जानेवारीसाठी सेवा सभा
जानेवारी १ ने सुरू होणारा सप्ताह
गीत १३३ (६८)
७ मि:स्थानिक घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा.
१३ मि:“सूक्ष्मदृष्टीने प्रचार करा.” मुख्य मुद्यांची चर्चा करा आणि एक किंवा दोन सादरतांचे प्रात्यक्षिक दाखवा. सध्या कोणत्या जुन्या पुस्तकांचा साठा आहे ते मंडळीला कळवा.
१० मि:”संगणक तंत्रज्ञानाविषयी समतोल दृष्टिकोन बाळगणे.” पुरवणीचा लेख. प्रश्नोत्तरे. स्थानिकरित्या अवलंब करा. संगणकावर किंवा इतर प्रकारे, आपली स्वतःची भाषणे व सभांमधील भाग इतरांकडून तयार करून न घेण्याबद्दल सावध असावे याकडे लक्ष वेधवा. मंडळीचे अहवाल तुमच्या मंडळीत कागदोपत्री असले, तरी गुप्त ठेवण्याच्या गरजेवर जोर द्या. मंडळीच्या कार्यासाठी संस्थेने पुरवलेले फॉर्म वापरण्याच्या सूचनेवर जोर द्या, आणि संस्थेने पुरवलेल्या छापील फॉर्मच्या ऐवजी स्वतःहून बनवलेले फॉर्म वापरणे अयोग्य आहे हे सांगा.
१५ मि:स्थानिक गरजा. (किंवा ऑक्टोबर १, १९९५, चे टेहळणी बुरूज पृष्ठे २५-८ वर आधारित “तुमच्या निकडीच्या भावनेस जपून ठेवा” भाषण.)
गीत २८ (५) व समाप्तीची प्रार्थना.
जानेवारी ८ ने सुरू होणारा सप्ताह
गीत १३८ (७१)
१० मि:स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल. सुवार्तेचा प्रचार करण्याबाबत स्थानिक आणि जागतिक कार्याला आर्थिक पाठिंबा देण्याबाबत उचित शाबासकी द्या.
१५ मि:आगाऊ वैद्यकीय अधिकृत सूचना/जबाबदारीतून मुक्तता कार्डाचे संरक्षक मूल्य. आगाऊ वैद्यकीय अधिकृत सूचना/जबाबदारीतून मुक्तता कार्ड प्रत्येकाने नीट भरून सतत त्यांच्याजवळ बाळगण्याच्या व मुलांनी त्यांचे ओळखपत्र जवळ ठेवण्याच्या महत्त्वाबद्दल वडील मंडळीशी चर्चा करतात. कार्डाचे शीर्षक सुचवते त्याप्रमाणे, वैद्यकीय निगेसाठी कशाची गरज आहे (किंवा गरज नाही) याबद्दल ते आगाऊ सूचना देते. प्रत्येक वर्षी हे का केले जाते? एखादे चालू कार्ड, अद्ययावत नसलेले किंवा आता एखाद्याचे निश्चित मत न दाखवणारे असे समजले जाण्याची शक्यता असलेल्या कार्डापेक्षा अधिक खात्री पटवणारे असते. तुम्ही स्वतःच्या वतीने बोलण्यास असमर्थ असल्यास, हे दस्तऐवज तुमच्याकरता बोलेल. कार्ड आज सायंकाळी देण्यात येतील. त्यांना काळजीपूर्वक भरले पाहिजे, पण त्यांच्यावर स्वाक्षरी केली जाऊ नये. मागील दोन वर्षांमध्ये करण्यात आले आहे त्याप्रमाणे स्वाक्षरी घेणे व तुमची सही देणे पुस्तक अभ्यास चालकांच्या देखरेखीखाली मंडळीच्या पुस्तक अभ्यासांच्या ठिकाणी केले जाईल. जे साक्षीदार म्हणून सही करतात त्यांनी कार्डधारकाला दस्तऐवजावर सही करताना प्रत्यक्षात पाहिले पाहिजे. जानेवारी १५ च्या आठवड्यात हे पुस्तक अभ्यासानंतर केले जाईल. (या पद्धतीबद्दल अधिक तपशीलासाठी जानेवारी १९९४ ची आमची राज्य सेवा, पृष्ठ २ पाहा. तसेच ऑक्टोबर १५, १९९१ चे पत्र देखील पाहा.) सर्व बाप्तिस्मा घेतलेले प्रचारक, आगाऊ वैद्यकीय अधिकृत सूचना/जबाबदारीतून मुक्तता कार्ड भरू शकतात. बाप्तिस्मा न घेतलेल्या प्रचारकांना स्वतःच्या परिस्थिती व निश्चित मतांनुसार या कार्डातील भाषेला अनुसरून स्वतःचे अधिकृत सूचना कार्ड लिहावेसे वाटेल. पालक आपल्या मुलांना ओळखपत्र भरून काढण्यास मदत करू शकतात.
२० मि:”आचरण करणारे असा—केवळ ऐकणारे असू नका.” प्रश्नोत्तरे. वेळ अनुमती देईल त्याप्रमाणे, सूक्ष्मदृष्टी पुस्तक खंड २, पृष्ठ ५२१, परिच्छेद १ आणि २ वर आधारित आज्ञाधारकतेच्या महत्त्वाची चर्चा करा.
गीत ७० (३९) व समाप्तीची प्रार्थना.
जानेवारी १५ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ७७ (४१)
१२ मि:स्थानिक घोषणा. घरी नसलेले, या वाढत्या समस्येविषयी संक्षिप्त चर्चा करा. जवळून जाणाऱ्या, पदपथावर उभे असलेल्या किंवा कारमध्ये बसलेल्या व्यक्तींजवळ जाण्याचा पुढाकार घेऊन वेळ भरून काढण्यास प्रचारकांना उत्तेजन द्या.
१८ मि:“काहींना वाचवण्यासाठी पुन्हा भेट द्या.” सुचवलेल्या सादरतांची उजळणी करा. तुम्ही नंदनवनात पृथ्वीवर अनंतकाल जगू शकाल या पुस्तकातून अभ्यास सुरू करण्याच्या ध्येयाची शिफारस करा.
१५ मि:“आपल्या नियतकालिकांचा सर्वोत्तम उपयोग करा.” पुरवणीच्या १ ते १३ वरील परिच्छेदांवर आधारित सेवा पर्यवेक्षकांचे प्रोत्साहक भाषण.
गीत १५६ (११८) व समाप्तीची प्रार्थना.
जानेवारी २२ ने सुरू होणारा सप्ताह
गीत २०० (१०८)
१० मि:स्थानिक घोषणा.
१८ मि:“१९९६ च्या ईश्वरशासित सेवा प्रशालेपासून लाभ मिळवणे—भाग १.” प्रशाला पर्यवेक्षकांचे भाषण. ऑक्टोबर १९९५ ची आमची राज्य सेवा यात छापलेल्या ईश्वरशासित सेवा प्रशाला सूचना यातील विद्यार्थ्यांच्या नेमणुकींसाठी पुरवलेल्या मार्गदर्शनांची उजळणी करा.
१७ मि:“आपल्या नियतकालिकांचा सर्वोत्तम उपयोग करा.” पुरवणीतील १४ ते १७ परिच्छेदांची श्रोत्यांशी चर्चा करा. नेहमी टेहळणी बुरूज आणि सावध राहा! यांचे वितरण करण्यासाठी खास प्रयत्न करण्यावर जोर द्या. ही नियतकालिके विविध भाषांमध्ये प्रकाशित झालेली असल्यामुळे, आपण अनेक भाषांची—निदान आपल्या क्षेत्रात नियमितपणे बोलल्या जात असलेल्या भाषांची नियतकालिके जवळ ठेवतो. आपल्या नियतकालिकांचे वितरण करणे हे आस्था निर्माण करण्याचे सर्वात प्रभावशाली माध्यम ठरू शकते, कारण ती नियतकालिके संक्षिप्त, नवीन माहिती पुरवतात. आस्था दाखवली जाते तेथे, त्याची नक्की नोंद करून पुनर्भेट करा. नियतकालिक मार्ग सुरू करण्याचा प्रयत्न करा. परिच्छेद १४ मध्ये वर्णिल्याप्रमाणे कौटुंबिक गटाला सराव सत्राचे प्रात्यक्षिक दाखवण्यास सांगा. वाटप वाढवण्यासाठी काही व्यावहारिक सूचनाही दाखवा.
गीत ९२ (५१) व समाप्तीची प्रार्थना.
जानेवारी २९ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ३१ (६६)
७ मि:स्थानिक घोषणा.
१८ मि:“धैर्याने बोला.” वडिलांनी भाषण आणि चर्चेची हाताळणी करावी. रविवारच्या स्थानीय व्यवस्थांबद्दल उजळणी करा. चांगला पाठिंबा दिल्याबद्दल प्रशंसा करा, आणि सुधारणुकीची आवश्यकता आहे तेथे सूचना सादर करा.
२० मि:फेब्रुवारी दरम्यान अनंतकाल जगू शकाल पुस्तक सादर करा. प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना बायबलची मूलभूत सत्ये शिकवण्यात हे पुस्तक एक शक्तिशाली साधन सिद्ध झाले आहे याची आठवण श्रोत्यांना करून द्या. हे पुस्तक सादर करण्याबाबत, आमची राज्य सेवा हिच्या फेब्रुवारी व सप्टेंबर १९९५ या दोन्ही अंकांमधील पृष्ठ ४ वरील सुचनांची उजळणी करा. प्रचारकांना कौटुंबिक जीवन पुस्तक देखील नेहमी त्यांच्यासोबत ठेवण्यास उत्तेजन द्या कारण हे एक व्यावहारिक प्रकाशन आहे आणि सादर करण्यास सोपे आहे. अनंतकाल जगू शकाल पुस्तकाचे आणि कौटुंबिक जीवन पुस्तकाचे एखादे प्रात्यक्षिक दाखवा. या सप्ताहांती सर्वांना क्षेत्रात वापरण्यासाठी अनंतकाल जगू शकाल व कौटुंबिक जीवन पुस्तकाच्या प्रती घेऊन जाण्यास आठवण करून द्या.
गीत १४३ (७६) व समाप्तीची प्रार्थना.