खास संमेलन दिवसाचा नवीन कार्यक्रम
१ आपण ढिलाई न करता सुवार्तेची घोषणा का करावी? सुवार्तेचा प्रचारक असण्याच्या काय गरजा आहेत? लाजाळू किंवा बुजऱ्या व्यक्ती देखील इतरांना सुवार्तेचा प्रचार करण्यात सहभाग घेण्यामध्ये पुढाकार कसा घेऊ शकतात? या आणि इतर विचार-प्रवर्तक प्रश्नांची उत्तरे, या वर्षाच्या “सुवार्तेचे सेवक म्हणून पात्र ठरलेले” हा विषय असलेल्या खास संमेलन दिवसाच्या कार्यक्रमात देण्यात येतील.—पडताळा २ करिंथकर ३:५.
२ यहोवाचे लोक या नात्याने, आपण आपल्या वर्तनाबद्दल सावध असले पाहिजे. तरुण लोक प्रोत्साहनदायक अनुभव सांगतील व त्यांनी समवयस्कांच्या दबावाचा कसा प्रतिकार केला याविषयी ते बोलतील. आपल्या मुलांना देवाचे सेवक होण्यास प्रशिक्षण देण्याच्या गरजेविषयी पालकांना प्रेमळ उत्तेजन दिले जाईल. प्रचार करण्याच्या आवश्यकतेची आणि आपल्याला तसेच आपले ऐकणाऱ्यांना मिळणाऱ्या आशीर्वादांची समज प्राप्त करून घेण्यास आपणा सर्वांना मदत केली जाईल.—१ तीम. ४:१६.
३ निश्चितच, बाप्तिस्मा त्या दिवसाचे वैशिष्ट्य असेल. या घटनेआधी, विशेषपणे नवीन समर्पण केलेल्या व्यक्तींकरता एक बायबल आधारित भाषण दिले जाईल. अर्थात, बाप्तिस्म्याच्या विषयाची चर्चा करण्यात येईल आणि त्याचा अर्थ स्पष्ट केला जाईल तेव्हा उपस्थित असलेल्या सर्वांना काळजीपूर्वक लक्ष देण्यास आवडेल. खास संमेलन दिवशी बाप्तिस्मा घेण्याची इच्छा असलेल्यांनी पुष्कळ आधी अध्यक्षीय पर्यवेक्षकांना याविषयी सांगावे जेणेकरून बाप्तिस्म्याच्या उमेदवारांसोबत नेमलेल्या प्रश्नांची उजळणी घेण्यास वडिलांना नियुक्त करण्याकरता त्यांच्याकडे पुरेसा कालावधी असेल.
४ पाहुण्या वक्त्याकरवी देण्यात येणारे प्रमुख भाषण हे आणखी दुसरे वैशिष्ट्य असेल. त्याचे शीर्षक “देवाचे सेवक या नात्याने पात्र आणि सुसज्ज असलेले,” हे आहे. आपल्याला सेवक या नात्याने सुसज्ज करणाऱ्या चार मुख्य तरतुदींची चर्चा करण्यात येईल आणि त्या भाषणात विश्वास बळकट करणारे अनुभव असतील.
५ सबंध कार्यक्रमास उपस्थित राहण्याकरता आताच योजना करा. आस्थेवाईक व्यक्ती आणि बायबल विद्यार्थ्यांना खात्रीने आमंत्रण द्या जेणेकरून ते देखील या ईश्वरशासित शिक्षणाच्या दिवसाचा लाभ घेऊ शकतील. अशा तऱ्हेने, सुवार्तेचे सेवक या नात्याने आपल्याजवळ “अंगची पात्रता” असल्याची खात्री आपण करू शकतो.