प्रात्येक शास्त्रलेख सद्बोधाकरिता उपयोगी आहे
१ बायबलच्या मूल्याबद्दल अनेक व विविध मते आहेत. तथापि, मानवजातीला गोंधळविणाऱ्या समस्या तसेच जीवनातील आपल्या व्यक्तिगत मार्गाक्रमणासाठी विश्वासनीय मार्गदर्शन बायबलच्या पृष्ठांवर आहे याची आपल्याला खात्री झाली आहे. (नीति. ३:५, ६) त्याच्या सल्ल्याची सुज्ञता अतुलनीय आहे. त्याचे समर्थित नैतिक दर्जे अपूर्व आहेत. त्याचा संदेश शक्तिशाली आहे, ते ‘मनातील विचार आणि हेतू ह्यांचे परीक्षण’ करू शकते. (इत्त्वी ४:१२) त्याकडे बारकाईने लक्ष देण्याची आवश्यकता आहे हे जाणण्यात आपण इतरांची मदत कशी करू शकतो? नोव्हेंबर दरम्यान, बायबल—देवाचे वचन की मानवाचे? (इंग्रजी) या पुस्तकासह नवीन जग भाषांतर (इंग्रजी) किंवा १९२-पृष्ठांचे एखादे जुने पुस्तक सादर करताना पुढील सल्ल्यांचा उपयोग करावा असे कदाचित तुम्हाला वाटेल.
२ अनेक लोकांना त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याविषयी चिंता असल्यामुळे, कदाचित या प्रास्तुतीने त्यांचे लक्ष वेधले जाईल:
▪ “मी ज्यांच्याशी बोलतो असे अनेक लोक आजकाल त्यांच्या आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्याविषयी चिंताग्रस्त आहेत. अनेकजण भौतिक वस्तूंचा पिच्छा करण्यात गुरफटलेले असतात, आणि यामुळे तणाव निर्माण होतो. अशा बाबींबद्दल कोठून सल्ला प्राप्त करणे सर्वात उत्तम आहे? [प्रातिसादासाठी वाव द्या.] मला असे आढळले आहे की, बायबल आपल्याला व्यावहारिक ज्ञान पुरवते जे आपल्याला अनावश्यक समस्या टाळण्यास मदत करू शकते. मी तुम्हाला एक उदाहरण देतो.” बायबल—देवाचे वचन की मानवाचे? या पुस्तकातील पृष्ठ १६३ काढा व परिच्छेद ३ मध्ये दिलेले १ तीमथ्य ६:९, १० वाचा. परिच्छेद ४ वर आणखी विवेचने मांडा व त्यानंतर ते पुस्तक सादर करा.
३ “बायबल—देवाचे वचन की मानवाचे?” हे पुस्तक किंवा १९२-पृष्ठांचे एखादे जुने पुस्तक सादर करताना तुम्ही विचारात घेऊ शकता अशी सूचना येथे आहे:
▪ “आपण वृत्तपत्र वाचतो किंवा बातम्या ऐकतो त्या प्रात्येक वेळी आपल्याला चिंताग्रस्त करणाऱ्या आणखी एका दुःखमय समस्येविषयी ऐकायला मिळते. [अलीकडेच बातम्यांमध्ये वृत्त दिलेल्या एखाद्या अस्वस्थ करणाऱ्या घटनेचा उल्लेख करा.] अशा समस्यांना आपण तोंड कसे देऊ शकतो? [प्रातिसादासाठी वाव द्या.] बायबलमध्ये सर्वात अभूतपूर्व महान संदेश आहे आणि ‘त्याच्या पानांवर मानवाला माहीत असलेल्या सर्व समस्यांची उत्तरे आहेत,’ असे एका प्रासिद्ध व्यक्तीने म्हटले. तिने जे म्हटले त्यावरून बायबल स्वतः सांगत असलेली गोष्ट लक्षात येते. [२ तीमथ्य ३:१६, १७ वाचा.] आपण बायबलबद्दल खात्री का बाळगू शकतो हे मी तुम्हाला दाखवू इच्छितो.” तुम्ही पवित्र शास्त्रावर भाव का ठेवू शकता या पत्रिकेतील काही ठळक मुद्दे दाखवा आणि एखाद्या विशिष्ट विषयावर बायबलची शिकवण देणाऱ्या १९२ पृष्ठांच्या पुस्तकांपैकी कोणतेही एक सादर करा. या आधुनिक जगातही, बायबलचा सल्ला व्यावहारिक आहे हे किती उल्लेखनीय आहे याची चर्चा करण्यासाठी तुम्ही नंतर पुन्हा याल असे सुचवा.
४ तुमच्या क्षेत्रात धर्म न मानणारे लोक असल्यास, तुम्ही ही प्रास्तावना वापरून पाहू शकता:
▪ “आज अनेक लोक, पवित्र पुस्तके परस्परविरोधी व केवळ भाकड कथाच असल्याचा दृष्टिकोन बाळगतात. धर्माच्या नावाखाली इतक्या वाईट गोष्टी केल्याचे त्यांनी पाहिल्यामुळे धर्मपुढाऱ्यांवरील त्यांचा विश्वास उडाला आहे. खरे म्हणजे, देवाने आपल्याला काही मार्गदर्शन दिले आहे का असा विचार अधिकाधिक लोक करत आहेत. तुमचे मत काय आहे?” उत्तरासाठी वाव द्या. घरमालकाच्या प्रातिसादानुसार, तुमच्याजवळील १९२ पृष्ठांच्या एखाद्या जुन्या पुस्तकातील असा भाग काढा जो घरमालकाचा आक्षेप किंवा मत याविषयी हाताळणी करतो आणि एक किंवा दोन मुद्यांची चर्चा करा. उदाहरणार्थ, तुम्हाला आनंदी बनवील अशी सुवार्ता या पुस्तकातील १२ व्या अध्यायाचा उपयोग करण्याचा तुमच्यासमोर कदाचित प्रासंग असेल.
५ ज्यांना शिकून घेण्याची इच्छा आहे त्या सर्वांना आपल्या महान शिक्षकाच्या इच्छेचे ज्ञान मिळवता येऊ शकेल याची त्याने खात्री केली आहे. इतरांना साहाय्य करायचे असल्यास, सर्वात उत्तम गोष्ट म्हणजे, त्यांना बायबलच्या खऱ्या मूल्याबद्दल गुणग्राहकता बाळगण्यास मदत करणे होय; यामुळे त्यांचे जीवन वाचू शकते.—नीति. १:३२, ३३.