वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km २/९७ पृ. ६
  • “उचित समयी साहाय्य”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “उचित समयी साहाय्य”
  • आमची राज्य सेवा—१९९७
  • मिळती जुळती माहिती
  • कौटुंबिक जीवनात ईश्‍वरी शांती अनुसरणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य इतरांना देऊ करणे
    आमची राज्य सेवा—१९९७
  • चिरकालिक भवितव्य संपादन करण्यासाठी कुटुंबांना मदत करणे
    आमची राज्य सेवा—१९९७
  • नवी प्रकाशने ईश्‍वरी भक्‍तीची तालीम देण्यात मदत करतात
    आमची राज्य सेवा—१९९०
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९७
km २/९७ पृ. ६

“उचित समयी साहाय्य”

१ आपल्याला हवे असते अगदी त्याच वेळी साहाय्य मिळणे किती उत्साहवर्धक आहे! (इब्री. ४:१६) “ईश्‍वरी शांतीचे संदेशवाहक” या प्रांतीय अधिवेशनात उचित समयी साहाय्याच्या दोन खास तरतुदी पुरवण्यात आल्या तेव्हा आपल्याला केवढा आनंद झाला.

२ कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य हे नवीन पुस्तक अगदी उचित समयी आले. आनंदी कौटुंबिक जीवनाला बढावा देणाऱ्‍या चार आवश्‍यकतांवर ते लक्ष केंद्रित करते: (१) आत्म-संयम, (२) मस्तकपणाला मान्यता, (३) चांगले दळणवळण व (४) प्रेम. कौटुंबिक सौख्यानंद पुस्तकात सादर केलेला सल्ला त्या सर्व कुटुंबांना साहाय्य करील जे ईश्‍वरी शांतीसाठी त्याचे अनुकरण करतील. या नवीन पुस्तकाचे काळजीपूर्वक वाचन करण्याकरता व कुटुंब या नात्याने त्याचा एकत्र मिळून अभ्यास करण्याकरता वेळ काढा. त्यातील वैशिष्ट्यांशी चांगल्या प्रकारे परिचित व्हा जेणेकरून मार्चमध्ये पहिल्यांदाच जनतेला ते सादर करतेवेळी प्रभावीपणे त्याचा उपयोग करण्यासाठी तुम्ही तयार असाल.

३ देव आपल्याकडून काय अपेक्षितो हे नवीन माहितीपत्रक, आपले शिष्य बनवण्याचे कार्य त्वरेने पार पाडण्यास आपल्याला मदत करण्याकरता उचित समयी मिळाले आहे. वाचण्याची क्षमता बेताचीच असलेल्या लोकांना मदत करण्यास उपयोगात आणण्याकरता ते खासपणे तयार केलेले असले तरी, पुष्कळ शिक्षित प्रौढांना आणि तरुण मुलांनाही मूलभूत बायबल शिकवणींच्या सोप्या स्पष्टीकरणाचा लाभ होईल. ते जणू ज्ञान पुस्तकातून अभ्यास चालू करण्याकरता आवश्‍यक असलेले साधन असू शकते. ही तरतूद नक्कीच आणखी अनेकांना, देव जे अपेक्षितो ते करण्याद्वारे समृद्ध आशीर्वाद कसे मिळू शकतील हे समजण्यास मदत करील.

४ ‘मला काही उणे पडले नाही, माझा जीव ताजातवाना झाला व माझे पात्र काठोकाठ भरून वाहत होते,’ असे म्हणून दावीदाने आपल्यासारख्याच भावना व्यक्‍त केल्या. (स्तोत्र २३:१, ३, ५) खरा देव यहोवा याची प्रांजळपणे ओळख करून घेण्याची व त्याची सेवा करण्याची इच्छा बाळगणाऱ्‍या अनेकांना हे सुंदर आध्यात्मिक साहाय्य देण्याची आम्ही आनंदाने वाट पाहत आहोत.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा