स्मारक—अतिमहत्त्वपूर्ण घटना!
१ मार्च २३ रविवारी सूर्यास्तानंतर आपण ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारक विधी साजरा करणार आहोत. (लूक २२:१९) ती खरोखरीच अतिमहत्त्वपूर्ण घटना आहे! येशूने आपल्या मृत्यूपर्यंत यहोवाशी एकनिष्ठ राहून हे सिद्ध करून दाखवले, की तीव्र तणावातही एक मनुष्य पूर्णपणे ईश्वरी भक्तीत टिकून राहू शकतो व अशाप्रकारे यहोवाच्या सार्वभौमत्वाच्या योग्यतेला उंचावू शकतो. (इब्री. ५:८) शिवाय, मानवजातीची खंडणी देण्याकरता ख्रिस्ताच्या मृत्यूने आवश्यक असलेले परिपूर्ण मानवी बलिदान दिले ज्यामुळे जे कोणी विश्वास प्रकट करतील त्यांना सार्वकालिक जीवन मिळणे शक्य झाले. (योहा. ३:१६) स्मारक विधीला उपस्थित राहण्याद्वारे आपण यहोवाने दाखवलेल्या प्रीतीबद्दल तसेच येशूने आपल्यासाठी दिलेल्या बलिदानाबद्दल आपली मनःपूर्वक गुणग्राहकता प्रदर्शित करू शकतो.
२ यहोवाच्या साक्षीदारांची १९९७ दिनदर्शिका यावर नोंद केल्याप्रमाणे, मार्च १८-२३ या दिवसांसाठी आयोजित केलेले बायबल वाचन करण्यास सर्वांना उत्तेजन दिले जाते. तसेच, सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य पुस्तकाच्या ११२-१६ अध्यायांची कौटुंबिक चर्चा सुद्धा आपल्याला मानवी इतिहासातील सर्वात महत्त्वपूर्ण आठवड्यावर आपले लक्ष केंद्रित करण्यास मदत करील.
३ स्मारक हंगामादरम्यान क्षेत्र सेवेत तुम्ही जो वेळ खर्च करणार आहात त्यात वाढ करू शकाल का? अनेक प्रचारक सहायक पायनियर या नात्याने कार्य करण्यासाठी मार्चमधील पाच सप्ताहांतांचा पुरेपूर फायदा घेतील. त्यांच्यापैकी एक होण्यास काही हरकत आहे का? स्मारकाला उपस्थित राहण्याच्या महत्त्वावर जोर देण्यासाठी आपण सर्वजण पूर्ण भाग घेऊ शकतो. स्मारक रविवारच्या दिवशी असल्यामुळे पुष्कळांना उपस्थित राहता येईल. सर्व बायबल विद्यार्थ्यांना व इतर आस्थेवाईक लोकांना आपल्यासोबत उपस्थित राहण्याचे आमंत्रण देण्यास विसरू नका. वर्षातील खासपणे साजरा करावयाच्या त्या एका दिवसाविषयी ज्ञान पुस्तकाच्या पृष्ठ १२७ वरील १८ परिच्छेदात काय म्हटले आहे ते त्यांना सांगा.
४ येशूच्या मृत्यूचा आपल्यासाठी जो काही अर्थ होतो त्याबद्दल सखोल कृतज्ञता बाळगून १९९७ च्या महान घटनेचे आपण स्वागत करू या. मार्च २३ च्या सायंकाळी, खरे ख्रिस्ती सर्वत्र विश्वासूपणे स्मारकविधी साजरा करतील तेव्हा त्यांच्यासोबत उपस्थित असा.