ते का करतात?
१ ख्रिस्ताविषयी असे भाकीत केले होते की, ‘देवाच्या मंदिराविषयीचा आवेश त्याला ग्रासून टाकील.’ (स्तोत्र ६९:९) यहोवाच्या खऱ्या उपासनेविषयीच्या आवेशाने येशूला सेवेस प्रथमस्थानी ठेवण्यास प्रवृत्त केले. (लूक ४:४३; योहा. १८:३७) सत्याविषयी साक्ष देण्याचा हाच आवेश आज यहोवाच्या साक्षीदारांच्या सेवेत प्रतिबिंबित होतो. मागील सेवा वर्षात, सबंध जगभरात सरासरी ६,४५,५०९ जणांनी प्रत्येक महिन्यात पायनियर सेवेच्या कोणत्या ना कोणत्या प्रकारात भाग घेतला होता. आपल्या समर्पणाच्या एकवाक्यतेत, सहायक अथवा नियमित पायनियर या नात्याने सेवा करण्यासाठी आपण आपल्या परिस्थितींमध्ये काही तडजोड करू शकतो का याचा प्रत्येकाने प्रार्थनापूर्वक विचार करायला हवा.—स्तोत्र ११०:३; उप. १२:१; रोम. १२:१.
२ आपण स्वार्थी भौतिकवादाच्या व्यवस्थीकरणात जगत असल्यामुळे ज्यात कोणताही आर्थिक लाभ नाही व प्रतिष्ठा नाही अशा सेवेत कोणी का सहभागी व्हावे हे समजण्यास जगातील अनेकांना जड जाते. परंतु, पायनियर ते का करत आहेत? आपण एका प्राणरक्षक कार्यात गोवले असल्याचे त्यांना माहीत आहे. यहोवासाठी तसेच आपल्या सहमानवांसाठी असणाऱ्या प्रीतीने प्रवृत्त झाल्यामुळे, जीव वाचवण्यासाठी मदत करणे हे आपले निश्चयी, व्यक्तिगत कर्तव्य असल्याची त्यांना जाणीव होते. (रोम. १:१४-१६; १ तीम. २:४; ४:१६) एका पायनियर दांपत्याने याचे यथोचितपणे अशाप्रकारे समीकरण केले: “आपण पायनियरींग का करत आहोत बरं? जर केले नाही तर, आपण का केले नाही याची यहोवासमोर आपण कधी कारणीमिमांसा करू शकू का?”
३ पायनियरींग सुरू करण्याच्या आपल्या निर्णयाबद्दल एका बहिणीने लिहिले: “मी आणि माझ्या पतीनं एकाच पगारावर भागवण्याचं ठरवलं, याचा अर्थ अनावश्यक गोष्टींचा त्याग करणं. तरीसुद्धा, यहोवानं समृद्धपणे आम्हाला आशीर्वादित केलं, दारिद्रय अथवा दुसरी कोणतीही उणीव भासू दिली नाही. . . . मला जगण्याचं खरं कारण गवसलं आहे—सत्य देव, यहोवा हा त्याचा शोध करणाऱ्या लोकांपासून फार दूर नाही हे जाणून घेण्यास गरजू लोकांना मदत करणं.” काळाची निकड लक्षात घेऊन पायनियर, कायम टिकणारा आध्यात्मिक खजिना मिळवण्याकरता मनापासून झटत असता जीवनातील आवश्यक गोष्टींमध्ये तृप्त आहेत.—१ तीम. ६:८, १८, १९.
४ तुमच्या व्यक्तिगत परिस्थिती तुम्हाला अनुमती देत असल्यास, पायनियरींग करत असलेल्या जगभरातील तुमच्या लाखो बंधूभगिनींबरोबर तुम्ही सहभागी का होऊ नये बरे? तसे केल्याने तुम्हीही त्यांच्यासारखाच आनंद अनुभवू शकाल.