प्रश्न पेटी
◼ ज्ञान पुस्तकातून एखाद्यासोबत औपचारिक बायबल अभ्यास किती कालावधीपर्यंत चालवावा?
यहोवा आज आपल्या संघटनेस आशीर्वादित करत आहे. दर वर्षी सहस्त्रावधी नवीन लोक सत्याविषयी आपली भूमिका घेतात तसतसा आपल्याला याचा पुरावा दिसून येतो. हे साध्य करण्यासाठी ज्ञान पुस्तक एक परिणामकारक साधन ठरत आहे. टेहळणी बुरूज याच्या जानेवारी १५, १९९६ अंकात स्पष्ट करण्यात आले होते, की बायबल विद्यार्थ्याने तुलनात्मकपणे लवकर, म्हणजे कदाचित काही महिन्यांतच बाप्तिस्म्याच्या योग्यतेपर्यंत आध्यात्मिक प्रगती करावी यासाठी त्यास मदत करण्याच्या उद्देशाने या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे.
या कारणास्तव, त्याच टेहळणी बुरूज अंकात पृष्ठ १७ वर असा सल्ला देण्यात आला होता: “एका व्यक्तीने ज्ञान पुस्तकातून बायबल अभ्यास पूर्ण केल्यानंतर व बाप्तिस्मा घेतल्यानंतर दुसऱ्या पुस्तकातून त्याचा औपचारिक अभ्यास घेण्याची आवश्यकता नाही.”
ज्ञान पुस्तकातून बायबल अभ्यास पूर्ण केल्यानंतरही एखादी व्यक्ती बाप्तिस्मा घेत नसल्यास काय? जून १९९६ ची आमची राज्य सेवा यातील पृष्ठ ६ वर २३ व्या परिच्छेदात आपल्याला ज्ञान पुस्तक पूर्ण केल्यानंतर त्याच विद्यार्थासोबत आणखीन पुस्तकांतून अभ्यास न करण्याविषयी टेहळणी बुरूज याने सांगितलेल्या मुद्याची आठवण करून देण्यात आली. येथपर्यंत आल्यानंतर एखाद्या बायबल विद्यार्थ्यास साहाय्य करण्यात आपल्याला रस नाही असे याचे तात्पर्य आहे का? नाही. लोकांना सत्याचे मूलभूत ज्ञान मिळावे अशी आपली इच्छा आहे. तथापि, सापेक्षपणे कमी कालावधीतही एक परिणामकारक शिक्षक, सर्वसाधारण क्षमतेच्या प्रामाणिक विद्यार्थ्याला यहोवाची सेवा करण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेण्याइतपत पुरेसे ज्ञान संपादन करण्यास मदत करू शकेल अशी आशा केली जाते. काही बायबल विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक परिस्थितींमुळे कदाचित ते आठवड्यातून एकापेक्षा अधिक वेळाही अभ्यास करण्याची इच्छा व्यक्त करतील.
काही विद्यार्थी इतरांपेक्षा मंद प्रगती करतील हे कबूल आहे. परंतु, सर्वसाधारणपेक्षा अधिक वेळ चाललेला ज्ञान पुस्तकातील अभ्यास संपुष्टात आल्यावर, जर एखाद्याने मंडळीसोबत संबंध जोडण्याबद्दल अद्यापही निर्णय घेतला नसल्यास, प्रचारकाने मंडळीच्या सेवा समितीवर नेमलेल्या वडिलांसोबत याविषयी विचारविनिमय करणे बरे राहील. गांभिर्य कमी करणाऱ्या किंवा असाधारण परिस्थिती असल्यास त्यांच्या आधारावर आणखीन साहाय्य देता येऊ शकेल. टेहळणी बुरूज याच्या जानेवारी १५, १९९६ अंकातील पृष्ठ १७ वरील ११ व १२ व्या परिच्छेदांत दिलेल्या माहितीच्या आधारभूत तत्त्वाशी हे सुसंगत आहे.
सत्याचे मूलभूत ज्ञान घेण्याविषयीच्या जाणिवेने देखील विद्यार्थ्याला ख्रिस्ती सभांना उपस्थित राहण्याची चालना देण्यास हवी. यामुळे आपल्याला यहोवाची सेवा करण्याची इच्छा आहे हे विद्यार्थ्याला दाखवून देता येईल. ज्ञान पुस्तकातून अतिरिक्त कालावधीपर्यंत अभ्यास घेऊन झाल्यावरही अशी आध्यात्मिक जाणीव दिसून आली नाही, तर अभ्यास बंद करणे उचित ठरेल.