राज्य सभागृह निधी
आमची राज्य सेवा जानेवारी १९९७ मधील “आपल्या देवाच्या भवनाकडे आपले दुर्लक्ष होता कामा नये” या पुरवणीला तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही तुमचे आभार मानू इच्छितो. “राज्य सभागृहाच्या बांधकामासाठी योगदान देण्यास तुमचे हृदय तुम्हाला प्रेरणा देते का?” ही पुरवणीच्या सहाव्या पानावर असलेली पेटी वाचल्यावर असे दिसते की, अनेकांची हृदये योगदान देण्यास प्रवृत्त झाली; कारण राष्ट्रीय राज्य सभागृह निधीच्या देणग्यांमध्ये अचानक वाढ आम्हाला दिसून आली. ज्या मंडळ्यांचा राज्य सभागृह प्रकल्प चालू आहे अशा मंडळ्यांना साहाय्य द्यायला हा पैसा कामी लावला जाईल याची कृपया खात्री बाळगा. या निधीला तुमचे सतत साहाय्य लाभेल अशी आम्ही आशा करतो.
त्याचवेळी, सर्वच देणग्या राष्ट्रीय राज्य सभागृह निधीसाठी उपयोगात आणल्या जाणार नाहीत असे म्हटले जाऊ शकते. संस्था, राज्य प्रचाराच्या कार्याला लागणाऱ्या मूलभूत व्यवस्थेच्या इतर पैलूंसाठी जसे की, खास पायनियरांना आधार देणे, प्रवासी पर्यवेक्षकांना पाठवणे आणि प्रांतीय अधिवेशनांची व्यवस्था यांसाठी भरमसाट साधनसंपत्ती खर्ची घालते. म्हणून, व्यक्तींकडील, मंडळ्यांकडील आणि विभागांकडील साध्या देणग्यांचाही स्वीकार केला जाईल. यांवर फक्त “जागतिक प्रचार कार्यासाठी” असे सूचित करावे जेणेकरून संस्था कोणत्याही कार्यांसाठी या निधींचा उपयोग करील.
यहोवाचे सेवक, त्याच्या उद्देशाची पूर्ती करण्यासाठी उदार मनाने आपला वेळ, शक्ती, आणि निधी सादर करत राहतील हे आम्हाला ठाऊक आहे. त्याच्या बदल्यात, यहोवा त्यांना उदारपणे प्रतिफळ देईल.—मला. ३:१०.