वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/९५ पृ. २
  • आनंद करणारे पालक!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आनंद करणारे पालक!
  • आमची राज्य सेवा—१९९५
  • मिळती जुळती माहिती
  • युवकांनो—यहोवाचे हृदय आनंदित करा
    आमची राज्य सेवा—१९९३
  • आपल्या पालकांची अंतःकरणे आनंदित करणे
    तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनवणे
  • तुम्ही तुमच्या मुलांकरता कोणती ध्येये राखली आहेत?
    आमची राज्य सेवा—१९९५
  • तुमच्या मुलांना सेवक होण्याचे प्रशिक्षण द्या
    आमची राज्य सेवा—२०११
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९५
km ८/९५ पृ. २

आनंद करणारे पालक!

१ तुम्ही ख्रिस्ती कुटुंबात राहणारी तरुण व्यक्‍ती असल्यास, पालकांना आनंदी करण्याचा एक खास मार्ग आहे. तुम्ही नीतिमान मार्ग अनुसरला, तर ‘तुमची मातापितरे आनंद पावतील.’ (नीतिसूत्रे २३:२२-२५) तुमचे पालक तुमच्यासाठी जे उत्तम आहे त्याची इच्छा स्वाभाविकपणे करतात. तुम्ही सत्य आपलेसे करून घेता व आपले जीवन यहोवाला समर्पित करता याहून अधिक इतर कोणतीही गोष्ट त्यांना संतुष्ट करणार नाही.

२ तुमचे पालक सत्यामध्ये असल्याबद्दल तुम्ही आभारी असू शकता. तुमच्या जन्मापासून, त्यांनी तुम्हाला खाऊ घातले आहे, कपडे पुरवले आहेत आणि निवारा पुरवला त्याचप्रामाणे आजारपणात तुमची काळजी देखील घेतली आहे. त्याहूनही अधिक म्हणजे, त्यांनी यहोवा व त्याच्या नीतिमान मार्गांविषयी तुम्हाला शिकवण्याचा प्रायत्न केला आहे; हे प्राशिक्षण तुम्हाला तुमच्या सार्वकालिक जीवनाची खात्री देऊ शकते. (इफिस. ६:१-४) तुम्ही आपली कृतज्ञता कशी दाखवू शकता?

३ सत्य आपलेसे करून घ्या: तुमच्या पालकांनी तुम्हाला सत्याचा गंभीरपणे विचार करण्याबद्दल, आध्यात्मिक प्रागती करण्याबद्दल व यहोवाच्या संघटनेच्या समीप राहण्याबद्दल शिकवण्याचा प्रायत्न केला आहे. तुमच्यावर बळजबरी न करता तुम्ही कौटुंबिक अभ्यासात आस्था घेऊन आपली गुणग्राहकता दाखवू शकता. सभांना जाण्याकरता स्वतःहून तयार होऊन उपस्थित राहण्याची इच्छा प्रादर्शित करा जेणेकरून संपूर्ण कुटुंब वेळेवर तेथे पोहंचू शकते. सभांच्या दरम्यान, तुमच्या पालकांच्या शेजारी बसा व अभ्यास केल्या जाणाऱ्‍या प्राकाशनात काळजीपूर्वक लक्ष द्या. विवेचने देण्याकरवी सभांमध्ये भाग घेण्याचा प्रायत्न करा. ईश्‍वारशासित सेवा प्राशालेमध्ये, नेमणूका स्वीकारून व त्या पूर्ण करण्यास होता होईल तितका प्रायत्न करून स्वतःला इच्छुक विद्यार्थी असल्याचे दाखवा. तुमचे साहाय्य उपयोगी पडेल अशा ठिकाणी म्हणजे राज्य सभागृहात काही काम करण्यासाठी स्वेच्छेने मदत करा. अशा कार्यहालचालींमध्ये गोवल्यामुळे तुमच्याकरता आध्यात्मिकरित्या चांगल्या असणाऱ्‍या गोष्टींवर तुम्हाला अंतःकरण केंद्रित करता येईल.

४ प्रागतीशील ध्येये ठेवा: क्षेत्र सेवेत अर्थपूर्ण सहभाग घेऊन प्राचारक होण्याची इच्छा दाखवा. साप्ताहिक बायबल वाचन करीत राहा किंवा त्याहूनही अधिक म्हणजे स्वतःहून संपूर्ण बायबल वाचून काढा. तुम्ही समर्पण व बाप्तिस्म्याच्या गरजा पूर्ण करणार असा मनाशी ठामनिश्‍चय करा. यहोवाच्या सेवेत पूर्ण सहभाग घेण्याकरता तुम्हाला सज्ज करणारे प्राशिक्षण मिळण्याच्या उद्देशाने, शाळेतील विषय काळजीपूर्वक निवडण्यास तुमचे पालक तुमची मदत करू शकतील. तुम्ही पायनियरींग किंवा बेथेल सेवेसारखे खास विशेषाधिकार घ्यावेत अशी शिफारस करण्यास इतरजण प्रावृत्त होतील असे नावलौकिक मिळवण्यावर लक्ष केंद्रित करा. (प्रो. कृत्ये १६:१, २) ध्येये साध्य केल्याने तुम्हाला ‘श्रेष्ठ गोष्टी पसंत करण्यास’ मदत मिळेल म्हणजे ‘नीतिमत्त्वाच्या फळाने तुम्ही भरून जाल.’—फिलिप्पै. १:१०, ११.

५ तारुण्याचा काळ, इतरांशी व्यवहार करताना शिकणे, अनुभव मिळवणे व कौशल्य प्राप्त करण्याचा समय असतो. प्रौढपणाचे दबाव व जबाबदाऱ्‍यांरहित जीवनाचा आनंद लुटण्याचा तो समय आहे. शलमोनाने म्हटले: “हे तरुणा, आपल्या तारुण्यात आनंद कर; तुझ्या तारुण्याच्या दिवसात तुझे हृदय तुला उल्लास देवो.” (उप. ११:९) तुम्ही तुमच्या तारुण्यात यहोवाची सेवा करण्यावर आपले हृदय केंद्रित केले, तर सर्वकाळ टिकणारे आशीर्वाद तुम्ही मिळवाल.—१ इति. २८:९.

६ तुम्ही ‘तरुणपणाच्या वासनांऐवजी नीतिमत्त्वाच्या पाठीस लागला,’ तर तुमच्या पालकांना चिंता व दुःख याच्या जड बोजापासून मुक्‍त कराल. (२ तीम. २:२२) तुम्ही स्वतःच्या अंतःकरणाला आनंद करण्याचे कारण द्याल. (नीति. १२:२५) त्याहूनही अधिक म्हणजे, तुम्ही तुमचा निर्माणकर्ता, यहोवा देव याला आनंदी कराल.—नीति. २७:११.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा