वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/९५ पृ. १
  • यहोवाकडून पारखले जाणे—का लाभदायक?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाकडून पारखले जाणे—का लाभदायक?
  • आमची राज्य सेवा—१९९५
  • मिळती जुळती माहिती
  • आपल्या विश्‍वास व आध्यात्मिक आरोग्य राखून ठेवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • आरोग्याची निगा राखा, पण बायबलमधील तत्त्वांच्या चाकोरीत राहून
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • आध्यात्मिकरीत्या तुम्ही योग्य प्रकारे सेवन करता का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • तुम्ही आध्यात्मिक हार्ट अटॅक टाळू शकता
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९५
km ९/९५ पृ. १

यहोवाकडून पारखले जाणे—का लाभदायक?

१ सर्वांना चांगली प्राकृती हवी असते. ती जीवनास अधिक आनंददायी बनवते. तरीसुद्धा, चांगली प्राकृती असणारे लोक देखील अधूनमधून तपासणी करून घेतात. का बरे? आरोग्याच्या काही समस्या निर्माण होत आहेत का हे शोधून काढण्याचा ते प्रायत्न करतात जेणेकरून त्यावर उपाय करण्यासाठी पावले उचलली जाऊ शकतात. आपली आध्यात्मिक प्राकृती सांभाळणे ह्‍याहुनही अधिक महत्त्वाचे आहे. ‘विश्‍वासात खंबीर होण्यावर’ यहोवाची मान्यता अवलंबून आहे.—तीत १:१४.

२ यहोवाकडून पारखले जाण्याची आता उचित वेळ आहे. असे का? कारण यहोवा त्याच्या पवित्र मंदिरात आहे आणि तो सर्व मनुष्यांची अंतःकरणे पारखत आहे. (स्तोत्र ११:४, ५; नीति. १७:३) दावीदाप्रामाणे, आपण यहोवाकडे आपली कसून पारख करण्याची विनंती करतो: “हे यहोवा, मला पारख व माझा पडताळा पाहा; माझे अंतर्याम व माझे हृदय गाळून पाहा.”—स्तोत्र २६:२, पं. र. भाषांतर.

३ अपरिपूर्ण शरीरामुळे स्वतःकडून निर्माण होणाऱ्‍या अपायांपासून आपल्या आध्यात्मिक प्राकृतीचे रक्षण आपण केले पाहिजे. नीतिसूत्रे ४:२३ सल्ला देते: “सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे.”

४ सभोवतालच्या भ्रष्ट, अनैतिक जगापासूनही आपल्या आध्यात्मिक प्राकृतीला धोका संभावू शकतो. या दुष्ट व्यवस्थीकरणाच्या अधिकच जवळ जाण्याचा प्रायत्न केला, तर आपण त्याप्रामाणेच विचार व जगिक मनोवृत्ती विकसित करू लागू. किंवा आपण जगिक जीवन-शैली स्वीकारू व जगाच्या आत्म्याने भारावले जाऊ.—इफिस. २:२, ३.

५ आध्यात्मिकरित्या आपला नाश करण्याच्या प्रायत्नासाठी सैतान छळ किंवा थेट विरोधाचा उपयोग करील. तथापि, पुष्कळवेळा आपल्याला फुसलावण्याकरता तो जगिक आकर्षणांचा धूर्तपणे उपयोग करतो. पेत्र आपणाला ‘सावध व जागे राहण्यास’ आर्जवत आहे कारण सैतान “गर्जणाऱ्‍या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधीत फिरतो.” आपल्याला ‘त्याच्याविरुद्ध विश्‍वासात दृढ उभे राहण्यास’ आर्जवले आहे.—१ पेत्र ५:८, ९.

६ आपला विश्‍वास दृढ राखण्याद्वारे व दर दिवशी त्यास बळकट करण्याकरवी आपल्या आध्यात्मिक प्राकृतीचे रक्षण करण्याची गरज आहे. आपल्या विश्‍वासाची नित्य पारख करत राहण्याचा सल्ला प्रोषित पौल देतो. कार्यक्षम डॉक्टराने आपल्याला दिलेला व्यावहारिक सल्ला आपण सुज्ञतेने ऐकतो त्याचप्रामाणे यहोवाची आध्यात्मिक तपासणी, आपल्यामध्ये सुधारण्याजोगी समस्या प्राकट करते तेव्हा आपण त्याचे देखील ऐकतो. हे आपल्याला ‘पूर्ण’ होण्यास शक्य करते.—२ करिंथ. १३:५, ११.

७ यहोवा खरोखर थोर पारखी आहे. त्याचे रोगनिदान नेहमीच अचूक असते. आपल्याला काय हवे अगदी तेच त्याला माहीत असते. त्याच्या वचनाकरवी आणि ‘विश्‍वासू दासाकरवी’ तो एक आरोग्यदायक आध्यात्मिक आहार नेमून देतो. (मत्त. २४:४५; १ तीम. ४:६) घरी व मंडळ्यांच्या सभांमध्ये हा पोषक आध्यात्मिक आहार घेतल्याने आपल्याला आध्यात्मिकरित्या निरोगी राहण्यास मदत मिळते. सेवेमध्ये व इतर ख्रिस्ती कार्यहालचालीमध्ये नियमित आध्यात्मिक व्यायाम करणे देखील लाभदायक आहे. यास्तव, आपण यहोवाकडून नियमितरित्या पारखले जाण्याचे स्वीकारतो व तो आपल्याला उत्तम आध्यात्मिक प्राकृती देईल असा आत्मविश्‍वास आपण राखू शकतो.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा