकाच्या निर्देशनाखाली, काही व्यवहारचतूर, अनुभवी प्रचारकांना या लोकांची भेट घेण्यास नियुक्‍त केले जाऊ शकते. त्या घरात अद्याप तेच लोक राहत आहेत का, हे विचारण्यास आम्ही भेटी घेत आहोत असे स्पष्टीकरण दिले जाऊ शकते. पवित्र शास्त्र चर्चा कशा सुरू कराव्या व त्या कशा चालू ठेवाव्या या पुस्तिकेतील पृष्ठे ७-१६ वरील “संभाषणाला खीळ घालणाऱ्‍या संभाव्य लोकांना तुम्ही कसा प्रतिसाद दाखवाल” या शीर्षकाखालील माहितीशी प्रचारक परिचित असला पाहिजे. चांगला प्रतिसाद मिळाल्यास अशाच प्रकारे नंतरही भेटी घेतल्या जाऊ शकतात. घरमालक अजूनही विरोध करत असल्यास पुढील वर्षापर्यंत एकदाही त्याची भेट घेऊ नये. एखाद्या विशिष्ट प्रकरणात वेगळ्या प्रकारे परिस्थिती हाताळली जाणे उचित आहे का, हा निर्णय स्थानिक वडीलवर्ग घेऊ शकतो.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा