वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ३/९६ पृ. २
  • मार्चसाठी सेवा सभा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मार्चसाठी सेवा सभा
  • आमची राज्य सेवा—१९९६
  • उपशिर्षक
  • मार्च ४ ने सुरू होणारा सप्ताह
  • मार्च ११ ने सुरू होणारा सप्ताह
  • मार्च १८ ने सुरू होणारा सप्ताह
  • मार्च २५ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—१९९६
km ३/९६ पृ. २

मार्चसाठी सेवा सभा

मार्च ४ ने सुरू होणारा सप्ताह

गीत १ (२२)

१० मि:स्थानिक घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा. मार्च १ पासून जारी झालेल्या नियतकालिके आणि वर्गण्यांच्या नवीन दरांविषयी श्रोत्यांना आठवण करून द्या.

१५ मि:ज्ञान या नवीन पुस्तकाचा वापर करण्याची तयारी करा. आमची राज्य सेवा हिच्या या अंकातील पहिल्या पृष्ठाच्या वरच्या लेखाची प्रश्‍नोत्तराने चर्चा. सर्वांना पुस्तकातील साहित्याशी पूर्णतः परिचित होण्यास उत्तेजन द्या जेणेकरून ते क्षेत्रात याचा उपयुक्‍तपणे वापर करू शकतात.

२० मि:“खऱ्‍या देवाचे ज्ञान जीवनाप्रत नेते.” सुचवलेल्या सादरतांची उजळणी करा. एक किंवा दोन संक्षिप्त प्रात्यक्षिके दाखवा.

गीत ७८ (११२) व समाप्तीची प्रार्थना.

मार्च ११ ने सुरू होणारा सप्ताह

गीत १६४ (७३)

१० मि:स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल.

२० मि:“१९९६ च्या ईश्‍वरशासित सेवा प्रशालेपासून लाभ मिळवणे—भाग ३.” प्रशाला पर्यवेक्षकांचे भाषण. ज्यांना शक्य आहे आणि जे आपल्या नेमणुका विश्‍वासूपणे पार पाडू शकतात त्यांना नाव नोंदवण्यास उत्तेजन द्या. “प्रत्येक शास्त्रलेख” पुस्तकात पृष्ठे ३२५-६, परिच्छेद २७-८ वर आढळते त्याप्रमाणे, बायबलच्या नावांचा उच्चार करण्याचे नियम स्पष्ट करा. तसेच नावांमधील “ch” हा संयोग जोर देऊन “k” असा उच्चारण्यात येतो हे समजावून सांगा. (फक्‍त Rachel [रेचेल] हा अपवाद असून त्यामधील “ch” हा उच्चार सौम्य आहे.) संस्थेच्या ऑडिओ कॅसेटमधून लूक ३:२३-३८ हा भाग लावलेला असताना श्रोत्यांना त्यांच्या बायबलमध्ये पाहण्यास लावून नियमांचे स्पष्टीकरण द्या.

१५ मि:जे काही करता ते कुटुंब या नात्याने एकत्र मिळून करा. सप्टेंबर १, १९९३, टेहळणी बुरूज, पृष्ठे १६-१९ वर आधारित एकत्रितपणाच्या आवश्‍यकतेविषयी वडील त्यांच्या कुटुंबाशी अनौपचारिकपणे बोलतात. कौटुंबिक अभ्यास आणि सुवार्तिकाच्या कार्यावर अधिक जोर द्या. आधुनिक कुटुंबे, एकत्र मिळून फारच कमी वेळ घालवत असल्यामुळे आणि त्यांच्या कोणत्याच समान आवडीनिवडी नसल्यामुळे ती कशी मोडकळीस येत आहेत ते दाखवा. देवाच्या वचनाचा अभ्यास करणे आणि एकत्र मिळून सेवेत सहभाग घेणे हे ख्रिस्ती कुटुंबाकरता एक आशीर्वाद आहे. पित्याने या सर्व गोष्टींना योग्यप्रकारे संघटित करावे आणि मातेने यांना सहयोग द्यावा या आवश्‍यकतेवर जोर द्या. मुलांनी आध्यात्मिक कार्यहालचालींमध्ये रस घ्यावा व आपल्या पालकांच्या सान्‍निध्यात राहून कार्य करावे. कुटुंब एकत्रित आणले जाईल आणि दुनियादारीच्या वाढत्या दबावांचा सामना करण्यास त्यास बळकट केले जाईल.

गीत २११ (६६) व समाप्तीची प्रार्थना.

मार्च १८ ने सुरू होणारा सप्ताह

गीत ६ (४)

१० मि:स्थानिक घोषणा. अभ्यास चालकांनी बायबलच्या अभ्यासात उत्तम प्रगती करणाऱ्‍या नवोदितांना बाप्तिस्मा न घेतलेले प्रचारक बनण्याचे ध्येय साध्य करण्यास उत्तेजन दिले पाहिजे. पालक त्यांच्या मुलांना प्रचारक बनण्यासही मदत करू शकतात. आपली सेवा पूर्ण करण्यासाठी संघटित (इंग्रजी) यातील पृष्ठे ९७-१०० वर सुचवलेल्या पद्धतीची उजळणी करा. एप्रिल आणि मे दरम्यान मंडळीतील बाप्तिस्मा घेतलेल्या सर्व प्रचारकांना साहाय्यक पायनियरींग करण्यास प्रोत्साहन द्या.

१५ मि:१९९६ यहोवाच्या साक्षीदारांचे वार्षिक पुस्तक (इंग्रजी) यातील ठळक मुद्यांची उजळणी करा. पृष्ठे ३-५ ते ३३ वर दिलेल्या आपल्या जागतिक कार्यहालचालीच्या काही मनोरंजक वैशिष्ट्यांची चर्चा कौटुंबिक गट करतो. शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करणे यातील नेमलेले बायबलचे वचन विचारात घेतल्यावर वार्षिक पुस्तक यातील काही पृष्ठे एकत्र मिळून वाचण्याचा प्रयत्न ते दररोज करतील याबद्दल ते सहमती दर्शवतात.

२० मि:“जीवनाप्रत नेणारे ज्ञान प्राप्त करण्यास इतरांना मदत करा.” पुनर्भेटींत उपयोगात आणणार आहात अशा सुचवलेल्या सादरतांची उजळणी करा. एक किंवा दोन प्रात्यक्षिकांचा समावेश करा. अभ्यास सुरू करण्याच्या ध्येयावर जोर द्या.

गीत १३० (५८) व समाप्तीची प्रार्थना.

मार्च २५ ने सुरू होणारा सप्ताह

गीत ५ (२८)

१५ मि:स्थानिक घोषणा. “स्मारक विधीच्या स्मरणिका” यांची उजळणी करा. उपस्थित राहणे महत्त्वपूर्ण का आहे ते समजावून सांगा. (फेब्रुवारी १५, १९८५ चे टेहळणी बुरूज, (इंग्रजी) पृष्ठे १८-२० पाहा.) वृद्ध, अशक्‍त आणि नवोदितांना उपस्थित राहण्याकरता मदत मिळावी म्हणून योजनांची उजळणी करा. या येत्या आठवड्यात, विस्तारित क्षेत्र सेवेच्या कार्यहालचालींच्या योजनांची चर्चा करा. तसेच, “अनोळखी लोकांचे आदरातिथ्य केले जाते तेथे,” या सप्टेंबर २२, १९९५ च्या सावध राहा! (इंग्रजी) अंकातील पृष्ठ ३२ वरील लेखाची उजळणी करा.

१५ मि:“खास संमेलन दिवसाचा नवीन कार्यक्रम.” श्रोत्यांशी चर्चा करा. माहीत असल्यास, पुढील संमेलनाच्या तारखेची घोषणा करा. सर्वांना उपस्थित राहण्याचे आणि नवोदितांनी बाप्तिस्म्याकरता पात्र ठरण्यास प्रयत्न करण्याचे उत्तेजन द्या.

१५ मि:“तयारी—यशाची गुरुकिल्ली.” प्रश्‍नोत्तरे. आपण एप्रिल आणि मे दरम्यान टेहळणी बुरूज आणि सावध राहा! यांच्या वर्गण्या सादर करणार आहोत ते सांगा. अधिक प्रतींची मागणी करून, वर्गण्यांच्या पावत्या घेऊन आणि नियतकालिक दिवसाच्या कार्यहालचालीच्या मंडळीतील व्यवस्थांना पाठिंबा देण्याकरता योजना करून आताच तयारी करा.

गीत ७ (१०५) व समाप्तीची प्रार्थना.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा