वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/९६ पृ. २
  • डिसेंबरसाठी सेवा सभा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • डिसेंबरसाठी सेवा सभा
  • आमची राज्य सेवा—१९९६
  • उपशिर्षक
  • डिसेंबर २ ने सुरू होणारा सप्ताह
  • डिसेंबर ९ ने सुरू होणारा सप्ताह
  • डिसेंबर १६ ने सुरू होणारा सप्ताह
  • डिसेंबर २३ ने सुरू होणारा सप्ताह
  • डिसेंबर ३० ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—१९९६
km १२/९६ पृ. २

डिसेंबरसाठी सेवा सभा

डिसेंबर २ ने सुरू होणारा सप्ताह

गीत १३४ (३३)

१० मि: स्थानिक घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा. साहित्य सादरतेविषयी सांगा.

१५ मि: “आपला संदेश कोण ऐकेल?” प्रश्‍नोत्तरे. आपला संदेश आकर्षक का आहे या विषयावर मार्च २२, १९८७, सावध राहा! (इंग्रजी), पृष्ठ ५ वरील मुद्दे समाविष्ट करा.

२० मि: “बायबल आशा आणि मार्गदर्शन देते.” (परिच्छेद १-६) परिच्छेद १-२ सोबत भाग प्रस्तुत करा. (युक्‍तिवाद [इंग्रजी] पुस्तक, पृष्ठे ५८-६० समाविष्ट करून “बायबलवर विचार करण्याची [चार] कारणे” संक्षिप्त रूपात सांगा.) कार्यक्षम प्रचारकांना परिच्छेद ३-६ मधील सुचवलेल्या प्रस्तुतींचे प्रात्यक्षिक करण्यास सांगा. श्रोत्यांना, (१) विचारलेल्या प्रश्‍नांनी आस्था जागृत करण्यास कशी मदत केली, (२) उपयोगात आणलेली शास्त्रवचने चर्चा केल्या जाणाऱ्‍या विषयाशी कशी जुळतात, (३) पुनर्भेटीमध्ये प्राथमिक चर्चेचा तर्कशुद्धरितीने मागोवा कसा घेण्यात आला, आणि (४) अभ्यासाचा प्रस्ताव कसा मांडण्यात आला, यांवर विवेचन मांडण्यास सांगा.

गीत ७५ (२१) व समाप्तीची प्रार्थना.

डिसेंबर ९ ने सुरू होणारा सप्ताह

गीत १०० (५९)

१० मि: स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल.

१५ मि: वयस्करांना सेवेत सामील होण्यास मदत करणे. अनेक वयस्कर विश्‍वासू प्रचारकांना मंडळीसोबत प्रचारात सामील होण्याची उत्सुकता असते, पण वयोमान आणि कमकुवत आरोग्यामुळे त्यांच्या काही शारीरिक मर्यादा असतात. त्यांना सेवा गटात सामील करण्यासाठी त्यांच्याप्रती विचारशीलता दाखवण्याचे काही मार्ग आहेत: वाहतुकीचा प्रबंध तुम्ही कराल असे सांगा; जेथे कमी पायऱ्‍या चढाव्या लागतात अशा घरांमध्ये काम करण्यासाठी त्यांची योजना करा; त्यांच्याच पुनर्भेटींसाठी त्यांना घेऊन जाण्यासाठी विचारा; त्यांना जमले नाही तर तुम्ही त्यांना घरी सोडाल हे सांगा. वयस्करांना जी मदत दिली जाते त्याकरता ते कृतज्ञ असतात. स्थानीयरित्या अशाप्रकारची विचारशीलता दाखवली जाऊ शकते असे इतर मार्ग सांगा. “आम्ही वयस्करांची कदर करतो!” या फेब्रुवारी १, १९८६, टेहळणी बुरूज (इंग्रजी), पृष्ठे २८-९ वरील लेखातील मुख्य मुद्यांची उजळणी करा.

२० मि: “बायबल आशा आणि मार्गदर्शन देते.” (परिच्छेद ७-९) “मार्गदर्शनाची गरज” या मे १, १९९३, टेहळणी बुरूज (इंग्रजी), पृष्ठ ३ वर विवेचन मांडा. आपल्या प्रस्तुतींनी उच्च उगम—देवाकडून मदत मागण्याच्या महत्त्वावर जोर का द्यावा हे स्पष्ट करा. परिच्छेद ७-८ मधील प्रस्तुतींचे प्रात्यक्षिक प्रचारकाला करायला सांगा. आपले ध्येय नेहमीच बायबल अभ्यास सुरू करण्याचे असले पाहिजे यावर जोर द्या.

गीत १९७ (५७) व समाप्तीची प्रार्थना.

डिसेंबर १६ ने सुरू होणारा सप्ताह

गीत २०९ (११)

१० मि: स्थानिक घोषणा. सणासुदीच्या अभिवादनांना व्यवहारचातुर्याने प्रतिसाद कसा द्यावा यावर काही सूचना द्या. डिसेंबर २५ करता खास क्षेत्र सेवेच्या योजना सांगा.

१५ मि: “संतोषाने पुढे होणे.” प्रश्‍नोत्तरे. मे १, १९८४, टेहळणी बुरूज (इंग्रजी), पृष्ठ २२ वरील विवेचने समाविष्ट करा.

२० मि: “देव देत असलेल्या वाढीसोबत आनंद करणे.” वडिलांचे उत्साही भाषण. अलीकडील वार्षिक पुस्तकांनुसार (इंग्रजी) त्यात दिलेल्या देशांमधील अनुभव किंवा वाढीचे पुरावे सांगा.

गीत ४१ (२२) व समाप्तीची प्रार्थना.

डिसेंबर २३ ने सुरू होणारा सप्ताह

गीत ९३ (४८)

१० मि: स्थानिक घोषणा. या आठवडी सेवेमध्ये उपयोगात आणले जाऊ शकतील अशा चालू नियतकालिकांतील काही बोलण्याजोगे मुद्दे दाखवा. जानेवारी १ करता खास सेवेच्या योजनांबद्दल सांगा.

१५ मि: स्थानीय गरजा. किंवा “सेवानिवृत्ती—ईश्‍वरशासित कार्यासाठी खुले द्वार?” या जुलै १५, १९९६, टेहळणी बुरूज, पृष्ठे २४-५ वर आधारित वडिलांचे भाषण.—पाहा सूक्ष्मदृष्टी (इंग्रजी), खंड २, पृष्ठ ७९४, परिच्छेद २-३.

२० मि: “ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत नाव नोंदणी.” शाळा पर्यवेक्षकांचे भाषण. स्थानीय नाव नोंदणीची आकडेवारी द्या आणि ज्यांना नाव नोंदवता येईल त्या सर्वांना उत्तेजन द्या. “१९९७ साठी ईश्‍वरशासित सेवा प्रशालेचा आराखडा” यात विद्यार्थी नेमणुकींसाठी दिलेल्या सूचनांची उजळणी करा.

गीत १६६ (९०) व समाप्तीची प्रार्थना.

डिसेंबर ३० ने सुरू होणारा सप्ताह

गीत २२३ (८१)

१० मि: स्थानिक घोषणा. नवीन वर्षाकरता तुमची मंडळी सभांच्या वेळा बदलणार असल्यास, सर्वांना आवश्‍यक तडजोडी करण्यास आणि नवीन वेळेनुसार मंडळीत नियमित उपस्थित राहण्यास आर्जवून नम्र उत्तेजन द्या. किंवा सर्व सभांना त्याचप्रमाणे मंडळीच्या पुस्तक अभ्यासाला सुद्धा नियमितपणे उपस्थित राहण्याचे उत्तेजन सर्वसामान्यपणे द्या.

१५ मि: साक्षीसाठी संधी निर्माण करणे. प्रशाला मार्गदर्शक पुस्तक (इंग्रजी), पृष्ठे ८०-२, परिच्छेद ११-१६ उपयोगात आणून अनोळखी लोकांशी संभाषणे कशी सुरू करावीत यावरील सूचनांची उजळणी करा. आगाऊ तयारीने उत्तम परिणाम मिळवण्यास कशी मदत होते ते दाखवा. आस्था दाखवलेल्यांची नोंद ठेवून नंतर कोणाकडून त्यांना भेट देण्याची व्यवस्था करण्यासाठी प्रचारकांना आठवण करून द्या.

२० मि: जानेवारीसाठी साहित्य सादरतेची उजळणी करा. संस्थेने सांगितलेली कोणतीही १९२-पानी जुनी पुस्तके खास दरात सादर करण्यासाठी. स्थानिक पुरवठ्यात कोणतेही पुस्तक नसल्यास, तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनविणे हे पुस्तक वापरा. मंडळीकडे कोणत्या पुस्तकांचा साठा आहे ते दाखवा. तुमच्या क्षेत्रासाठी उपयुक्‍त असणारी दोन अथवा तीन पुस्तके निवडा. युक्‍तिवाद पुस्तक, पृष्ठे ९-१४ उपयोगात आणून प्रत्येक पुस्तकाकरता उचित ठरणाऱ्‍या प्रस्तावनांची संक्षिप्तपणे उजळणी करा. एक अथवा दोन प्रस्तुतींचे प्रात्यक्षिक दाखवा.

गीत १३७ (१०५) आणि समाप्तीची प्रार्थना.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा