नोव्हेंबरसाठी सेवा सभा
सूचना: अधिवेशन समयादरम्यान प्रत्येक सप्ताहाकरता आमची राज्य सेवा एक सेवा सभा आयोजित करील. “ईश्वरी शांतीचे संदेशवाहक” या प्रांतीय अधिवेशनास उपस्थित राहण्यास सुलभ व्हावे याकरता आणि पुढील सप्ताहाच्या सेवा सभेत कार्यक्रमाच्या ठळक वैशिष्ट्यांची ३० मिनिटांची उजळणी सामावण्याकरता मंडळ्या आवश्यक ते फेरबदल करू शकतील. प्रांतीय अधिवेशनाच्या कार्यक्रमाची दिवसागणिक उजळणी घेण्याकरता दोन अथवा तीन निपुण बांधवांना आगाऊ नेमणूक देण्यात येईल जे ठळक मुद्द्यांवर लक्ष वेधू शकतील. पूर्वतयारी केलेली ही उजळणी, व्यक्तिगतपणे लागू करण्याकरता व क्षेत्रात उपयोगात आणण्याकरता मुख्य मुद्दे लक्षात ठेवण्यास मंडळीची मदत करील. श्रोत्यांची विवेचने व त्यांचे अनुभव संक्षिप्त व मुद्देसूद असावेत.
नोव्हेंबर ४ ने सुरू होणारा सप्ताह
गीत २९ (११)
१० मि: स्थानिक घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा. देशाच्या व मंडळीच्या जुलै महिन्याच्या क्षेत्र सेवा अहवालावर विवेचन मांडा.
१५ मि: “तुम्ही देवाचे वचन नीट शिकविता का?” प्रश्नोत्तरे. युक्तिवाद (इंग्रजी) पुस्तकातील पृष्ठे ५८-६० येथे असलेले “बायबलला विचारात घेण्याची कारणे,” यावरील विवेचनांचाही समावेश करा.
२० मि: “सार्वकालिक जीवन हेच आहे.” (परिच्छदे १-५) पहिल्या परिच्छेदावरील सुरवातीच्या संक्षिप्त विवेचनांनंतर दोन कार्यक्षम प्रचारकांकरवी परिच्छेद २-५ मध्ये सुचविलेल्या प्रस्तुतींचे प्रात्यक्षिक दाखवा. बायबल अभ्यास सुरू करण्याच्या ध्येयावर जोर द्या.
गीत १२८ (८९) व समाप्तीची प्रार्थना.
नोव्हेंबर ११ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ४० (१८)
१० मि: स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल.
२० मि: यहोवाला का दिले पाहिजे? दोन वडिलांमधील चर्चा, नोव्हेंबर १, १९९६ च्या टेहळणी बुरूज मध्ये २८-३१ पृष्ठांवर दिलेले मुख्य मुद्दे ते ठळकपणे निदर्शनास आणतात. अथवा वडील ही माहिती भाषणाच्या स्वरूपात सादर करू शकतील.
१५ मि: “सार्वकालिक जीवन हेच आहे.” (परिच्छेद ६-८) बायबल अभ्यास सुरू करण्याकरता थेट प्रस्तावाचा उपयोग करण्याच्या फायद्यांची चर्चा करा. अनुभवी प्रचारकांकरवी परिच्छेद ६-७ मधील प्रस्तुतींचे प्रात्यक्षिक करून घ्या. जेथे प्रथम भेटीतच अभ्यास सुरू करण्यात आला होता अशा उदाहरणांचे कथन करण्यास श्रोतेगणांना आमंत्रित करा. थेटपणे बायबल अभ्यास सादर केला असता एका गृहस्थाने उत्तर दिले: “होय. आत या. मला अभ्यास करण्यास निश्चित आवडेल.” हा अभ्यास सुरू करण्यात आला, पुढील सप्ताहात त्याचे संपूर्ण कुटुंब अभ्यासाकरता बसले आणि लवकरच सर्वजण सभांना उपस्थित राहू लागले व साक्षकार्यात सहभागी होऊ लागले. पुढील सप्ताहाच्या सेवा सभेकरता जून १९९६ ची आमची राज्य सेवा यातील पुरवणीची आपली प्रत आणण्याचे सगळ्यांना उत्तेजन द्या.
गीत १२९ (६६) व समाप्तीची प्रार्थना.
नोव्हेंबर १८ ने सुरू होणारा सप्ताह
गीत १४० (७७)
१० मि: स्थानिक घोषणा. “नवीन विभागीय संमेलन कार्यक्रम” याची उजळणी करा.
१५ मि: “आपल्याला एक आदेश दिला आहे.” प्रश्नोत्तरे. टेहळणी बुरूज याच्या जानेवारी १, १९८८ अंकातील पृष्ठे २८-९ यावरील परिच्छेद १३-१६ वर संक्षिप्त विवेचने मांडा.
२० मि: प्रगतिशील बायबल अभ्यास संचालित करणे. सेवाकार्य पर्यवेक्षकाचे भाषण. जवळजवळ एक वर्षापासून आपण ज्ञान पुस्तक, बायबल अभ्यासाच्या कार्यात वापरत आलो आहोत. संभवत: काही विद्यार्थ्यांनी याचा संपूर्ण अभ्यासही केला आहे, तर इतरांनी या पुस्तकातील बहुतांश भाग अभ्यासला आहे. आपल्याला असे अभ्यास संचालित करण्यावर अधिक लक्ष देण्याचे उत्तेजन देण्यात आले होते जे अभ्यास, नवोदितांना अल्पावधीत सत्य शिकवण्यास, त्यास त्यांच्या जीवनांत लागू करण्यास व मंडळीचा भाग बनण्यास मदत करण्याकरता रचले गेले आहेत. जून १९९६ च्या आमची राज्य सेवा यातील पुरवणीत आपल्याला प्रभावी शिक्षक बनण्याकरता मदतगार ठरतील अशा काही उत्तम सूचना पुरवल्या होत्या. त्या पुरवणीतील परिच्छेद ३-१३ मध्ये जे काही दाखवून दिले आहे त्यावर आधारित कुशलपणे विद्यार्थ्यांना शिकवता यावे याकरता आपण कोणकोणत्या गोष्टी करू शकतो यांची संक्षिप्तपणे उजळणी करा. परिच्छेद १४-२२ मध्ये दिले आहे त्याप्रमाणे पुढे त्यांना एक सकारात्मक भूमिका घेण्यास काय करता येईल याकडे लक्ष द्या. परिच्छेद १५, १७, २०-१ वाचा. स्थानिक प्रचारकांनी कोणते उत्तम परिणाम प्राप्त केले हे दाखवून काही सकारात्मक अहवालांची उजळणी करा. बायबल अभ्यासाच्या कार्यात सहभाग घेण्यास बहुतेकांना उत्तेजित करा.
गीत ८५ (४४) व समाप्तीची प्रार्थना.
नोव्हेंबर २५ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ४६ (२०)
१० मि: स्थानिक घोषणा. प्रश्न पेटीची चर्चा करा. घरी नसलेल्यांची उचित नोंद करण्याची गरज ठळकपणे मांडा.
२५ मि: “सर्वत्र सुवार्तेचा प्रचार करा.” प्रश्नोत्तरे. पुरवणीत दिलेल्या काही सूचनांचे नियोजन व संघटन स्थानिक क्षेत्रात कसे करता येईल याचा उल्लेख करा. घरोघरच्या कार्याकडे दुर्लक्ष न करता साक्ष देण्याजोग्या हरएक संधीसंबंधी जागरूक असण्यास सर्वांना उत्तेजन द्या. परिच्छेद २३-२५ वरील प्रात्यक्षिक दाखवा. परिच्छेद ३४-३५ वाचा.
१० मि: डिसेंबरच्या साहित्य सादरतेची उजळणी करा. तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल यातील पृष्ठे ११-१३ उपयोगात आणून हे पुस्तक सादर करा. अध्याय ११ कडे लक्ष वेधा. ज्या कुटुंबात, येशूच्या जीवनावरील एखादे पुस्तक स्वीकारले जाईल अशा कुटुंबास सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य हे पुस्तक सादर केले जाते असे एक प्रात्यक्षिक दाखवा; तसेच, बायबल कथांचं माझं पुस्तक हे अशाच एका कुटुंबाला पण जेथे मुले आहेत तेथे सादर करा. जेथे कोठे आस्था दाखवली जाते तेथे पुनर्भेटीची निश्चित योजना आखा.
गीत १८० (१००) व समाप्तीची प्रार्थना.