वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १०/९६ पृ. ७
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—१९९६
आमची राज्य सेवा—१९९६
km १०/९६ पृ. ७

घोषणा

◼ साहित्य सादरता

ऑक्टोबर: टेहळणी बुरूज किंवा सावध राहा! (इंग्रजी) यांच्या वर्गण्या. पाक्षिक आवृत्तींची एका वर्षाची वर्गणी ९०.०० रुपये आहे. मासिक आवृत्तींची एका वर्षाची वर्गणी आणि पाक्षिक आवृत्तींची सहा महिन्यांची वर्गणी ४५.०० रुपये आहे. मासिक आवृत्तींसाठी सहा महिन्यांची वर्गणी नाही. वर्गणी नाकारण्यात आल्यास, नियतकालिकांच्या किरकोळ प्रती प्रत्येकी ४.०० रुपयांस सादर केल्या जाव्यात.

वर्गण्या घेताना आठवणीत ठेवा की टेहळणी बुरूज आता सर्व भारतीय भाषांत तसेच नेपाळीत, दर पंधरवड्याला प्रकाशित होते, याला अपवाद केवळ पंजाबी व उर्दू भाषा आहेत (ज्यांत ते मासिक आहे.)

सध्या, सावध राहा! हे मल्याळम व तमीळ या भाषांत पाक्षिक आहे पण कन्‍नड, गुजराती व तेलगू या भाषांत मासिक आहे. उर्दू, नेपाळी बंगाली, मराठी व हिन्दी या भाषांत सावध राहा! याच्या त्रैमासिक वितरकांच्या प्रती मंडळ्यांसाठी उपलब्ध आहेत, पण या पाच भाषांत प्रत्येकी वर्गण्या उपलब्ध नाहीत.

नोव्हेंबर: सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान हे पुस्तक २०.०० रुपयांच्या अनुदानात. गृह बायबल अभ्यास सुरू करण्याच्या उद्देशाने सर्व वाटपांचा मागोवा घेण्याकरता खास प्रयत्न केला जाईल.

डिसेंबर: तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक २५.०० रुपयांच्या अनुदानात (मोठ्या आकाराचे ४५.०० रुपयांना). अदलूनबदलून, एकतर सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य किंवा बायबल कथांचं माझं पुस्तक (इंग्रजी) हे ४५.०० रुपयांच्या अनुदानात सादर केले जाऊ शकते.

जानेवारी: प्रत्येकी १०.०० रुपयांच्या अनुदानांत १९२-पृष्ठांच्या जुन्या पुस्तकांची खास सादरता. (पायनियरांसाठी दर ५.०० रु. इतका आहे) आमच्याजवळ अद्यापही उपलब्ध असणाऱ्‍या या श्रेणीतील पुस्तकांची यादी हवी असल्यास जानेवारी १९९६ ची आमची राज्य सेवा यातील ‘घोषणा’ रकाना पाहा. नेपाळी किंवा बंगाली भाषेत वाचणे पसंत करणाऱ्‍यांना कोणतेही ३२ पृष्ठांचे माहितीपत्रक देता येऊ शकते. मल्याळम भाषा निवडणाऱ्‍यांना, २०.०० रुपयांच्या अनुदानात तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनविणे व पंजाबी भाषा पसंत करणाऱ्‍यांना सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान हे पुस्तक २०.०० रुपयांच्या अनुदानात सादर करता येऊ शकते. ही शेवटली दोन पुस्तके खास दरात सादर करण्यात येऊ नयेत याची कृपया नोंद घ्यावी.

◼ आमची राज्य सेवा यातील सदर अंकातील पुरवणी, म्हणजे “१९९७ साठी ईश्‍वरशासित सेवा प्रशालेचा आराखडा,” १९९७ च्या सबंध वर्षभर संदर्भासाठी सांभाळून ठेवा.

◼ संस्था अद्यापही सर्व भाषांकरता, विशेषतः कन्‍नड, तेलगू, पंजाबी, बंगाली व मराठी यांकरता, भाषांतरकारांच्या शोधात आहे. बेथेल सेवेसाठी इच्छुक असणाऱ्‍या बंधुभगिनींनी चाचणी साहित्य पाठवण्याची संस्थेला विनंती करण्याद्वारे अर्ज करावा.

◼ जानेवारी ८, १९९७ अंकापासून सावध राहा! हे हिन्दी व मराठीत एक मासिक आवृत्ती म्हणून उपलब्ध होईल. या दोन आवृत्त्यांसाठी ज्या मंडळ्यांना आपल्या ऑर्डरमध्ये काही फेरबदल करायचे आहेत त्यांनी डिस्ट्रिब्यूटर्स ऑर्डर फॉर्मचा उपयोग करून ताबडतोब तसे करावे. नोव्हेंबर १९९६ पासून, या दोन आवृत्त्यांसाठी वार्षिक वर्गण्या ४५.०० रुपयांत सादर करता येतील; जानेवारी ८, १९९७ हा पहिला अंक असेल हे घरमालकास सांगावे.

◼ उपलब्ध असलेली नवीन प्रकाशने:

कुरुक्षेत्र ते हर्मगिदोन—आणि तुमचा बचाव —तेलगू

स्वातंत्र्याकडे नेणारा ईश्‍वरी सत्याचा मार्ग —तेलगू

◼ पुन्हा उपलब्ध असलेली प्रकाशने:

कुरुक्षेत्र ते हर्मगिदोन —आणि तुमचा बचाव —गुजराती, तमीळ, मराठी, मल्याळम, हिंदी

स्वातंत्र्याकडे नेणारा ईश्‍वरी सत्याचा मार्ग —तमीळ, मल्याळम

जीवनात आणखी पुष्कळसे आहे! —तमीळ, मराठी

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा