१९९६ च्या ईश्वरशासित सेवा प्रशालेपासून लाभ मिळवा—भाग १
१ “सन १९९६ साठी ईश्वरशासित सेवा प्रशालेचा आराखडा” यात पुरवलेल्या सुचना तुम्ही वाचल्या का? काही बदल झाले आहेत याकडे तुम्ही लक्ष दिले का? इंग्रजी भाषेच्या आराखड्यात जानेवारी ते एप्रिलपर्यंत, नेमणूक क्र. ३ युक्तिवाद (इंग्रजी) (प्रादेशिक आराखड्यांमध्ये चर्चेसाठी पवित्र शास्त्रीय विषय) पुस्तकावर आधारलेली आहे, आणि मे ते डिसेंबरपर्यंत नवीन प्रकाशित झालेल्या ज्ञान पुस्तकावर आधारलेली आहे. इंग्रजी भाषेच्या आराखड्यात नेमणूक क्र. ४, प्रत्येक आठवडी एका वेगळ्या बायबलच्या पात्राविषयी दिली आहे, परंतु इतर भाषांमध्ये ही नेमणूक युक्तिवाद पुस्तकातून योजलेली आहे.
२ विद्यार्थ्यांच्या नेमणुका: नेमणूक क्र. ३ एका भगिनीला दिली आहे. जेव्हा ती नेमणूक विषय किंवा युक्तिवाद पुस्तकावर आधारलेली असेल, तेव्हा ते घरोघरच्या किंवा अनौपचारिक साक्षकार्याचे दृश्य असले पाहिजे. ज्ञान पुस्तकावर आधारलेली असताना, ती पुनर्भेट किंवा गृह बायबल अभ्यास या रूपात सादर केली जावी. हे अत्यंत मदतदायक ठरले पाहिजे, कारण ज्ञान पुस्तकाचा गृह बायबल अभ्यास चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग केला जाईल.
३ गृह बायबल अभ्यासाचे दृश्य असल्यास, दोन्ही बहिणी बसू शकतात. संक्षिप्त प्रास्ताविक विवेचने करून थेट अभ्यास चालू करा, आणि मग छापील प्रश्न विचारा. घरमालकाची भूमिका स्वाभाविकरित्या पार पडली पाहिजे. वेळ अनुमती देईल त्याप्रमाणे उल्लेखिलेली शास्त्रवचने काढून वाचली जाऊ शकतात. बहिणीने, प्रश्न विचारण्याद्वारे घरमालकाला स्वतःचे विचार व्यक्त करण्यास लावून व वापरलेल्या शास्त्रवचनांवर कारणमीमांसा करून शिकवण्याची कला उपयोगात आणली पाहिजे.
४ पाच मिनिटांत चर्चिले जाऊ शकतील त्यापेक्षा अधिक शास्त्रवचने युक्तिवाद किंवा ज्ञान पुस्तकांच्या नेमलेल्या भागांमध्ये उल्लेखिलेली असल्यास, काय केले जावे? मुख्य मुद्यांना ठळकपणे दाखवणारी मूलभूत शास्त्रवचने निवडा. शास्त्रवचने कमी असल्यास, धड्यातील प्रमुख मुद्दे अधिक विस्तारितपणे चर्चिले जाऊ शकतील. अधूनमधून, पुस्तकातून एखादा परिच्छेद किंवा वाक्य वाचून त्याची चर्चा घरमालकासोबत केली जाऊ शकते. विषय या पुस्तिकेतून भाषण तयार करत असताना, प्रत्येक मुद्यातून निदान एक तरी शास्त्रवचन उपयोगात आणणे उत्तम आहे.
५ ज्या प्रचारकाच्या नेमणुकीत अध्यायाचा शेवटला परिच्छेद असेल, तो ज्ञान पुस्तकाच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी आढळणाऱ्या “तुमच्या ज्ञानाचे परीक्षण करा” पेटीची उजळणी संक्षिप्त रूपात करू शकतो. वेळ अनुमती देईल त्यानुसार, नेमलेल्या परिच्छेदांमधील माहितीच्या पेटींची चर्चा देखील केली जाऊ शकेल. माहितीची पेटी दोन नेमणुकांच्या दरम्यान आल्यास, पहिली नेमणूक हाताळणारी बहीण तिचा विचार करू शकते. पुस्तकातील चित्रे, विचारात घेतल्या जाणाऱ्या साहित्याला लागू होतील त्या प्रत्येक वेळी त्यांवर विवेचन मांडता येईल.
६ नेमणूक क्र. ४ फार मनोरंजक व व्यावहारिक असली पाहिजे. तुमची मंडळी इंग्रजी भाषेचा आराखडा अनुसरत असल्यास, सूक्ष्मदृष्टी (इंग्रजी) खंड १ मध्ये, नेमलेल्या बायबलच्या पात्राविषयी काय सांगितले आहे त्याचा काळजीपूर्वक अभ्यास करा. विषयाला धरून भाषण तयार करा, आणि वास्तविक जीवनातील बायबलमधील पात्रावर व त्याच्या व्यक्तिमत्त्वावर ज्यामध्ये विशेष लक्षणे, गुण, किंवा प्रवृत्तीं ज्यांचे अनुकरण करावेसे किंवा त्यांचा धिक्कार करावासा आपल्याला वाटतो त्यांवर श्रोत्यांचे लक्ष आकर्षित करण्यास मदत करतील अशी बायबलची मुख्य शास्त्रवचने निवडा. बायबलमधील पात्राशी थेटपणे संबंधित नसलेली शास्त्रवचने, यहोवा विशिष्ट अशा चांगल्या वा वाईट गुणांकडे कोणत्या दृष्टीने पाहतो हे ठळकपणे दाखवून देण्यासाठी किंवा त्यांचा संबंध भाषणाच्या विषयाशी असल्यास समाविष्ट केली जाऊ शकतात. युक्तिवाद पुस्तकातून हे भाषण दिले जात असल्यास, क्षेत्रात उपयोग करावयाच्या व्यावहारिक मुद्यांवर जोर दिला जावा.
७ प्रशालेत पुरवल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाचा आपण पुरेपूर फायदा घेतला, तर आपण ‘शिक्षणाची कला’ प्रदर्शित केली जाईल अशा पद्धतीने “वचनाची घोषणा” करण्यासाठी चांगल्या स्थितीत असू.—२ तीम. ४:२.