सार्वकालिक जीवनाकडे नेणाऱ्या ज्ञानाचा प्रसार करणे
१ यहोवा “मानवांचा ज्ञानदाता” आहे. (स्तोत्र ९४:१०) जे त्याची स्वीकारणीय पद्धतीने सेवा करण्याविषयी अजाण आहेत अशांमध्ये त्याच्या जीवन वाचवणाऱ्या ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी तो आपला उपयोग करतो. सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान हे पुस्तक, शिकवण्याचे एक उत्तम साधन आहे ज्याद्वारे प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना देवाचे लिखित वचन, बायबल यामधून त्याच्याविषयी अचूक समज प्राप्त होऊ शकते. (१ तीम. २:३, ४) ज्ञान पुस्तकामध्ये, सत्याबद्दल स्पष्ट व तर्कशुद्ध पद्धतीने सांगितल्यामुळे यहोवा लोकांना काय शिकवण्याचा प्रयत्न करत आहे याचे आकलन होण्यास त्यांना मदत मिळेल. यास्तव, आपण सेवेत भाग घेतो तेव्हा अनेक भाषांत या पुस्तकाचा साठा आपल्यासोबत असला पाहिजे. या महिन्यात, आपल्याला लोकांना अशा संभाषणांमध्ये समाविष्ट करायचे आहे ज्यामुळे त्यांना ते पुस्तक वाचावेसे वाटेल. येथे काही सल्ले आहेत. हे पाठ करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, तुमच्या स्वतःच्या शब्दात व संभाषणाच्या स्वाभाविक पद्धतीने मुख्य मुद्दे व्यक्त करण्याचा प्रयत्न करा.
२ अनेक लोकांनी आपली प्रिय व्यक्ती मृत्युमुळे गमावली असल्यामुळे, तुम्ही सुरवातीला असे म्हणून पुनरुत्थानाच्या आशेबद्दल संभाषण सुरू करू शकता:
▪ “आपल्यापैकी अनेकांनी मृत्युमुळे आपली प्रिय व्यक्ती गमावली आहे. त्या व्यक्तीला तुम्ही पुन्हा कधी पाहू शकाल का याचा विचार केला आहे काय? [प्रतिसादासाठी वाव द्या.] मृत्यू, मनुष्याकरता असलेल्या देवाच्या मूळ उद्देशाचा भाग नव्हता. आपल्या प्रिय व्यक्तींना मृत्यूच्या तावडीतून सुटका मिळू शकते हे येशूने सिद्ध केले. [योहान ११:११, २५, ४४ वाचा.] हे अनेक शतकांआधी घडले असले, तरी देवाने आम्हाकरता कशाचे अभिवचन दिले आहे त्यास ते प्रदर्शित करते. [ज्ञान पुस्तकातील पृष्ठ ८५ वरील चित्र काढा आणि तेथील मथळा वाचा. मग, पृष्ठ ८६ वरील चित्र दाखवून त्यावर विवेचन मांडा.] पुनरुत्थानाच्या या सांत्वनपर आशेविषयी तुम्हाला अधिक वाचण्याची इच्छा असल्यास, तुम्हाजवळ हे पुस्तक ठेवून जाण्यास मला आवडेल.”
३ पुनरुत्थानाच्या आशेबद्दलच्या प्राथमिक चर्चेनंतर, त्याच व्यक्तीसोबत तुम्ही पुढील संभाषण अशा प्रकारे करू शकता:
▪ “मृत्यू, मनुष्याकरता असलेल्या देवाच्या मूळ उद्देशाचा भाग नव्हता असे मी म्हटल्याचे तुम्हाला आठवत असेल. ते खरे असल्यास, आपण वृद्ध होतो व मरतो ते का? काही कासवे १०० पेक्षा अधिक वर्षे जगतात, व असे काही वृक्ष आहेत जे हजारो वर्षांपासून जिवंत आहेत. मग मानव केवळ ७० वा ८० वर्षे का जगतात? [प्रतिसादासाठी वाव द्या.] आपण मरतो कारण पहिल्या मानवी जोडप्याने देवाची अवज्ञा केली होती.” रोमकर ५:१२ वाचा. ज्ञान पुस्तकातील पृष्ठ ५३ काढा आणि अध्यायाचे शीर्षक वाचा. छापील प्रश्नांची उत्तरे दाखवून पहिल्या तीन परिच्छेदांचा विचार करा. उर्वरित अध्यायाचा विचार करण्याकरता नंतर परतण्यासाठी वेळ ठरवा. दरम्यान, त्या व्यक्तीला वाचन संपवण्याचे उत्तेजन द्या.
४ एखादा धार्मिक प्रवृत्तीचा आहे असे भासल्यास, त्याच्याशी बोलताना तुम्ही म्हणू शकता:
▪ “आज प्रत्यक्षात शेकडो वेगवेगळे धर्म आहेत. ते निरनिराळे परस्पर विरोधी विश्वास शिकवतात. काही लोक म्हणतात, की सर्व धर्म चांगले आहेत आणि आपण काय विश्वास करतो ते इतके महत्त्वाचे नाही. तुमचे मत काय आहे? [प्रतिसादासाठी वाव द्या.] येशूने एकच खरा धर्म असल्याचे सांगितले आणि अनेक उपासनेचे प्रकार देवाला अस्वीकारणीय असल्याचे दाखवले. [मत्तय ७:२१-२३ वाचा.] देवाला संतुष्ट करावयाचे असल्यास, आपण त्याच्या इच्छेनुरूप त्याची उपासना केली पाहिजे.” ज्ञान पुस्तकातील अध्याय ५ काढा, शीर्षक वाचा आणि त्यातील काही उपशिर्षके दाखवा. ही माहिती एखाद्यास, देवाला कसे संतुष्ट करावे हे शिकवण्यात मदत करील त्याचे स्पष्टीकरण द्या. ते पुस्तक १५ रुपयांच्या अनुदानात सादर करा.
५ अनेक धर्म असल्यामुळे गोंधळात पडलेले लोक तुमच्या पुनर्भेटीत या प्रश्नाचे उत्तर मिळाल्याबद्दल आभार व्यक्त करतील:
▪ “आज विविध धर्म अस्तित्वात असताना, खरा धर्म कोणता हे आपण कसे सांगू शकतो? तुम्ही कसे ठरवणार? [प्रतिसादासाठी वाव द्या.] येशूने आपल्या खऱ्या अनुयायांना कसे ओळखावे त्याविषयी आपल्याला सांगतिले.” योहान १३:३५ वाचा. ज्ञान पुस्तकातील ५ व्या अध्यायातील १८ व १९ परिच्छेदांचा विचार करा. या शास्त्रवचनीय मार्गदर्शनांचा व विलग्नीकरणाच्या पद्धतीचा उपयोग करून एखादी व्यक्ती खऱ्या धर्माला ओळखू शकते हे दाखवा. यहोवाचे साक्षीदार त्यांची खरी प्रीती व उच्च नैतिक दर्जे यांसाठी संपूर्ण जगभरात कसे ओळखले जातात हे सांगा. ज्ञान पुस्तकाद्वारे, बायबलचा अभ्यास, देवाला ग्राह्य असणाऱ्या उपासनेच्या पद्धतीची स्पष्ट ओळख कशी करून देईल हे समजावून सांगा.
६ तुम्ही एखाद्या पालकाला भेटल्यास, हा प्रस्ताव प्रभावकारी असेल:
▪ “ज्या युवकांना कोणत्याच प्रकारची नैतिक मूल्ये नाहीत त्यांच्या अनावर वर्तणुकीबद्दल आपण दररोज अहवाल ऐकतो. मुलांना बरोबर व चुकीचे यातील फरक न शिकवल्यामुळे काही प्रौढ जण शालेय व्यवस्थेला दोष देतात. हे प्रशिक्षण कोणी द्यावे असे तुम्हाला वाटते? [प्रतिसादासाठी वाव द्या.] या प्रश्नाबद्दल बायबल काय म्हणते ते ऐका. [इफिसकर ६:४ वाचा.] ते आपल्याला, मुलांमध्ये नैतिक मूल्ये रुजवणे पालकांची जबाबदारी आहे असे सांगते.” ज्ञान पुस्तकातील पृष्ठ १४५ उघडा, परिच्छेद १६ वाचा आणि पृष्ठ १४७ वरील चित्रांवर विवेचन मांडा. हे पुस्तक संपूर्ण कुटुंबाच्या अभ्यासाकरता बनवलेले आहे ते स्पष्ट करा. पृष्ठ १४६ वरील १७ आणि १८ परिच्छेदांचा उपयोग करून कुटुंबांसोबत आपण अभ्यास कसे चालवतो ते प्रदर्शित करा.
७ प्रथम भेटीत, चिंतित पालकासोबत तुम्ही अभ्यास सुरू केला असल्यास, असे म्हणून पुनर्भेटीत तो पुढे नेऊ शकता:
▪ “आजचे जग, आपल्या लहान मुलांसमोर अनेक मोहपाश ठेवते. यामुळे मोठे होत असताना त्यांना देव-भीरु व्यक्ती बनणे अतिशय कठीण होते. आपल्या मागील चर्चेत, आपण दोन तत्त्वांमधील फरक पाहिला होता याची आठवण कदाचित तुम्हाला असेल. ईश्वरी पालक या नात्याने, आपल्या मुलांकरता आपल्याला उत्तम उदाहरणे ठेवण्याची गरज आहे, व त्यांच्याबद्दल आपल्याला प्रीती असल्याचे आपण सतत व्यक्त केले पाहिजे. मुलांना त्यांच्या पालकांकडून आणखी एक गोष्ट हवी असते असे बायबल म्हणते.” नीतिसूत्रे १:८ वाचा. ज्ञान पुस्तकातील पृष्ठ १४६ उघडा व अभ्यास पुढे चालू ठेवून १९-२३ परिच्छेद पूर्ण करा. पहिल्या अध्यायापासून, सबंध कुटुंबासोबत अभ्यास करण्यास तुम्ही पुन्हा याल हे सुचवा.