पावसाळी कालावधीत अधिक ईश्वरशासित गोष्टी मिळविणे
१ जे भविष्याची आखणी करतात अशांसाठी ते राखून ठेवलेले असते असे म्हटले जाते. आमच्या वेळेच्या वापराने आम्हाला समाधान झाल्यासारखे वाटायचे आहे तर आम्ही आधीच त्याविषयी योजना आखण्यास हवी. भारतातील बहुतेक भागात पावसाळी ऋतु जुलैपर्यंत येत असतात. तर या काळात आपल्याला अधिक ईश्वरशासित लाभ मिळवता यावे म्हणून कोणत्या योजना आखता येणे शक्य आहे?
२ मार्च ३० रोजी स्मारक दिवशी पुष्कळ नव्या लोकांनी आपली उपस्थिती दाखवली होती. आता त्यांची आध्यात्मिक प्रगति ही बहुतांशी त्यांना जी मदत आम्हाकडून मिळते त्यावर अवलंबून आहे. यांनी प्रांतिय अधिवेशनाला उपस्थित राहावे हा त्यांच्यासाठी आशीर्वादच ठरेल. या अधिवेशनाद्वारे केवढे आध्यात्मिक लाभ मिळतात याविषयी त्यांना माहिती दिली पाहिजे, त्यांच्या प्रवासासंबंधाने आवश्यक ती तयारी व मदत त्यांना करण्यास हवी आणि शक्य आहे तर आम्हासोबत किंवा इतरांसोबत येण्याचे त्यांना निमंत्रणही द्यावे.
३ अधिवेशनाला उपस्थित राहण्यामुळे अनौपचारिक साक्ष देण्याच्या अधिक सुसंध्या मिळत असतात. याच्या अगाऊ तयारीत आधुनिक प्रकाशनांचा पुरेसा साठा सोबत घेण्याचे समाविष्ट असते. आम्ही पेट्रोल पंपावर, हॉटेल व उपहारगृहात काम करणाऱ्या लोकांना तसेच जाहीर वाहनातून प्रवास करणाऱ्या लोकांना साक्ष देऊ शकतो. यामुळे खूप थरारक अनुभव येऊ शकतात.
४ वर्षाच्या समाप्तीला भरविल्या जाणाऱ्या अधिवेशनासाठी बहुतेक युवक आपली रजा जोडतात. अशा सुटीच्या काळात हितकारक करमणूक योग्य असली तरी या मोकळ्या वेळेपैकी काही भाग आम्हाला साक्षीकार्यात अधिक सहभाग देण्यासाठी, म्हणजे साहाय्यक पायनियरींग कार्यासाठी देता येईल का? पालक आपल्या मुलांना योजना आखण्यात मदत करू शकतात. वेगवेगळ्या कुटुंबातील मुलांना यात सहभाग घेता येऊन एक गट या नात्याने मिळून काम करता येईल. ज्यांना यात सहभाग घेता येत नाही अशांना आठवड्याच्या मधल्या साक्षीकार्याला हातभार लावून अधिक काम करता येईल.
५ काही लोक आपल्या प्रापंचिक कामापासून रजा घेतील आणि इतर ठिकाणी प्रवास करतील. अशा जागी सभांना उपस्थित राहण्याच्या योजना आखून तसेच तेथील सेवाकार्यात सहभागी होऊन परस्परामध्ये सुंदर उत्तेजन देता येईल. कदाचित तुम्ही अशा ठिकाणी जात असाल जेथे क्वचितच कार्य करण्यात आले असेल. अशा ठिकाणी तुम्हाला लोकांना राज्याचा संदेश ऐकविता येईल.
६ आता बहुतेक युवक माध्यमिक परिक्षेत उत्तीर्ण झाले आहेत किंवा होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे आपल्या जीवनातील ध्येय काय याविषयी प्रश्न उभा राहतो. जे युवक ईश्वरशासित ध्येयाभोवती आपले भविष्य केंद्रित करतात अशांना निश्चितपणे आशीर्वाद मिळू शकेल. (१ योहान २:१५-१७) नियमित पायनियर सेवा करण्याचा निर्णय घेतला तर त्यामुळे समाधानी जीवनाचा मार्ग मिळतो व खास हक्क देखील मिळतात.
७ अशाप्रकारे, आम्हापैकी पुष्कळांना वेळ असणार. तेव्हा ‘संधी साधून घेण्यासाठी’ आपण सूज्ञतेने हालचाल करू या. (इफिस. ५:१५, १६) यहोवाच्या सेवेत आम्हाला गुंतवून ठेवणाऱ्या योजना आम्हाला तसेच इतरांना चिरकालिक फायदे देतील.—१ तीमथ्य ४:१५, १६.