वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km २/९७ पृ. २
  • फेब्रुवारीसाठी सेवा सभा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • फेब्रुवारीसाठी सेवा सभा
  • आमची राज्य सेवा—१९९७
  • उपशिर्षक
  • फेब्रुवारी ३ ने सुरू होणारा सप्ताह
  • फेब्रुवारी १० ने सुरू होणारा सप्ताह
  • फेब्रुवारी १७ ने सुरू होणारा सप्ताह
  • फेब्रुवारी २४ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—१९९७
km २/९७ पृ. २

फेब्रुवारीसाठी सेवा सभा

फेब्रुवारी ३ ने सुरू होणारा सप्ताह

गीत २७ (७)

१० मि: स्थानिक घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा. श्रोत्यांसोबत “खास संमेलन दिवसाचा नवीन कार्यक्रम” याची चर्चा करा.

१५ मि: “पुनरावृत्ती न होणाऱ्‍या कार्यात भाग घेणे.” प्रश्‍नोत्तरे. वेळ अनुमती देईल त्याप्रमाणे उद्‌घोषक (इंग्रजी) पुस्तकाच्या पृष्ठे ७१४-१५ वरील “जागृत असणे—कसे?” यातील मुद्दे समाविष्ट करा.

२० मि: “निकडीची जाणीव ठेवून सुवार्ता सादर करणे.” (परिच्छेद १-५) परिच्छेद १ वर संक्षिप्त विवेचन दिल्यानंतर, वक्‍ता २-५ परिच्छेदांची दोन किंवा तीन प्रचारकांसोबत चर्चा करतो. सुचवलेल्या सादरतांच्या ठळक गोष्टींची ते उजळणी करून स्थानीय क्षेत्रात या किंवा अशाच प्रकारच्या सादरता प्रभावी का ठरू शकतात त्यावर विवेचन मांडतात. प्रचारक आळीपाळीने सादरतांची तालीम करतात. वक्‍ता त्यांची प्रशंसा करतो, आणखी प्रभावी करण्यास दुसरेही मार्ग सुचवतो. मग, अभ्यास चालू करण्याचे ध्येय गाठण्याच्या मार्गांविषयी श्रोत्यांना विचारतो. कालांतराने ज्ञान पुस्तकातून अभ्यास कसा चालू करता येईल त्याबद्दल विशिष्ट कल्पना देतो.

गीत ३४ (८) व समाप्तीची प्रार्थना.

फेब्रुवारी १० ने सुरू होणारा सप्ताह

गीत २९ (११)

५ मि: स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल.

१० मि: “निकडीची जाणीव ठेवून सुवार्ता सादर करणे.” (परिच्छेद ६-८) परिच्छेद ६-७ मधील सादरतांचे प्रात्यक्षिक दाखवा. आस्था दाखवली जाते तेव्हा पुनर्भेट करण्यावर जोर द्या.

३० मि: “पाहिजेत—४,००० सहायक पायनियर.” सेवा पर्यवेक्षकांद्वारे प्रश्‍नोत्तराने पूर्ण करावा. पृष्ठ ३ वरील रकान्यावर जोर देणे. पृष्ठ ६ वरील नमुना वेळापत्रकाची उजळणी करा. बाप्तिस्मा घेतलेल्या प्रत्येक प्रचारकाने, त्याला एक वा दोन महिन्यांकरता पायनियरींग करता येईल का यावर व्यक्‍तिगतरीत्या व प्रार्थनापूर्वक विचार केला पाहिजे. बाप्तिस्मा न घेतलेले प्रचारक, स्वतःसाठी प्रत्येक महिन्यात तासांचे ध्येय ठेवून सेवेतील आपला भाग वाढवू शकतात.

गीत ४३ (४) व समाप्तीची प्रार्थना.

फेब्रुवारी १७ ने सुरू होणारा सप्ताह

गीत ३० (५८)

१० मि: स्थानिक घोषणा. या आठवड्यात सेवेत वापरता येतील अशा चालू नियतकालिकांतील मनोरंजक बोलण्याजोग्या मुद्द्‌यांचा उल्लेख करा.

१३ मि: “स्मारक—अतिमहत्त्वपूर्ण घटना!” प्रश्‍नोत्तरे. मार्चचा संपूर्ण महिना सहायक पायनियरींगद्वारे खास करण्याचे उत्तेजन द्या. स्मारक विधी आमंत्रण पत्रिकांचा उपयोग करण्यावर जोर द्या.

२२ मि: गृह बायबल अभ्यास चालू करणे. अलीकडील वर्षांमध्ये, हजारो बाऊंड पुस्तकांचे वाटप करण्यात आले आहे. यामुळे कैक बायबल अभ्यास चालू करण्यासाठी आधार मिळतो. स्थानीयरीत्या पुस्तकांचे व इतर साहित्यांचे वाटप केल्याने काय साध्य करण्यात आले त्याची उजळणी करा. आढळणाऱ्‍या सर्व आस्थांना प्रतिसाद देण्यास प्रचारकांना उत्तेजन द्या. नवीन गृह बायबल अभ्यास चालू करण्याकरता लागणाऱ्‍या नेमक्या खास प्रयत्नांचे कथन करण्यास अनेक प्रचारकांना विचारा. आपल्या कामगिरीचा आंतरिक भाग शिष्य बनवणे आहे यावर जोर द्या. (मत्त. २८:१९, २०) हे आपण, जून १९९६ च्या आमची राज्य सेवा यात दिलेल्या सूचना लागू करण्याचा प्रयत्न केल्यास प्रभावीपणे करू शकतो.

गीत ४७ (२१) व समाप्तीची प्रार्थना.

फेब्रुवारी २४ ने सुरू होणारा सप्ताह

गीत ३२ (१०)

१८ मि: स्थानिक घोषणा. मार्चमध्ये सहायक पायनियरींग करणाऱ्‍या सर्वांची नावे घोषित करा. अर्ज सादर करण्याची वेळ अद्यापही गेलेली नाही हे सांगा. मार्च १ शनिवारी, क्षेत्र सेवेत पूर्ण भाग घेण्यास सर्वांना उत्तेजन द्या. महिन्यादरम्यान सेवेच्या सभेसाठी स्थानीयरीत्या केलेल्या जादा व्यवस्थांबद्दल सांगा. प्रश्‍नोत्तराने “उचित समयी साहाय्य” हा लेख हाताळा. प्रत्येक नवीन प्रकाशनांतील मौल्यवान ठळक मुद्दे दाखवा.

१२ मि: “तुमच्या नातेवाईकांबद्दल काय?” पतीपत्नी हा लेख एकत्र चर्चितात व सत्यात नसलेल्या आपल्या नातेवाईकांना सुवार्ता कशी सांगू शकतील हे ठरवतात.—पाहा टेहळणी बुरूज फेब्रुवारी १५, १९९०, पृष्ठे २५-७, (इंग्रजी).

१५ मि: मार्चसाठी साहित्य सादरतेची उजळणी करा—कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य. आधुनिक समाजात कौटुंबिक बिघाडाच्या कारणांची संक्षिप्त चर्चा करा. (पाहा इंग्रजी भाषेतील टेहळणी बुरूज ऑक्टोबर १५, १९९२, पृष्ठे ४-७) पुस्तकाच्या पृष्ठ ३ वरील अनुक्रमणिकेची उजळणी करा. सादरतेसाठी आधार देऊ शकणारे अध्याय निवडण्यास श्रोत्यांना विचारा. प्रत्येक अध्यायाच्या शेवटी असलेला उपयोगी बोधक रकाना दाखवा. हे पुस्तक कसे सादर करता येते त्याचे प्रात्यक्षिक एका पात्र प्रचारकाद्वारे दाखवा. येणाऱ्‍या सप्तांहांतासाठी या पुस्तकाच्या प्रती घेण्याची सर्वांना आठवण करा व स्थानीय क्षेत्रातील सर्व भाषांतील प्रती घेण्याचे उत्तेजन द्या.

गीत ४८ (२८) व समाप्तीची प्रार्थना.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा