नोव्हेंबरसाठी सेवा सभा
नोव्हेंबर ३ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ४८ (२२)
१० मि:स्थानिक घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा. जुलैसाठी असलेल्या देशाच्या व स्थानिक मंडळीच्या क्षेत्र सेवा अहवालावर विवेचन मांडा.
१५ मि:“मोठे व कार्य साधण्याजोगे द्वार उघडले आहे.” वडिलांचे भाषण तसेच श्रोत्यांसोबत चर्चा. ज्यांना शक्य आहे त्या सर्वांना प्रचार कार्यात अधिक सहभाग घेण्याचे प्रोत्साहन द्या. ऑगस्ट १५, १९८८, टेहळणी बुरूज, पृष्ठ २२ वर दिलेल्या काही सल्ल्यांचा समावेश करा.
२० मि:“राज्य वार्तेप्रती दाखवलेल्या आस्थेचा मागोवा घ्या.” प्रश्नोत्तरे. परिच्छेद ६ मधील प्रस्तुतींची प्रात्यक्षिके दाखवा. त्यांतील एकात, बायबल अभ्यास सुरू झाल्याचे दाखवा.
गीत १४४ (४) व समाप्तीची प्रार्थना.
नोव्हेंबर १० ने सुरू होणारा सप्ताह
गीत ५१ (७)
१० मि:स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल. कोणत्या क्षेत्रात राज्य वार्ता क्र. ३५ चे वितरण करणे अद्याप बाकी आहे याची मंडळीला माहिती द्या. या खास मोहिमेच्या शेवटल्या सप्ताहात पुरेपूर सहभाग घेण्यास सर्वांना उत्तेजन द्या.
१५ मि:स्थानिक गरजा.
२० मि:“गैर-साक्षीदार सोबत्यांना साहाय्य करा.” सत्य न मानणाऱ्या सोबत्यांची वैयक्तिक पातळीवर जाऊन अधिक माहिती घेऊ इच्छिणाऱ्या दोन वडिलांमधील चर्चा. एप्रिल १, १९९०, टेहळणी बुरूज, पृष्ठे २३-२४, परिच्छेद ६-९ मधील सुचनाही ते विचारात घेतात. ऑक्टोबर १, १९९५, टेहळणी बुरूज, पृष्ठे १०-११, परिच्छेद ११-१२.
गीत १४८ (६) व समाप्तीची प्रार्थना.
नोव्हेंबर १७ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ५३ (८)
१० मि:स्थानिक घोषणा. राज्य वार्ता क्र. ३५ मोहिमेतील काही स्थानिक अनुभवांचा समावेश करा.
१५ मि:“इंटरनेटवर सुवार्ता.” या लेखाचे स्पष्टीकरण देण्यासाठी ऑगस्ट ८, १९९७ च्या सावध राहा! नियतकालिकातील माहितीचा उपयोग करा. लोकांप्रत सुवार्ता नेण्यासाठी उपलब्ध असलेल्या हरएक योग्य मार्गाचा उपयोग करण्याची आपली इच्छा—हा प्रमुख विचार ठळकपणे मांडा.
२० मि:सुवर्णसंधीचा लाभ घ्या! नोव्हेंबर १५, १९९६, टेहळणी बुरूज, पृष्ठे २१-३.
गीत १५१ (१८) व समाप्तीची प्रार्थना.
नोव्हेंबर २४ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ५६ (१२)
१० मि:स्थानिक घोषणा. “फोर कलर प्रेस” या पेटीची चर्चा करा.
१५ मि:मंडळीच्या पुस्तक अभ्यासात शिष्टाचारी असणे. पुस्तक अभ्यासासाठी आपल्या घराचा उपयोग करू देणाऱ्या कुटुंबांच्या आदरातिथ्याची आपण कदर करतो. यात कदाचित पुष्कळशा तयारी व गैरसोयी अंतर्भूत असतील. तेथे उपस्थित राहताना आपण शिष्टाचार राखणारे असावे व आदर आणि विचारशीलता प्रकट करावी; यामध्ये पुढील गोष्टी समाविष्ट होतात: (१) घरात प्रवेश करण्याआधी आपण आपले पाय नीट पुसावेत आणि वाहणा काढण्याची रीत असल्यास तेही करावे, जेणेकरून फरशी व कारपेट मळणार नाही. (२) पालकांनी आपल्या मुलांवर नजर ठेवावी, तसेच ते सुवर्तनी आहेत व पुस्तक अभ्यासासाठी राखलेल्या स्थानातच ते राहतात हेही त्यांनी निश्चित करावे. (३) गट लहान असला व वातावरणही काहीसे अनौपचारिक असले तरी, ही मंडळीचीच एक सभा असून आपण राज्य सभागृहात जाताना करतो तसाच पेहराव करण्यास हवा. (४) सभेनंतरचे साहचर्य मर्यादित असावे जेणेकरून त्या घरातील सदस्यांना त्यांच्या खाजगी गोष्टींसाठी वेळ असेल. (५) ज्यांच्या घरात अभ्यास संचालित केला जातो ते लोक कधी कधी अभ्यासानंतर अल्पोपहाराची व्यवस्था करत असले तरी सर्वांनीच हे समजून घेतले पाहिजे, की याची आवश्यकता नाही व याची अपेक्षाही केली जाऊ नये.
२० मि:शिष्य बनवा, त्यांना शिकवा. वडील, तीन किंवा चार प्रचारकांच्या गटाशी चर्चा करून आपली सेवा पुस्तक, पृष्ठे ८८-९२ वरील प्रश्नांची उत्तरे देतात: (१) प्रभावकारी सेवेसाठी पुनर्भेटी करणे आवश्यक का आहे? एखादी व्यक्ती, पुनर्भेटीच्या कार्याच्या आव्हानावर मात कशी करू शकते? (२) बायबल अभ्यास सुरू करण्यावर आपला इतका जोर का असतो? अभ्यास संचालित करण्यात आपण प्रवीण कसे होऊ शकतो? (३) विद्यार्थ्यांना देवाच्या संघटनेकडे निर्देशित करणे महत्त्वाचे का आहे? आपण हे कसे करू शकतो? प्रचारकांचा हा गट हे देखील कथित करतात, की जून १९९६ आणि मार्च व एप्रिल १९९७ च्या आमची राज्य सेवा पुरवणीने या क्षेत्रांत त्यांना कशी मदत केली आहे.
गीत १६० (९) व समाप्तीची प्रार्थना.