वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/९६ पृ. २
  • सप्टेंबरसाठी सेवा सभा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सप्टेंबरसाठी सेवा सभा
  • आमची राज्य सेवा—१९९६
  • उपशिर्षक
  • सप्टेंबर २ ने सुरू होणारा सप्ताह
  • सप्टेंबर ९ ने सुरू होणारा सप्ताह
  • सप्टेंबर १६ ने सुरू होणारा सप्ताह
  • सप्टेंबर २३ ने सुरू होणारा सप्ताह
  • सप्टेंबर ३० ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—१९९६
km ९/९६ पृ. २

सप्टेंबरसाठी सेवा सभा

सप्टेंबर २ ने सुरू होणारा सप्ताह

गीत ९८ (९१)

१२ मि: स्थानिक घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा. एप्रिल १९९३ आमची राज्य सेवा यातील “सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य पुस्तकाचा अभ्यास करणे” या लेखाची उजळणी सर्वांना व विशेषतः मंडळीच्या पुस्तक अभ्यास चालकांना करण्यास उत्तेजन द्या. लेखातील मुख्य मुद्दे ठळकपणे मांडा.

१५ मि:“विश्‍वासाने चाला.” प्रश्‍नोत्तरे.

१८ मि:“सकारात्मक मनोवृत्ती राखून सुवार्ता प्रस्तुत करणे.” सुरवातीची विवेचने परिच्छेद १ वर आधारून मांडा. कौटुंबिक पुस्तकाला पर्यायी सादरता म्हणून अनंतकाल जगू शकाल अथवा निर्मिती ही पुस्तके उपयोगात आणली जाऊ शकतात हे स्पष्ट करा; तथापि, मंडळीकडे कौटुंबिक पुस्तके उपलब्ध असेपर्यंत, हीच प्रथम वापरण्यात यावीत. मग लेखातील केवळ २-५ परिच्छेद पूर्ण करा. कौटुंबिक पुस्तक कसे सादर करावे हे दाखवायला चांगली तयारी केलेल्या प्रस्तुतींचे प्रात्यक्षिक दाखवा, पुनर्भेट करा आणि ज्ञान पुस्तकातून अभ्यास सुरू करा.

गीत ४८ (२८) व समाप्तीची प्रार्थना.

सप्टेंबर ९ ने सुरू होणारा सप्ताह

गीत १८ (३६)

१२ मि:स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल. “राज्याची घोषणा करा” यावर चर्चा करा.

१८ मि:मंडळीचा १९९६ सेवा वर्ष अहवाल याची उजळणी करा. सेवा पर्यवेक्षकांचे उभारणीकारक, उत्साही भाषण. (आपली सेवा [इंग्रजी] पुस्तक, पृष्ठे १००-२ पाहा.) मंडळीने कोणत्या बाबतीत चांगले काम केले ते दाखवा आणि प्रशंसा करा. नियमित आणि सहायक पायनियरांच्या कार्यहालचालीने स्थानिकपणे कार्याची प्रगती करण्यास किती मदत केली आहे ते दाखवा. सभांच्या उपस्थितीचे आंकडे द्या व नियमित उपस्थितीच्या महत्त्वावर जोर द्या. येत्या वर्षी मंडळी कोणती व्यावहारिक ध्येये साध्य करण्याचा प्रयत्न करू शकते ते सांगा.

१५ मि:“सकारात्मक मनोवृत्ती राखून सुवार्ता प्रस्तुत करणे.” केवळ ६-८ परिच्छेदांची उजळणी करा, प्रथम भेट आणि पुनर्भेट या दोन्हींकरता दुकाना-दुकानातील प्रस्तावनांचे प्रात्यक्षिक दाखवा. (व्यापारी क्षेत्रात कार्य करण्याविषयी अतिरिक्‍त सूचनांसाठी ऑक्टोबर १९८९ ची आमची राज्य सेवा पृष्ठ ४ पाहा.) तत्काळ पुनर्भेटी देण्याचे सर्वांना उत्तेजन द्या.

गीत १२३ (६३) व समाप्तीची प्रार्थना.

सप्टेंबर १६ ने सुरू होणारा सप्ताह

गीत १० (१८)

१५ मि:स्थानिक घोषणा. श्रोत्यांशी प्रश्‍न पेटीची चर्चा करा. प्रशाला मार्गदर्शक (इंग्रजी) पुस्तकातील अभ्यास ६ यातून एक अथवा दोन मुद्दे संक्षिप्त रूपात सामील करा.

१५ मि:“भाषण आणि वर्तन यांमध्ये कित्ता व्हा.” प्रश्‍नोत्तरे.

१५ मि:शाळेतील ख्रिस्ती वर्तन. पिता आपल्या मुलासोबत अथवा मुलीसोबत शाळेच्या वातावरणातील गंभीर धोके दाखवण्याकरता बोलतात; ते संगतीबद्दल सावध असण्याच्या आणि आक्षेपार्ह कार्यहालचाली टाळण्याच्या गरजेवर जोर देतात. ते, शिक्षण (इंग्रजी) माहितीपत्रकातील पृष्ठ २४ वरील पेटीची उजळणी करतात आणि साक्षीदार या नात्याने चांगले उदाहरण मांडण्याची गरज असल्याचे समजावून सांगतात. उद्‌भवणाऱ्‍या काही मोहांविषयी त्याचप्रमाणे मादक औषधे वापरणे, भेटीगाठी, सामाजिक मेळाव्यांना उपस्थित राहणे किंवा क्रिडेत भाग घेणे अशा मोहांचा देखील पिता उल्लेख करतात; अडचणी कशा टाळाव्यात याची चर्चा ते करतात. काही अडचणी असल्यास त्या पित्याला सांगण्यात युवकाने विलंब करू नये असे उत्तेजन ते देतात—ते जाणू व मदत करू इच्छितात.

गीत ३२ (१०) व समाप्तीची प्रार्थना.

सप्टेंबर २३ ने सुरू होणारा सप्ताह

गीत २१ (१)

१० मि:स्थानिक घोषणा.

१५ मि:स्थानिक गरजा. किंवा फेब्रुवारी १५, १९९६, टेहळणी बुरूज, पृष्ठे २७-९ वरील “तुम्हाला दिसत असणाऱ्‍या गोष्टींपलीकडे पाहा!” यावर आधारित भाषण.

२० मि:“१९९६ ‘ईश्‍वरी शांतीचे संदेशवाहक’ प्रांतीय अधिवेशन.” परिच्छेद १-१६ प्रश्‍नोत्तराने पूर्ण करणे. परिच्छेद १०-११ आणि १५ वाचा.

गीत २१५ (११७) व समाप्तीची प्रार्थना.

सप्टेंबर ३० ने सुरू होणारा सप्ताह

गीत १७१ (५९)

१० मि:स्थानिक घोषणा.

२० मि:“१९९६ ‘ईश्‍वरी शांतीचे संदेशवाहक’ प्रांतीय अधिवेशन.” परिच्छेद १७-२३ प्रश्‍नोत्तराने पूर्ण करणे. परिच्छेद १७-१८ वाचा. “प्रांतीय अधिवेशनाच्या स्मरणिका” यांची उजळणी करा.

१५ मि:ऑक्टोबरसाठी साहित्य सादरतेची उजळणी करा. आपण टेहळणी बुरूज आणि सावध राहा! (इंग्रजी) नियतकालिकांच्या वर्गण्या सादर करणार आहोत. विविध मुद्यांची चर्चा करा, जसे की: (१) सुरवातीच्या पानांवर स्पष्टीकरण दिल्याप्रमाणे नियतकालिके प्रकाशित करण्यामागील उद्देश. (२) ती अनेक भाषांमध्ये प्रकाशित केली जातात ज्याद्वारे जगभरात बायबलचे ज्ञान उपलब्ध करून दिले जात आहे. (३) टेहळणी बुरूज व्यक्‍तिगत, कौटुंबिक आणि गटाच्या अभ्यासाकरता बनवलेले आहे. (४) विविध धर्मांशी संलग्न असलेले लोक ती नियतकालिके वाचतात. (५) ज्यांना प्रामाणिकपणाने वाचण्याची इच्छा आहे परंतु वर्गणी करण्याची ऐपत नाही अशांना आपण व्यक्‍तिगतपणे अलीकडील अंक देऊ. (६) ती विशेषतः व्यग्र लोकांकरता बनवलेली आहेत. (७) टेहळणी बुरूज १८७९ पासून प्रकाशित करण्यात येत आहे; सावध राहा! (इंग्रजी) हे १९१९ पासून. (८) आपले कार्य स्वयंसेवा व शैक्षणिक असून वाणिज्य व्यापार नाही. यास्तव, नियतकालिकांकरता ठरवलेले अनुदान अगदी वाजवी आहे. प्रशंसा केलेल्या वाचकाने केलेली विवेचने सांगून समारोप करा.—पाहा एप्रिल १५, १९८६, टेहळणी बुरूज (इंग्रजी), पृष्ठ ३२.

गीत ३ (३३) व समाप्तीची प्रार्थना.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा