कौटुंबिक बायबल अभ्यास —ख्रिश्चनांकरता प्राधान्य
कौटुंबिक गट सर्व मानवी संस्थांमध्ये सर्वात जुना आहे. तो यहोवाच्या नजरेत मौल्यवान आहे, कारण त्याच्यामुळे “आकाशातल्या व पृथ्वीवरल्या प्रात्येक कुटुंबाला नाव मिळाले आहे.” (इफिस. ३:१५, पं. र. भाषांतर) एका पुरुषाचा व स्त्रीचा विवाह होतो तेव्हा कुटुंब अस्तित्वात येते. मुले यहोवाकडील धन आहेत. (उत्प. २:२४; स्तोत्र १२७:३) म्हणून, कुटुंबाची आध्यात्मिकता प्रामुख विचाराधीन गोष्ट आहे. ख्रिस्ती विश्वासातील कुटुंबाच्या सदस्यांना, खासकरून किशोरवयीनांना गंभीर समस्या उद्भवतात तेव्हा, त्या घरात कौटुंबिक बायबल अभ्यास चालवला जात नव्हता असे पुष्कळदा आढळते. हे सांगण्यास दुःख होते, परंतु अनेक कुटुंबांमध्ये, वडील व सेवा सेवकांच्या कुटुंबांमध्ये देखील असे दिसून येत आहे की, जगिक प्राभाव शाळकरी मुलांवर मात करत आहेत. घरामध्ये दिल्या जाणाऱ्या बायबलच्या सूचनेकडे दुर्लक्ष करणे हे नेहमीच या समस्येचे मूळ असते.
२ कुटुंबांनी देवाच्या वचनातील मार्गदर्शनाला अनुसरायचे आहे, तर कौटुंबिक अभ्यासासाठी नियमितपणे वेळ बाजूला राखलाच पाहिजे. कुटुंब प्रामुखांनी नियमितपणे कौटुंबिक अभ्यास चालवण्याकरता परिश्रमपूर्वक प्रायत्न करत राहण्याची गरज आहे, तसेच कुटुंबाच्या इतर सदस्यांनी कौटुंबिक उपासनेचा हा पैलू यशस्वी करण्याकरता अशाच प्राकारे मदत करावी जेणेकरून संपूर्ण घराण्याला त्याचा लाभ होईल. सर्वांनी आता घराण्याच्या आध्यात्मिक गरजांकडे योग्य लक्ष दिले नाही, तर पुढे जाऊन त्यांना गंभीर तसेच दुःखदायक समस्यांना देखील तोंड द्यावे लागण्याची अधिक शक्यता आहे हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे.
३ एखादा अभ्यास कसा चालवावा? कशाचा अभ्यास केला जावा? तो कधी घेण्यात यावा व त्याचा अवधी किती असावा? मुलाच्या अंतःकरणाप्रात पोहंचण्याची खात्री तुम्हाला कशी बाळगता येते? या प्राश्नांच्या उत्तरांसाठी कृपया ऑक्टोबर १, १९९४, चे टेहळणी बुरूज पृष्ठ २६ पाहा.
४ कौटुंबिक अभ्यास नियमितपणे घेतला पाहिजे व कुटुंबाच्या गरजांप्रामाणे तो तयार केला जावा. दैनिक वचनाला विचारात घेण्याबाबत देखील हे खरे असले पाहिजे. देवाच्या वचनाच्या चर्चेने दिवसाची सुरवात करणे किती उत्तम गोष्ट आहे! संपूर्ण दिवसभर त्यावर मनन केल्याने, आपल्याला ‘शुद्ध, प्राशंसनीय व श्रवणीय गोष्टींचा विचार करत राहण्यास’ मदत मिळेल. (फिलिप्पै. ४:८) दैनिक वचनावरील चर्चा व तुमचा कौटुंबिक अभ्यास नियमित आहे का? यामध्ये सुधारणा करण्याची गरज तुम्हास आढळून येते का?
५ यशस्वी कौटुंबिक अभ्यासाचे अत्यावश्यक घटक म्हणजे पालकांनी प्रादर्शित केलेला आनंद व उत्साह होय. (पडताळा स्तोत्र ४०:८) मुलांनी परिश्रम घेतल्याबद्दल पालकांनी त्यांची प्राशंसा देखील केली पाहिजे व यहोवाची तत्त्वे लागू करण्यास त्यांना उत्तेजन दिले पाहिजे.
६ कुटुंबाच्या ऐक्यतेविरुद्ध व यहोवाप्राती एका व्यक्तीच्या निष्ठेविरुद्ध इतके घटक असल्यामुळे कुटुंबाच्या प्रामुखाने अभ्यास चालवण्यात पुढाकार घेणे आवश्यक आहे. आध्यात्मिक विषयांची चर्चा, भोजनाच्या वेळेसारख्या अनौपचारिक प्रासंगी केली जाऊ शकत असली, तरी कौटुंबिक यश व आध्यात्मिक वाढीकरता पूर्वनियोजित कौटुंबिक बायबलच्या चर्चा आवश्यक आहेत.—अनु. ६:६-९.
७ पालकांनी मुलांच्या आध्यात्मिक गरजांकडे सतत लक्ष पुरवले, तर आता तसेच भवितव्यात पुष्कळ आशीर्वाद उपभोगले जाऊ शकतात. मुले देवाच्या नियमाचे मूल्य जाणतात व ते खरोखर चांगले व लाभदायक असल्याची खात्री त्यांना पटल्यावर केवळ नित्यक्रमानुसार सभांना उपस्थित राहणे व तुमच्यासोबत सेवेत भाग घेण्याऐवजी ते सत्य आपलेसे करून घेतील. तसेच त्यांनी सत्य आपलेसे करून घेतले नाही तर ते सैतानाच्या कुयुक्त्यांना बळी पडतील अशी साधारणतः शक्यता आहे. म्हणून, पालकहो, तुमच्या कौटुंबिक अभ्यासाला योग्य ते महत्त्वपूर्ण स्थान आनंदाने द्या.