उदासीनतेप्रती तुमची काय प्रतिक्रिया आहे?
१ उदासीनता म्हणजे कळवळा किंवा भावना यांचा अभाव, आस्था किंवा चिंता यांची उणीव. आपण सेवेत अनुभवत असलेल्या अधिक सामान्य व कणखर प्रवृत्तींपैकीच ही एक प्रवृत्ती आहे. तिच्याप्रती तुमची काय प्रतिक्रिया आहे? तिच्यामुळे तुम्ही तुमच्या सेवेत मंद झाला आहात का? राज्य संदेश लोकांप्रत पोहंचवण्याकरता तुम्ही तिच्यावर कशी मात करू शकता बरे?
२ तुमच्या क्षेत्रातील लोक उदास का आहेत हे प्रथम निश्चित करा. राजकीय व धार्मिक पुढाऱ्यांनी त्यांची निराशा केली आहे म्हणून ते उदास आहेत का? ते तोंड देत असलेल्या समस्यांवर कोणताही उपाय नाही असे त्यांना वाटते का? एका उज्ज्वल भवितव्याच्या अभिवचनांबद्दल ते साशंक आहेत का? तात्कालिक स्पष्ट लाभ दिसल्याशिवाय आध्यात्मिक बाबींचा विचार करण्यास ते अनिच्छित आहेत का?
३ राज्य आशा स्पष्ट करा: अशी कोणतीही समस्या नाही, जी देवाचे राज्य सोडवू शकत नाही. तर मग, आपल्याला शक्य असते तेव्हा आपण राज्याच्या अभिवचनांविषयी बोलावे आणि एखादे बायबल वचन दाखवणे शक्य अथवा व्यवहार्य नसले तरी मुख्य शास्त्रवचनीय विधानांचा उल्लेख करावा. (इब्री. ४:१२) तथापि, आपल्याला आपले संभाषण मुद्द्यावर कसे आणता येईल बरे?
४ आपण भेट का घेतो या मागील उद्देश लोकांना समजला पाहिजे. त्यांना याची जाणीव होण्यास हवी, की शेजाऱ्यांबद्दल प्रेम असल्यामुळे व समाजाविषयी चिंता असल्यामुळेच आपण तसे करत असतो. आपण आधीच विचार केलेला एखादा प्रश्न विचारू शकतो जसे की, “तुम्हाला काय वाटतं, [समाजावर विपरीत परिणाम पाडणारी एखाद्यी समस्या] यावर कोणता उपाय आहे बरं?” एका प्रस्तावामुळे जर यश आले नाही तर दुसऱ्याचा प्रयोग करा.
५ राज्य संदेशासंबंधी उदास मनोवृत्ती असलेल्या एका संपन्न क्षेत्रात राहणाऱ्या घरमालकांची आस्था चेतवू शकेल अशी एखादी प्रस्तावना शोधण्याचा प्रचारकांनी प्रयत्न केला. ज्ञान पुस्तक सादर करताना, एका दांपत्याने पुढील प्रस्तावनेचा उपयोग केला: “आज जगात यशस्वी व्हायचं असेल तर उत्तम शिक्षण आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं का? एका बहुव्यापक शिक्षणात, बायबलचं ज्ञान देखील समाविष्ट असेल याच्याशी तुम्ही सहमत आहात का?” एकाच दुपारी, त्यांनी तीन पुस्तकांचे वाटप केले; यांपैकी एक स्त्री नंतर म्हणाली, की तिने संबंध ज्ञान पुस्तक वाचले होते व बायबल अभ्यास करण्यास ती राजी झाली होती.
६ तुम्ही उदासीनतेचा सामना करता तेव्हा निरनिराळ्या प्रस्तावांचा वापर करून पाहा, विचारप्रवर्तक प्रश्न विचारा तसेच देवाच्या वचनातील सामर्थ्याचाही उपयोग करा. असे केल्याने, राज्याविषयीची आपली अद्भुत आशा स्वीकारण्यास तुम्ही कदाचित इतरांना मदत करू शकाल.