वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/९६ पृ. १
  • आपले नवस नित्य फेडीत राहणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपले नवस नित्य फेडीत राहणे
  • आमची राज्य सेवा—१९९६
  • मिळती जुळती माहिती
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • दिलेलं वचन नेहमी पाळा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • तुमच्या विवाह शपथेप्रमाणे आचरण ठेवणे!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • विश्‍वासू लोक दिलेलं वचन पाळतात
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९६
km ७/९६ पृ. १

आपले नवस नित्य फेडीत राहणे

१ स्तोत्रकर्ता दावीद यहोवाला असे सांगण्यास प्रेरित झाला: “तुझ्या नावाची स्तोत्रे निरंतर गाऊन मी आपले नवस नित्य फेडीत राहीन.” (स्तोत्र ६१:८) दावीदाला माहीत होते की, नवस करणे ही पूर्णतः ऐच्छिक बाब आहे. तथापि, नवस केला तर तो फेडलाच पाहिजे हे देखील त्याने जाणून घेतले. असे असतानाही, नित्य आपले नवस फेडण्याच्या संधीकरता त्याने यहोवाची स्तुती केली.

२ आपण यहोवाला समर्पण केल्यानंतर, स्वेच्छेने त्याच्या इच्छेनुसार वागण्याचा नवस केला. आपण स्वतःचा त्याग केला आणि यहोवाची सेवा करणे याला आपल्या जीवनातील प्रथम ध्येय बनवले. (लूक ९:२३) यास्तव, आपणही नित्य आपला नवस फेडला पाहिजे. (उप. ५:४-६) पाण्याच्या बाप्तिस्म्याच्या वेळी आपण दिलेली जाहीर कबुली आपल्या संपूर्ण जीवनशैलीत प्रत्ययास आली पाहिजे कारण, “जो मुखाने कबूल करितो त्याचे तारण होते,” हे आपल्याला ठाऊक आहे. (रोम. १०:१०) यामध्ये सुवार्तेचा प्रचार करणे समाविष्ट आहे. (इब्री. १३:१५) व्यक्‍तिगत परिस्थिती निरनिराळ्या असतात, पण आपण सर्वजण इतरांसोबत सुवार्तेची सहभागिता करण्याच्या महत्त्वाला नित्य दृष्टिपथात ठेवू शकतो.

३ दररोज प्रचार करण्यासाठी संधी निर्माण करा: दुसऱ्‍या व्यक्‍तीला सुवार्ता सांगणे हा सुखकर अनुभव आहे. दररोज असे करण्यासाठी, आपल्या परिस्थितींनुसार जमेल तेव्हा प्रचार करण्यासाठी संधी निर्माण केल्या पाहिजेत. कामाच्या ठिकाणी किंवा शाळेत व शेजाऱ्‍यांना अथवा दररोज भेटणाऱ्‍या इतरांना अनौपचारिकपणे साक्ष देण्यात ज्यांनी पुढाकार घेतला आहे त्यांना अनेक सुखकर अनुभव लाभले आहेत. पत्र व्यवहार किंवा दूरध्वनीचा उपयोग करणे देखील इतरांना साक्ष देण्याचे माध्यम ठरू शकते. गृह बायबल अभ्यास चालवल्याने परिणीत होणारा खास आनंद, या सर्व माध्यमांचा फायदा उचलल्यामुळे तसेच दारोदारी साक्षकार्य व पुनर्भेटी करण्यासाठी नियमितपणे वेळ काढल्यामुळे प्राप्त होऊ शकतो. होय, आपण दररोज प्रचार करण्याच्या संधी निर्माण करू शकू.

४ एक बहीण आपल्या कामावरील मधल्या सुटीत शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करणे वाचू लागली. तिने एका सह-कर्मचारीला आपल्यासोबत दिवसाचे वचन वाचण्याकरता बोलावले, आणि याचा परिणाम म्हणजे लवकरच त्या स्त्रीसोबत एक बायबल अभ्यास सुरू झाला. त्या दररोज अर्धा तास अभ्यास करत होत्या, आठवड्यातील पाच दिवस त्या अभ्यास करत असत. आणखी एका कर्मचाऱ्‍याने त्या दररोज अभ्यास करत असल्याचे निरीक्षिले. कालांतराने त्याने स्वतःची ओळख एक निष्क्रिय बांधव म्हणून करून दिली. त्या बहिणीचा आवेश पाहून त्याने पुन्हा सक्रिय होण्यासाठी एका वडिलाशी संपर्क साधला. नित्य आपला नवस फेडण्याचे चालू ठेवल्यामुळे या बहिणीचा इतर दोन व्यक्‍तींवर सकारात्मक प्रभाव पडला.

५ यहोवाने आपल्यासाठी केलेल्या सर्व उत्तम गोष्टींबद्दल प्रशंसेच्या अंतःकरणाने आपण प्रवृत्त होतो तेव्हा, आपला समर्पणाचा नवस होता होईल तितक्या प्रमाणात दररोज पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्यामुळे आपल्याला आनंद व समाधान प्राप्त होईल. स्तोत्रकर्त्याप्रमाणे आपण असे म्हणू शकतो: “हे प्रभू, माझ्या देवा, मी आपल्या जिवेभावे तुझे गुणगान गाईन, तुझ्या नावाचा महिमा सदोदित वर्णीन.”—स्तोत्र ८६:१२.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा