वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/९८ पृ. ७
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—१९९८
आमची राज्य सेवा—१९९८
km ५/९८ पृ. ७

घोषणा

◼साहित्य सादरता मे: टेहळणी बुरूज किंवा सावध राहा! यांच्या वर्गण्या. पंधरवडा आवृत्तींची एका वर्षाची वर्गणी ९०.०० रुपये आहे. मासिक आवृत्तींची एका वर्षाची वर्गणी आणि पंधरवडा आवृत्तींची सहा महिन्यांची वर्गणी ४५.०० रुपये आहे. मासिक आवृत्तींसाठी सहा महिन्यांची वर्गणी नाही. वर्गणी नाकारल्यास नियतकालिकांच्या किरकोळ प्रती प्रत्येकी ४.०० रुपयांच्या अनुदानात सादर केल्या जाव्यात.

वर्गण्या प्राप्त करताना आठवणीत ठेवा की, पंजाबी आणि उर्दू वगळता (ज्यांमध्ये ते मासिक आहे), टेहळणी बुरूज आता सर्व भारतीय भाषांत तसेच नेपाळी भाषेत पाक्षिक आहे.

सावध राहा! हे तामीळ व मल्याळम या भाषांत पाक्षिक आहे पण कन्‍नड, गुजराती, तेलगू, नेपाळी, मराठी व हिन्दी या भाषांत ते मासिक आहे. उर्दू, पंजाबी व बंगाली या भाषांत सावध राहा! याच्या त्रैमासिक वितरकांच्या प्रती मंडळ्यांसाठी उपलब्ध आहेत, पण या तीन भाषांत वर्गण्या उपलब्ध नाहीत.

जून: सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य, हे पुस्तक २०.०० रुपयांच्या अनुदानात. (पायनियरांसाठी याचा दर १५.०० रुपये आहे.) पर्याय म्हणून, अर्धा दर अथवा खास दर यादीतील कोणतीही १९२ पृष्ठांची जुनी पुस्तके. जुलै आणि ऑगस्ट: पुढील कोणतीही ३२ पृष्ठांची माहितीपत्रके ६.०० रुपयांच्या अनुदानात सादर केली जाऊ शकतात: आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील?, जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल?, तुम्ही त्रैक्य मानावे का?, तुमची प्रिय व्यक्‍ती मरते तेव्हा (इंग्रजी), देव आपल्याकडून काय अपेक्षितो?, देव खरोखरी आपली काळजी करतो का?, नंदनवन आणविणारे सरकार, “पहा! मी सर्व नवे करतो,” भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा!, सर्वकाळ टिकणारे ईश्‍वरी नाम (इंग्रजी) आणि सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक. उचित असेल तेथे पुढील माहितीपत्रके सादर केली जाऊ शकतात: मृतांचे आत्मे—ते तुमची मदत करू शकतात का किंवा तुम्हाला हानी पोहंचवू शकतात का? (इंग्रजी) ते खरोखर अस्तित्वात आहेत का? (इंग्रजी) आणि युद्ध नसलेले जग कधी असेल का? (इंग्रजी)

सूचना: ज्या मंडळ्यांनी अद्याप वरील मोहिमेच्या साहित्यांची मागणी पाठवलेली नाही त्यांनी त्यांच्या पुढील लिटरेचर रिक्वेस्ट फॉर्मवर (S-AB-14) ती पाठवावी.

उपलब्ध असलेली नवीन प्रकाशने:

बायबलचे प्राथमिक शिक्षण (बाप्तिस्मा घेऊ इच्छिणाऱ्‍यांसाठी आपली सेवा पुस्तकातील प्रश्‍न)—उर्दू

पवित्र शास्त्र चर्चा कशा सुरू कराव्या व त्या कशा चालू ठेवाव्या (युक्‍तिवाद पुस्तकातील पृष्ठे ९-२४)—उर्दू

आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील?—ओरिया, कोंकणी (कन्‍नड लिपी)

◼उपलब्ध नसलेली प्रकाशने:

थोर शिक्षकाचे ऐका—तामीळ, मराठी, मल्याळम

◼मंडळीचा पुस्तक अभ्यास: एप्रिलच्या आमची राज्य सेवा अंकात म्हटल्याप्रमाणे मे ४, १९९८ पासून सर्व मंडळ्या माहितीपत्रकांचा नव्हे, तर आमची राज्य सेवा यात दिलेल्या आराखड्यानुसार ज्ञान पुस्तकाचा अभ्यास करतील.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा