“सर्व लोक कधी एकमेकांवर प्रीती करतील का?”
१ एक अत्युत्कृष्ट, स्फूर्तिदायक व हृदय हर्षविणारा संदेश १६९ भाषांत विश्वभर उद्घोषित केला जाणार आहे. हा कोणता संदेश आहे बरे? व तो कसा पोहंचवला जाईल?
२ तो शेजाऱ्याबद्दलच्या प्रीतीचा संदेश आहे. हा संदेश, “सर्व लोक कधी एकमेकांवर प्रीती करतील का?” असे शीर्षक असलेली राज्य वार्ता क्र. ३५ यात आढळतो. ही राज्य वार्ता, विश्वभराच्या सद्यःस्थितीचे थोडक्यात परीक्षण करते व हे दाखवून देते, की लोकांमधील प्रेमाची उणीवच, नितान्त दुःखाचे व शोकाचे मूळ कारण होय. विशेषकरून आपल्या काळात, शेजाऱ्याबद्दलचे प्रेम का थंडावले आहे व भवितव्यासाठी त्याचा काय अर्थ होतो याचेही ते स्पष्टीकरण देते.
३ या व्यतिरिक्त, राज्य वार्ता क्र. ३५ दाखवून देते, की विद्यमान जगात राहणाऱ्या लक्षावधी लोकांमध्ये, अद्यापही शेजाऱ्याबद्दलचे खरे प्रेम जिवंत आहे. मूळ ख्रिस्ती विश्वासाचे—येशू ख्रिस्ताने शिकवलेल्या शेजाऱ्याबद्दलच्या प्रीतीने चिन्हित केलेल्या पहिल्या शतकातील उपासनेचे पुनर्जीवन करण्यात सहभागी असलेल्यांची ओळख देखील ती पटवून देते.—लूक १०:२५-३७.
४ लवकरच, ख्रिस्ताद्वारे प्रशासित केल्या जाणाऱ्या देवाच्या राज्याधीन संबंध मानवी जग कशाप्रकारे शेजाऱ्याबद्दलचे प्रेम व्यवहारात आणील, याच्या स्पष्टीकरणाने राज्य वार्ता क्र. ३५ चा समारोप होतो. हा संदेश वाचणाऱ्यांना, देव आपल्याकडून काय अपेक्षितो हे माहितीपत्रक प्राप्त करण्याचे तसेच देवाच्या वचनात तपशीलवारपणे वर्णन केलेल्या या जगव्याप्त प्रेमळ व्यवस्थेचा भाग कसे बनावे हे शिकण्याचे प्रोत्साहन देण्यात येते.
५ हा संदेश कोण पोहंचवेल? जगभरातील यहोवाचे साक्षीदार, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांदरम्यान शेजाऱ्याबद्दलच्या प्रेमाचा हा संदेश त्यांचे परिचित, शेजारी व नातेवाईक यांच्याप्रत पोहंचवतील. पात्र असलेल्या सर्वांना असे प्रोत्साहन देण्यात येते, की राज्य वार्ता क्र. ३५ च्या जाहीर वितरणात त्यांनी सहभागी व्हावे.
६ या मोहिमेचे अंतिम ध्येय, अपेक्षा माहितीपत्रकातून अथवा ज्ञान पुस्तकातून बायबल अभ्यास करण्यासाठी लोकांची आस्था उद्दीपित करणे हे आहे. याशिवाय, यहोवाच्या प्रत्येक सेवकाच्या मनःपूर्वक प्रयासांमुळे प्रीतीचा देव यहोवा आणि त्याचा पुत्र, येशू ख्रिस्त यांच्याबद्दल एक महान साक्ष दिली जाईल.