मार्चसाठी सेवा सभा
मार्च ३ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ५३ (८)
१० मि:स्थानिक घोषणा. आमची राज्य सेवा यातील साहित्य सादरता आणि निवडक घोषणा विचारात घ्या. मार्च २३ रोजी होणाऱ्या स्मारकविधीसाठी सर्व आस्थेवाईकांना निमंत्रण देण्यास सुरवात करा. स्मारकविधीच्या निमंत्रणाची एक प्रत दाखवा आणि सर्वांना याचा साठा प्राप्त करून या आठवडी त्याचे वितरण करण्यास सुरवात करण्याचा आर्जव करा.
१५ मि:‘तुमचे कुटुंब उभारा.’ प्रश्नोत्तरे. १९९५ वार्षिक पुस्तक यातील पृष्ठ २२८ वर दिलेल्या अनुभवांचा समावेश करा.
२० मि:“चिरकालिक भवितव्य संपादन करण्यासाठी कुटुंबाना मदत करणे.” (परिच्छेद १-५) परिच्छेद १ वर संक्षिप्त विवेचने मांडा आणि मग कौटुंबिक सौख्यानंद या पुस्तकातील अध्यायांची शीर्षके, रंगीत चित्रे आणि उजळणी पेट्या यांचा उपयोग करून सदर पुस्तकाविषयी आस्था कशी विकसित केली जाऊ शकते याची चर्चा करा. कार्यक्षम प्रचारकांकडून परिच्छेद २-५ यांत दिलेल्या प्रस्तुतींची प्रात्यक्षिके करून घ्या. आधी आस्था दाखवलेल्या कुटुंबांना ह्या पुस्तकांचा वाटप करण्यास खास प्रयत्न करण्याचे सर्वांना उत्तेजन द्या.
गीत ७१ (१७) व समाप्तीची प्रार्थना.
मार्च १० ने सुरू होणारा सप्ताह
गीत ५६ (१२)
१० मि:स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल.
दररोज शास्त्रवचनांचे परीक्षण करणे यात मार्च १८-२३ साठी नेमून दिलेले स्मारकविधीचे बायबल वाचन आवर्जून करण्याचे सर्वांना स्मरण द्या.
२० मि:“कृतज्ञ असा.” प्रश्नोत्तरे. बायबल विद्यार्थ्यांना, आस्थेवाईक व्यक्तींना, अनुकूल प्रतिसाद दाखवणाऱ्या कौटुंबिक सदस्यांना आणि मंडळीशी सक्रियपणे सहवास न राखणाऱ्या इतर कोणत्याही बंधूभगिनींना स्मारकविधीस उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यास सर्वांनी प्रयास करावा. स्मारकविधी निमंत्रणाचा उपयोग करून आस्थेवाईक व्यक्तीला स्मारकविधीस आमंत्रित करतो हे दाखवणारे प्रचारकाचे एक संक्षिप्त प्रात्यक्षिक. जुलै १, १९८८, टेहळणी बुरूज (इंग्रजी), पृष्ठ ११, परिच्छेद १६-१७ यांवर अतिरिक्त विवेचने मांडा. एप्रिल आणि मे महिन्यांत जे कोणी सहायक पायनियरींग करू शकतील अशा सर्वांना उत्तेजन द्या.
१५ मि:“चिरकालिक भवितव्य संपादन करण्यासाठी कुटुंबांना मदत करणे.” (परिच्छेद ६-८) कार्यस्थळी, शाळेत, बागेत अथवा सार्वजनिक परिवहनामध्ये अनौपचारिक साक्षकार्य करत असताना तसेच नातेवाईकांना भेटी देताना कौटुंबिक सौख्यानंद हे पुस्तक कसे सादर करावे यावर काही सूचना द्या. एखाद्या कार्यक्षम प्रचारकाकरवी परिच्छेद ६ आणि ७ यांत दिलेल्या प्रस्तुतींचे प्रात्यक्षिक करून घ्या. पुनर्भेटीत केलेल्या चर्चेने त्या व्यक्तीला हे जाणण्यास मदत व्हावी, की बायबल अभ्यासामुळे कौटुंबिक बंधने मजबूत होऊ शकतात. ज्ञान पुस्तकातून नंतर अभ्यास करण्याच्या उद्देशाने देव आपल्याकडून काय अपेक्षितो? या माहितीपत्रकातून प्रथम अभ्यास संचालित करावेत अथवा थेट ज्ञान पुस्तकातूनच अभ्यास संचालित करावा.
गीत ७२ (३) व समाप्तीची प्रार्थना.
मार्च १७ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ६३ (२५)
१५ मि:स्थानिक घोषणा. “स्मारकविधीच्या स्मरणिका” यांची उजळणी करा व स्मारकविधीच्या स्थानिक व्यवस्थांची रुपरेषा सांगा. बायबल विद्यार्थ्यांना व आस्थेवाईकांना उपस्थित राहण्यास मदत करण्यासाठी सर्वांनी आटोकाट प्रयत्न करावेत.
१५ मि:स्थानिक गरजा. अथवा सप्टेंबर १५, १९९६ टेहळणी बुरूज पृष्ठे २२-४ वरील “तुम्हाला दिलगिरी व्यक्त करण्याची खरोखरच आवश्यकता आहे का?” यावर वडिलांचे भाषण.
१५ मि: यहोवाच्या साक्षीदारांचे १९९७ वार्षिक पुस्तक याचा चांगला उपयोग करा. पिता आपल्या कुटुंबासह पृष्ठे ३-९ वर दिलेल्या ठळक मुद्द्यांची उजळणी करतो. जगभरातील ईश्वरशासित प्रगती पाहून आपल्याला आनंद का होतो हे तो दाखवून देतो. पिता याचे स्पष्टीकरण देतो, की कशाप्रकारे येत्या वर्षादरम्यान, दररोज जेवणाच्या वेळी प्रगतिशीलपणे वार्षिक पुस्तकाचे तसेच दैनंदिन वचनाचे वाचन करण्यासाठी ते काही मिनिटे खर्च करू शकतील.
गीत ७५ (२२) व समाप्तीची प्रार्थना.
मार्च २४ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ६७ (२६)
९ मि:स्थानिक घोषणा. एप्रिलमध्ये सहायक पायनियरींग करण्यासाठी अर्ज देण्यास अद्यापही खूप उशीर झालेला नाही असे सांगून अर्ज भरण्याचे सर्वांना उत्तेजन द्या. त्या महिन्यादरम्यान सेवेकरता सभांच्या स्थानिकरित्या केल्या जात असलेल्या अतिरिक्त व्यवस्थांची रुपरेषा सांगा.
२४ मि:“पुनर्भेटी करण्यास धैर्य एकवटा.” (परिच्छेद १-२०) प्रश्नोत्तरे. परिच्छेद १६ वर एक संक्षिप्त प्रात्यक्षिक दाखवा.
१२ मि:नवीन प्रचारकाला प्रचार सुरू करण्यास मदत देणे. जून १९९६ ची आमची राज्य सेवा यातील परिच्छेद १९ ची उजळणी करा. वडिलांकडून बाप्तिस्मारहीत प्रचारक बनण्याची अनुमती मिळालेल्या एखाद्या बायबल विद्यार्थ्यास एक कार्यक्षम प्रचारक कशी मदत करतो याचे प्रात्यक्षिक दाखवा. आपली सेवा (इंग्रजी) पुस्तक, पृष्ठ १११, परिच्छेद २ ची ते एकत्र उजळणी करतात. घरोघरचे साक्षकार्य करत असताना बहुधा काय अनुभवण्यास मिळेल, तसेच अनेकांनी अनुकूल प्रतिसाद दिला नसला तरी निरुत्साहित होण्याची काहीच गरज नाही हे अनुभवी प्रचारक दाखवून देतो. आपले ऐकेल अशी एखादी प्रामाणिक व्यक्ती भेटल्यास किती आनंद होतो हे दाखवण्यासाठी प्रचारक एक उत्तेजनपर अनुभव कथित करतो. एकत्र मिळून ते एक संक्षिप्त, सोपी नियतकालिक प्रस्तुती तयार करून तिचा सराव करतात. उत्तेजनात्मक प्रशंसा केली जाते आणि या सप्ताहात क्षेत्र सेवेत एकत्र सहभाग घेण्यास निश्चित व्यवस्था केल्या जातात.
गीत ८९ (९) व समाप्तीची प्रार्थना.
मार्च ३१ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ७० (४)
१५ मि:स्थानिक घोषणा. एप्रिल ६ रोजी होणाऱ्या खास जाहीर भाषणासाठी सर्व आस्थेवाईकांना आमंत्रित करा. मार्च महिन्याचा क्षेत्र सेवा अहवाल देण्याचे सर्वांना स्मरण द्या. एप्रिलमध्ये सहायक पायनियरींग करणाऱ्यांची नावे घोषित करा. प्रश्न पेटीची उजळणी करा.
२० मि:“पुनर्भेटी करण्यास धैर्य एकवटा.” (परिच्छेद २१-३५) प्रश्नोत्तरे. पृष्ठ ३ वर दिलेल्या पेटीची उजळणी करा. प्रत्येक महिन्यात क्षेत्र सेवेचा आपला अहवाल देत असताना, महिन्याभरात केलेली प्रत्येक पुनर्भेट गणण्याचे सर्वांना उत्तेजन द्या.
१० मि:एप्रिलच्या साहित्य सादरतेची उजळणी करा. टेहळणी बुरूज आणि सावध राहा! यांच्या वर्गण्या सादर करा. ऑक्टोबर १९९६ ची आमची राज्य सेवा यातील पृष्ठ ८ वरील परिच्छेद ३, ४, आणि ८ मध्ये दिलेल्या प्रस्तुती कशा तयार कराव्यात यावर संक्षिप्त सूचना द्या. दोन प्रचारकांकडून एखाददोन प्रस्तुतींचे प्रात्यक्षिक करून घ्या. वर्गणी नाकारल्यास नियतकालिकांच्या दोन अथवा अधिक प्रती सादर केल्या जाऊ शकतात. जे वर्गणी स्वीकारत नाहीत पण नियतकालिके स्वीकारतात अशांची प्रचारकांनी नोंद ठेवावी व आपल्या नियतकालिक मार्गात त्यांचा समावेश करावा.
गीत ९२ (७) व समाप्तीची प्रार्थना.