घोषणा
▪ साहित्य सादरता
मार्च: सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान पुस्तक १५.०० रुपयांच्या अनुदानात. हे मंडळीत अद्याप उपलब्ध नसल्यास, तुम्ही नंदनवनात पृथ्वीवर अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक २५.०० रुपयांच्या अनुदानात (मोठ्या आकाराचे ४५.०० रुपयांना).
एप्रिल आणि मे: टेहळणी बुरूज आणि सावध राहा! (इंग्रजी) यांच्या वर्गण्या. पाक्षिक आवृत्तींची एक वर्षाची वर्गणी ९०.०० रुपये आहे. मासिक आवृत्तींची एक वर्षाची वर्गणी आणि पाक्षिक आवृत्तींची सहा महिन्यांची वर्गणी ४५.०० रुपये आहे. मासिक आवृत्तींसाठी सहा महिन्यांची वर्गणी नाही. वर्गणी नाकारल्यास, नियतकालिकांच्या किरकोळ प्रती प्रत्येकी ४.०० रुपयांच्या अनुदानात सादर केल्या जाव्यात किंवा उचित ठिकाणी, कौटुंबिक जीवन पुस्तकही सादर केले जाऊ शकते.
जून: सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान हे पुस्तक १५.०० रुपयांच्या अनुदानात. पर्याय म्हणून, तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक २५.०० रुपयांच्या अनुदानात सादर केले जाऊ शकते (मोठ्या आकाराचे ४५.०० रुपयांना). उचित असेल तेथे किंवा यांपैकीच्या कोणत्याही एका पुस्तकासोबत कौटुंबिक जीवन पुस्तक सादर केले जाऊ शकते.
▪ जानेवारी १९९६ ची आमची राज्य सेवा यात घोषित केल्यानुसार या वर्षी स्मारक विधीच्या हंगामाचे खास जाहीर भाषण रविवार, एप्रिल २१ रोजी बहुतेक सर्व मंडळ्यांमध्ये सादर केले जाईल. भाषणाचा विषय “एका कुटिल व विपरीत पिढीत निर्दोष राहणे” असा आहे. एप्रिल २ रोजी जे लोक स्मारक विधीला उपस्थित राहतात त्यांना आमंत्रण देण्याचा खास प्रयत्न केला पाहिजे.
▪ एप्रिल २९, १९९६ पासून सुरवात होऊन सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान हे पुस्तक मंडळीच्या पुस्तक अभ्यासात अभ्यासले जाईल. हे लक्षात ठेवून, मंडळ्यांनी स्थानिकरित्या बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये त्या पुस्तकाचा पुरेसा साठा बाळगला पाहिजे.
▪ मार्च १, १९९६ पासून जारी असणाऱ्या विशिष्ट साहित्याच्या नवीन किमतींकडे कृपया लक्ष द्या:
पायनियर मंडळी व जनता
डिलक्स बायबल क्र. १२ (संदर्भ) रु.१५०.०० रु.२३०.००
डिलक्स बायबल लहान आकाराचे रु.१५०.०० रु.२३०.००
शास्त्रवचनावरील सूक्ष्मदृष्टी रु.४००.०० रु.४७०.००
कॉन्कॉर्डन्स रु. ७५.०० रु.१००.००