वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/९८ पृ. ७
  • उन्हाळ्यात तुम्ही काय करणार आहात?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • उन्हाळ्यात तुम्ही काय करणार आहात?
  • आमची राज्य सेवा—१९९८
  • मिळती जुळती माहिती
  • उन्हाळ्याकरता तुमच्या काय योजना आहेत?
    आमची राज्य सेवा—१९९६
  • पावसाळी कालावधीत अधिक ईश्‍वरशासित गोष्टी मिळविणे
    आमची राज्य सेवा—१९९१
  • ईश्‍वरशासित कार्यहालचालींचा उन्हाळ्यात पाठलाग करीत राहा
    आमची राज्य सेवा—१९९४
  • साक्ष देण्याच्या संधी साधा
    आमची राज्य सेवा—१९९०
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९८
km ५/९८ पृ. ७

उन्हाळ्यात तुम्ही काय करणार आहात?

१ वेळेचे उत्तम नियोजन केल्यास आपली उचित ध्येये गाठण्याची अधिक शक्यता नसते का? ईश्‍वरशासित हितांना बढावा देण्याच्या विविध संधी उन्हाळ्यात उपलब्ध असतात. (नीति. २१:५) त्यांपैकी काही ईश्‍वरशासित हित कोणते आहेत बरे?

२ उन्हाळ्यात आपले क्षेत्र सेवा कार्य वाढविण्याचा विचार का करू नये बरे? उन्हाळ्यात दिवस मोठा असल्यामुळे आणि उष्ण हवामान असल्यामुळे तुम्ही कदाचित प्रचार कार्यात अधिक वेळ खर्च करू शकाल. शाळांनाही सुट्ट्या पडल्यामुळे उन्हाळ्यातील एखाददोन महिन्यांत सहायक पायनियरींग करण्याची संधी मुलांना मिळते. इतरजण देखील, पूर्ण पाच सप्ताहांत असलेल्या ऑगस्ट महिन्यात सहायक पायनियरींग करण्याच्या योजना आखू शकतात. या ऑगस्टमध्ये आपल्या सेवा वर्षाचा समारोप होत असताना प्रत्येकाला, शक्य तितक्या पूर्णार्थाने सेवेत सहभाग घेता यावा म्हणून समाईक प्रयत्न केला जाईल.

३ आपले क्षेत्र उरकण्यात मदत हवी असलेल्या जवळपासच्या एखाद्या मंडळीस साह्‍य करण्याची योजना तुम्ही आखत आहात का? विभागीय पर्यवेक्षक, वडिलांना तुमच्या क्षेत्रातील गरजांची माहिती देऊ शकतील. किंवा मग, तुम्ही पात्र असलात आणि क्वचितच कार्य केलेले अथवा अद्याप नियुक्‍त न केलेले क्षेत्र उरकण्याचा अर्ज तुम्ही संस्थेला पाठवू इच्छित असल्यास यांविषयी तुमच्या वडिलांशी विचारविनिमय करा. सुट्टीसाठी तुम्ही बाहेर कोठे जाणार असाल तर त्या स्थानातील मंडळीच्या सभांना व क्षेत्र सेवेला उपस्थित राहण्याच्या योजना आखा. यहोवाचे साक्षीदार नसलेल्या नातेवाईकांना तुम्ही भेट देणार असल्यास कोणत्या मार्गांनी सत्याबद्दल त्यांच्याशी बोलाल त्याची आगाऊ तयारी करा.

४ आपण सर्वांनी आपल्या योजनांमध्ये, “ईश्‍वरी जीवनाचा मार्ग,” या अधिवेशनाचा समावेश केलाच पाहिजे. अधिवेशनाच्या प्रत्येक दिवशी उपस्थित राहता यावे म्हणून कामावरून रजा किंवा शाळेतून सुट्टी मिळविण्याची आगाऊ व्यवस्था करा. होता होईल तितक्या लवकर तुमच्या राहण्याची सोय तसेच प्रवास करण्याची व्यवस्था करा.

५ तर मग उन्हाळ्यात तुम्ही काय करणार आहात? तुम्ही शारीरिक तजेला मिळवू इच्छिता यात शंका नाही. पण, आपल्या जीवनात राज्य हितास सतत प्रथमस्थानी ठेवून आध्यात्मिकरित्याही तजेला मिळविण्यास उपलब्ध असलेल्या अधिक महत्त्वपूर्ण संधींकडे डोळेझाक करू नका.—मत्त. ६:३३; इफिस. ५:१५, १६.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा