तुम्ही तुमच्या मुलांकरता कोणती ध्येये राखली आहेत?
१ यथायोग्य ध्येये राखणे व त्यांना साध्य करणे यावर जीवनातील यश अवलंबून असते. जे क्षुल्लक किंवा अवास्तव ध्येयांचा पिच्छा पुरवतात त्यांची निराशा होते व ते असमाधानी असतात. “खरे जीवन बळकट धरण्यास” कोणत्या गोष्टींचा पिच्छा करावा हे समजण्यास सुज्ञतेची गरज आहे. (१ तीम. ६:१९) यहोवा त्याच्या वचनाद्वारे व संघटनेद्वारे नक्की कोणत्या मार्गाने जावे ते दाखवतो त्याबद्दल आपण त्याचे किती आभारी आहोत!—यश. ३०:२१.
२ असे प्रोमळ मार्गदर्शन पुरवण्यात, यहोवा पालकांसाठी एक उत्तम उदाहरण मांडतो. आपल्या अननुभवी मुलांसाठी कोणता मार्ग उत्तम आहे हे निवडण्याची मुभा देण्याऐवजी त्यांनी ज्या मार्गाने गेले पाहिजे त्यासाठी सुज्ञ पालक त्यांना प्राशिक्षित करतात म्हणजे ते वृद्ध झाल्यावर, ‘त्यापासून परावृत्त होणार नाहीत.’ (नीति. २२:६) ख्रिस्ती पालकांना त्यांच्या अनुभवाने ठाऊक आहे की, ते स्वतःच्या निर्णयावर भरवसा ठेवू शकत नाहीत; त्यांनी यहोवावरच विसंबून राहिले पाहिजे. (नीति. ३:५, ६) ज्ञान व अनुभव यांत मर्यादित असणाऱ्या मुलांकरता ही अधिक मोठी गरज आहे.
३ ‘अधिक महत्त्वपूर्ण गोष्टींवर’ लक्ष केंद्रित करण्यात मदत व्हावी म्हणून पालकांनी आपल्या मुलांसमोर यथायोग्य ध्येये राखली पाहिजेत. (फिलिप्पै. १:१०, NW) ते कौटुंबिक अभ्यासाने त्याची सुरवात करू शकतात व मुलांना त्याचे महत्त्व जाणण्यास व त्यापासून शिकण्यास उत्तेजन देऊ शकतात. मंडळीच्या सभांकरता आगाऊ अभ्यास करण्याची व स्वतःच्या शब्दात विवेचने देण्याकरता तयारी करण्याची सवय लावून घेणे मुलांकरता चांगले आहे. प्राचार कार्यात नियमित सहभाग महत्त्वपूर्ण आहे. पत्रिका सादर करून, शास्त्रवचने वाचून किंवा नियतकालिके सादर करून लहान मुले हातभार लावू शकतात. त्यांना वाचता येते, तेव्हा ईश्वारशासित सेवा प्राशालेत त्यांची नावे नोंदवल्याने त्यांची आध्यात्मिक प्रागती वेगाने होऊ शकते. बाप्तिस्मा न घेतलेला प्राचारक बनण्यास पात्र ठरणे किंवा बाप्तिस्म्यासाठी स्वीकारले जाणे हे प्रागतीपथावरील मोठे पाऊल आहे.
४ पालकांनी त्यांची मुले किशोरवयीन होतात तेव्हा किंवा त्याहूनही लवकर करियरच्या ध्येयांविषयी त्यांच्याशी बोलणी केली पाहिजे. शाळेतील सल्लागार व वर्गसोबती त्यांच्या जगिक, भौतिक ध्येयांकरता मुलांना सहजगत्या प्राभावीत करू शकतात. पालकांनी आपल्या मुलांना राज्य आस्थांचा त्याग न करता त्यांच्या भौतिक गरजांची काळजी घेण्यास सुसज्ज करणारे व्यावहारिक प्राशिक्षण पुरवणारे शाळेतील कोर्सेस निवडण्यामध्ये त्यांची मदत केली पाहिजे. (१ तीम. ६:६-१०) त्यांना सडेपणाचे “दान” मिळवण्याचा प्रायत्न करण्यास उत्तेजन दिले पाहिजे आणि मग काही कालांतराने, त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतल्यास विवाहाच्या कठीण जबाबदाऱ्या स्वीकारण्यास त्यांना शक्य होईल. (मत्त. १९:१०, ११; १ करिंथ. ७:३६-३८) पायनियरींग, अधिक गरज आहे तेथे सेवा करणे, बेथेल सेवा किंवा मिशनरी कार्य याविषयी सकारात्मक पद्धतीने बोलल्याने कोवळ्या वयात देखील यहोवाला संतुष्ट करणाऱ्या, इतरांना लाभदायक ठरणाऱ्या व स्वतःला आशीर्वादित केल्या जाणाऱ्या पद्धतीने आपल्या जीवनाचा उपयोग करण्याचे मुलांच्या मनावर बिंबवले जाऊ शकते.
५ उच्च ख्रिस्ती दर्जे अनुसरणारे व ईश्वारशासित ध्येयांचा पिच्छा पुरविणारे पुष्कळ तरुण आज संघटनेमध्ये आहेत हा काही योगायोग नाही. त्यांच्या पुष्कळशा यशाचे श्रेय त्यांच्या प्रोमळ पालकांना दिले जाऊ शकते. तुम्ही पालक असल्यास, तुमची मुले कोठे जात आहेत? राज्य आस्थांवर केंद्रित असणाऱ्या जीवनाकडे ते प्रागतीशीलपणे पुढे सरसावत आहेत का? लक्षात ठेवा, सर्व महत्त्वपूर्ण गोष्टींपैकी, तुमच्या मुलांमध्ये सत्य बिंबवणे व त्याविषयी दररोज बोलणे ही एक गोष्ट तुम्ही करू शकता. यहोवाची सेवा करण्यात विश्वासू असणाऱ्या घराण्याने तुम्हाला कदाचित आशीर्वादित केले जाईल.—अनु. ६:६, ७; यहो. २४:१५.