फोर कलर प्रेस
आम्ही दोन फोर कलर प्रेस बसवणार आहोत व टेहळणी बुरूज आणि सावध राहा! ही नियतकालिके बहुरंगांत छापण्यास सुरवात करणार आहोत अशी आनंदाची बातमी देणाऱ्या आमच्या जुलै २, १९९७ च्या परिपत्रकेस तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल आम्ही तुम्हा सर्वांचे आभार मानू इच्छितो. आता कुठल्याही क्षणी ह्या प्रेस भारतात येण्याची अपेक्षा असून त्यांसाठी आपल्याला भरणा करावा लागेल—प्रत्येक प्रेस प्राप्त करून ते बसविण्याचा खर्च ७० लाख रुपयांच्या घरात जाण्याची अपेक्षा आहे.
आमचे पत्र मिळाल्यानंतर अनेकविध मंडळ्यांनी व वैयक्तिकांनी देखील ह्या प्रेसचा खर्च भागवण्याकरता प्रहरीदुर्ग प्रकाशन संस्थेला उदार देणग्या पाठवल्या. काहीजण अद्यापही त्या देत आहेत आणि त्याबद्दल आम्ही खरोखरच आभारी आहोत. या विशिष्ट प्रकल्पांसाठी अनुदान देण्याची संधी अजूनही उपलब्ध असून तुम्ही त्यास पाठबळ देत राहाल अशी आमची अपेक्षा आहे. ज्या मंडळ्या व व्यक्ती थेट संस्थेलाच अनुदान पाठवू इच्छितात किंवा मग संस्थेकडे बिनव्याजी ठेवी ठेवू इच्छितात, त्यांनी जुलै २, १९९७ च्या आमच्या पत्राची उजळणी करावी व त्यांत दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे.
ह्या फोर कलर प्रिन्टींग प्रेस वापरल्यामुळे, सत्याच्या मनोहर वचनांनी ओतप्रोत भरलेली आमची नियतकालिके, सार्वकालिक जीवनाबद्दल योग्य मनोवृत्ती असलेल्या लोकांना अधिकच आकर्षक वाटून क्षेत्रांत यांचा हितकारक प्रभाव पडेल अशीच आमची प्रार्थना आहे.—नीति. २५:११; उप. १२:१०; प्रे. कृत्ये १३:४८, NW.