वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/९७ पृ. ७
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—१९९७
आमची राज्य सेवा—१९९७
km ५/९७ पृ. ७

घोषणा

◼ साहित्य सादरता

मे: टेहळणी बुरूज किंवा सावध राहा! यांच्या वर्गण्या. पाक्षिक आवृत्तींची एका वर्षाची वर्गणी ९०.०० रुपये आहे. मासिक आवृत्तींची एका वर्षाची वर्गणी आणि पाक्षिक आवृत्तींची सहा महिन्यांची वर्गणी ४५.०० रुपये आहे. मासिक आवृत्तींसाठी सहा महिन्यांची वर्गणी नाही. वर्गणी नाकारण्यात आल्यास नियतकालिकांच्या किरकोळ प्रती प्रत्येकी ४.०० रुपयांच्या अनुदानात सादर केल्या जाव्यात. जेथे उचित असेल तेथे देव आपल्याकडून काय अपेक्षितो? हे माहितीपत्रक ६.०० रुपयांच्या अनुदानात सादर केले जाऊ शकते.

वर्गण्या प्राप्त करताना आठवणीत ठेवा की, टेहळणी बुरूज आता सर्व भारतीय भाषांत तसेच नेपाळी भाषेत, दर पंधरवड्याला प्रकाशित होते, याला अपवाद केवळ पंजाबी व उर्दू भाषा आहेत (ज्यांत ते दर महिन्याला प्रकाशित होते).

सावध राहा! हे मल्याळम व तमीळ या भाषांत पाक्षिक आहे पण कन्‍नड, गुजराती, तेलगू, नेपाळी, मराठी व हिंदी या भाषांत ते मासिक आहे. उर्दू, पंजाबी व बंगाली या भाषांत सावध राहा! याच्या त्रैमासिक वितरकांच्या प्रती मंडळ्यांसाठी उपलब्ध आहेत, पण या तीन भाषांत वर्गण्या उपलब्ध नाहीत.

जून: सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान हे पुस्तक २०.०० रुपयांच्या अनुदानात. गृह बायबल अभ्यास सुरू करण्याचा जास्तीतजास्त प्रयत्न करा.

जुलै आणि ऑगस्ट: पुढील ३२ पृष्ठांची कोणतीही माहितीपत्रके ६.०० रुपयांच्या अनुदानात सादर केली जाऊ शकतात: आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील?, जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल?, तुम्ही त्रैक्य मानावे का?, तुमची प्रिय व्यक्‍ती मरते तेव्हा (इंग्रजी), देव आपल्याकडून काय अपेक्षितो, देव खरोखर आपली काळजी करतो का?, नंदनवन आणविणारे सरकार, “पहा! मी सर्व नवे करतो,” भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा!, आणि सर्वकाळ टिकणारे ईश्‍वरी नाम (इंग्रजी).

◼ उपलब्ध असलेली नवीन प्रकाशने:

पवित्र शास्त्राचे प्राथमिक शिक्षण —हिंदी

आपली सेवा पूर्ण करण्यासाठी संघटित —मराठी

◼ उपलब्ध असलेले नवीन ऑडिओ कॅसेट्‌स:

राज्य गीतांचे गायन करणे —इंग्रजी

हे ७६ मिनिटांचे ध्वनिमुद्रण, ऑर्केस्ट्राच्या चालीवर गाण्यात आलेली अनेक गीते आहेत. काही गीते अनुभवी बांधवांनी ऑर्केस्ट्राच्या चालीवर एकेकट्याने गायिलेली आहेत, इतर गीते, अमेरिकेच्या बेथेल कुटुंब सदस्यांच्या गायनमंडळाने गायिलेली आहेत आणि एक गीत बेथेलमधील भगिनींच्या एका गटाने गायिलेले आहे. आपली राज्य गीते कशी गावीत यासाठी हा एक आदर्शनमूना असेल आणि आनंदमय व उभारणीकारक श्रवणास शिवाय शब्द ऐकून त्यांवर मनन करण्यास आणि कदाचित त्यांचे स्मरण करण्यासाठी श्रोत्यांना एक सुसंधी पुरवील. प्रत्येक कॅसेट पायनियरांकरता ५५.०० रुपयांना तर प्रचारक आणि जनतेसाठी ६५.०० रुपयांना आहे.

◼ उपलब्ध असलेले नवीन व्हिडिओ कॅसेट्‌स:

पृथ्वीच्या दिगंतांपर्यंत —इंग्रजी

वॉचटावर बायबल गिलियड प्रशाला याचा ५० वा वर्धापन दिन चिन्हांकित करण्यासाठी प्रसिद्ध केलेला हा ४२ मिनिटांचा व्हिडिओ, गिलियडच्या पहिल्या सदस्यांची बघणाऱ्‍यांना ओळख करून देतो, ९५ व्या वर्गाचे दृश्‍य दाखवतो, मिशनरी जीवन कसे असते याची एक कल्पना देऊन जातो आणि प्रशालेच्या साध्यतांवर, शिवाय विश्‍वव्यापी प्रचार कार्यावर पडलेल्या त्याच्या प्रभावावर चर्चा करतो. प्रत्येक कॅसेट पायनियरांकरता १५०.०० रुपयांना तर प्रचारक व जनतेकरता २००.०० रुपयांना आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा