गैर-साक्षीदार सोबत्यांना साहाय्य करा
१ वैवाहिक दांपत्ये सत्य उपासनेत संयुक्त असतात हे मोठ्या हर्षाचे कारण आहे. तथापि, अनेकानेक कुटुंबांत केवळ एकाच वैवाहिक सोबत्याने सत्याचा मार्ग स्वीकारलेला असतो. अशा गैर-साक्षीदार सोबत्यांना साहाय्य करून त्यांना, आपल्यासह यहोवाची उपासना करण्याचे उत्तेजन आपण कसे देऊ शकतो बरे?—१ तीम. २:१-४.
२ त्यांचे विचार समजून घ्या: काही गैर-साक्षीदार सोबती विरोध करणारे असले तरी पुष्कळ वेळेस, एकतर उदासिनता किंवा मग गैरसमज ही कदाचित त्यामागील मूळ समस्या असू शकते. कदाचित, आपल्याकडे दुर्लक्ष केले जाते असे एखाद्या व्यक्तीला वाटेल, किंवा त्याला अथवा तिला नव्यानेच प्राप्त झालेल्या आध्यात्मिक आस्थांचा त्या व्यक्तीला हेवा वाटेल. एक पती आठवून सांगतो, “घरातला एकाकीपणा मला अक्षरशः खायला यायचा, मला जणू वाळीत टाकल्यासारखं वाटायचं.” दुसरा एक म्हणतो: “मला असं वाटलं जणू माझी बायकोमुलं मला वाऱ्यावर सोडत आहेत.” काही पुरुषांना कदाचित असे वाटेल की धर्म त्यांच्या कुटुंबाला त्यांच्यापासून दूर नेत आहे. (पाहा ऑगस्ट १५, १९९०, टेहळणी बुरूज, [इंग्रजी] पृष्ठे २०-३.) म्हणूनच, गृह बायबल अभ्यासाच्या व्यवस्थेत, शक्यतो सुरवातीपासूनच पत्नीसह पतीलाही सामील करणे सर्वात श्रेयस्कर आहे.
३ एकजुटीने कार्य करा: एका साक्षीदार दांपत्याने, विवाहितांना सत्यात मदत करण्यासाठी प्रभावकारीरित्या एकजुटीने कार्य केले. भगिनीने पत्नीसोबत अभ्यास प्रस्थापित केल्यानंतर, बांधव मग पतीची भेट घेत असे. पतीसोबत अभ्यास सुरू करण्यात तो सहसा यशस्वी होत असे.
४ मैत्रिपूर्ण व आतिथ्यशील असा: सत्य उपासनेत अद्याप संयुक्त न झालेल्या कुटुंबांविषयी आस्था दाखवून, मंडळीतील कुटुंबे मदत करू शकतात. काही मैत्रिपूर्ण भेटी देखील, गैर-साक्षीदार सोबत्याला हे पाहण्यास मदत करतील, की यहोवाचे साक्षीदार स्नेहपूर्ण व विचारशील ख्रिश्चन असून त्यांच्या हृदयात प्रत्येकाविषयी कल्याणकारकच विचार आहेत.
५ गैर-साक्षीदार सोबत्यांना साहाय्य करण्याकरता अलीकडेच केलेल्या प्रयत्नांचे वडीलजन कदाचित वेळोवेळी परीक्षण करू शकतात तसेच, त्यांना यहोवाकडे आकृष्ट करण्यासाठी आणखीन काय केले जाऊ शकते हे देखील ते निश्चित करू शकतात.—१ पेत्र ३:१, NW तळटीप.